फोटो – ट्विटर, बीसीसीआय, आयपीएल

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Kolkata Knight Riders vs Royal Challengers Bangalore) यांच्यात झालेल्या आयपीएलमधील लढतीत केकेआरच्या वरुण चक्रवर्तीच्या (Varun Chakravarthy KKR) मिस्ट्री स्पिनचा आरसीबीला (RCB) फटका बसला. वरुणनं या मॅचमध्ये 4 ओव्हर्समध्ये फक्त 13 रन देत 3 विकेट्स घेतल्या. वरुणच्या मिस्ट्री स्पिनचा सामना करणे हे प्रतिस्पर्धी टीमना आयपीएल स्पर्धेत नेहमीच जड गेलंय. याच क्षमतेमुळे त्याची टीम इंडियात T20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup 2021) निवड झाली आहे. आर्किटेक्टची नोकरी सोडून क्रिकेटर बनलेल्या वरुणची आजवरची वाटचाल ही मोठी विलक्षण आहे.

क्रिकेट-आर्किटेक्ट-क्रिकेट

राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या दिवशी जन्मलेला वरुण हा मुळचा कर्नाटकातील बिदरचा. त्याला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. त्याने 13 व्या वर्षापासून क्रिकेट खेळण्यास सुरु केलं होतं. वरुण 17 व्या वर्षापर्यंत विकेट किपर – बॅट्समन होता. शालेय स्तरावर त्याला अपेक्षित यश मिळाले नाही. 17 वर्षाखालील वयोगटातल्या टीममध्ये निवड होण्यात त्याला वारंवार अपयश आलं. सततच्या अपयशानंतर घरच्यांच्या आग्रहामुळे त्याने क्रिकेट सोडले आणि चेन्नईमध्ये आर्किटेक्टचे शिक्षण पूर्ण केले.

वरुणची चेन्नईतच आर्किटेक्टची नोकरी सुरु झाली. शिक्षण होतं, नोकरी होती, नोकरीत करियरची संधी होती. हे सर्व असलं तरी वरुणचं क्रिकेटचं पॅशन कमी झालेलं नव्हतं. आर्किटेक्टची नोकरी सांभाळून शनिवार – रविवार त्याने क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. क्रिकेटर बनण्याचं स्वप्न त्याला सतावत होतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी 2015 साली वरुणनं पूर्णवेळ क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याने आर्किटेक्टची नोकरी सोडली.

चेन्नईतल्या क्रिकेट अकादमीत वरुण (Varun Chakravarthy KKR) दाखल झाला. सात वर्षाच्या गॅपनंतर क्रिकेटचं पॅशन पूर्ण करण्यासाठी मैदानावर उतरलेला वरुण आता फास्ट बॉलर ऑलराऊंडर बनला होता. क्रिकेट करियरची गाडी सुरु होत असतानाच त्याला दुखापतीचा ब्रेक लागला. या दुखापतीनंतर वरुण स्पिन बॉलर बनला. त्याने स्पिन बॉलिंगचे सर्व कौशल्य आत्मसात करण्यास सुरुवात केली.

पहिला ब्रेक

गुगली, ऑफब्रेक, लेगब्रेक, कॅरम बॉल, फ्लिपर, टॉप स्पिन अशा वेगवेगळ्या प्रकारे बॉलिंग करण्याचे कौशल्य वरुणने आत्मसात केलं. त्यामुळे तो ‘मिस्ट्री स्पिनर’ म्हणून ओळखला जावू लागला. त्याला चेन्नई लीगमध्ये खेळण्याची संधी मिळाली. त्याने पहिल्याच सिझनमध्ये 31 विकेट्स घेत स्वत:ची छाप पाडली. त्यामुळे 2018 साली तामिळनाडू प्रीमियर लीग (TNPL) मध्ये मदुराई पँथर्स या टीमने त्याला करारबद्ध केले. त्यावर्षी मदुराई पँथर्सनं टीएनपीएलचे विजेतेपद पटकावले. या विजेतेपदात वरुणचा मोलाचा वाटा होता.

वरुणने त्या स्पर्धेत एकूण 40 ओव्हर्स बॉलिंग केली. त्यापैकी 125 बॉल्स (20.5 ओव्हर्स) त्याने निर्धाव टाकले. फायनल मॅचमध्ये 4 ओव्हर्समध्ये फक्त 9 रन्स देत 2 विकेट्स घेतल्या. टीएनपीलमध्ये दिनेश कार्तिकचं (Dinesh Karthik) लक्ष वरुणकडे गेलं. कार्तिकने केकेआरसाठी (Varun Chakravarthy KKR) नेट बॉलर म्हणून वरुणला बोलावलं.

In-Out, In- Out! दिनेश कार्तिकच्या करियरची गोलाकार गोष्ट

अयशस्वी पदार्पण

विजय हजारे ट्रॉफी, रणजी ट्रॉफी यासारख्या प्रतिष्ठेच्या देशांतर्गत स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या वरुणला करारबद्ध करण्यासाठी आयपीएल फ्रँचायझीमध्ये जोरदार स्पर्धा रंगली. 2019 च्या लिलावात 20 लाखांचे आधार मुल्य असलेल्या वरुणला तब्बल 8 कोटी 40 लाख रुपये मोजून किंग्ज इलेव्हन पंजाबने करारबद्ध केले. तो 2019 च्या लिलावातला सर्वात महागडा अनकॅप खेळाडू बनला.

तामिळनाडूचा सीनियर खेळाडू आणि टीम इंडियाचा प्रमुख बॉलर आर. अश्विन (R. Ashwin) तेंव्हा किंग्ज इलेव्हन पंजाबचा कॅप्टन होता. अश्विनकडून वरुणला नेटमध्ये अनेक टिप्स मिळाल्या. मात्र आयपीएलमधील त्याचे पदार्पण निराशाजनक ठरले. केकेआरविरुद्ध ‘पॉवर प्ले’मध्ये वरुणच्या हाती अश्विननं बॉल सोपवला. त्याच्या पहिल्याच ओव्हर्समध्ये तब्बल 25 रन्स निघाले. आयपीएल इतिहासात सर्वात महागडी पहिली ओव्हर टाकण्याचा नामुष्कीदायक विक्रम त्याच्या नावावर नोंदवला गेला.

वरुणचं दुर्दैव इथेच थांबलं नाही. या मॅचनंतर तो दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे त्याला मागील वर्षाच्या सीझनमध्ये स्वत:ला सिद्ध करता आलं नाही. दुखापतीमुळे तो जवळपास वर्षभर क्रिकेटपासून दूर होता. किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याला करारमुक्त केलं. निराशाजनक आयपीएल पदार्पण, दुखापत, वर्षभराचा ब्रेक या सर्व अडचणीनंतरही क्रिकेटच्या मैदानातील वरुणचं मोल कमी झालं नव्हतं. यावर्षीच्या आयपीएल लिलावात पुन्हा एकदा वरुणला करारबद्ध करण्यासाठी आरसीबी आणि केकेआरमध्ये स्पर्धा रंगली होती. अखेर केकेआरनं ही स्पर्धा जिंकत वरुणला चार कोटी रुपयांना करारबद्ध (Varun Chakravarthy KKR) केलं.

T20 क्रिकेटमध्ये सुपर ओव्हर मेडन टाकणारा एकमेव बॉलर

KKR चं अस्त्र

केकेआरचा माजी कॅप्टन दिनेश कार्तिक हा वरुणचा सुरवातीपासूनचा मार्गदर्शक. त्याच्या पुढाकारानंच वरुण केकेआरमध्ये पहिल्यांदा नेट बॉलर बनला होता. वरुणसारखाच मिस्ट्री स्पिनर सुनील नरीन हा त्याचा गुरु. याच नरीननं त्याच्या आयपीएलमधील पहिल्या ओव्हरमध्ये 24 रन्स काढले होते. केकेआरसोबतचं वरुणचं नातं घट्ट आहे. मागील आयपीएलमध्ये वरुण कार्तिकसोबत खेळण्यासाठी केकेआरच्या टीममध्ये दाखल झाला.

केकेआरचा प्रमुख स्पिनर कुलदीप यादव सध्या फॉर्मात नव्हाता. त्यामुळे वरुणला मागच्या आयपीएलमध्ये (IPL 2020) अंतिम 11 मध्ये संधी मिळाली. यापूर्वी अनुभवातून शिकलेल्या वरुणनं उपयुक्त बॉलिंग केली. कुलदीप बहुतेक सीझन बेंचवर होता. संशयास्पद गोलंदाजीच्या शैलीमुळे नरीनलाही काही मॅच खेळता आल्या नाहीत. या कालावधीमध्ये केकेआरच्या स्पिन बॉलिंगची जबाबदारी वरुणनं सांभाळली. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या मॅचमध्ये तर त्याने कमाल केली. त्या मॅचमध्ये वरुणनं 20 रन्स देत 5 विकेट्स घेतल्या. स्पिन बॉलिंग चांगली खेळणारे ऋषभ पंत, श्रेयस अय्यर आणि हेटमायर सारखे बॅट्समन वरुणनं आऊट करत केकेआरला अत्यंत आवश्यक असा विजय मिळवून दिला.

टीम इंडियात निवड

वरुणनं आयपीएल 2020 मध्ये 17 विकेट्स घेतल्या. तो मागील सिझनमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा केकेआरचा बॉलर ठरला. या कामगिरीमुळे वरुणची टीम इंडियात (Team India) निवड झाली. इंग्लंड विरुद्धच्या सीरिजसाठी वरुण भारतीय क्रिकेट टीममध्ये (Indian Cricket Team) निवड झाली. पण, वरुणला खराब फिटनेसमुळे इंग्लंड विरुद्धच्या सीरिजमध्ये खेळता आलं नाही. वरुणला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यासाठी जुलै महिन्यापर्यंत थांबावे लागले. श्रीलंका दौऱ्यात तो तीन T20 मॅच खेळला. यामध्ये त्यानं (Varun Chakravarthy KKR) 2 विकेट्स घेतल्या.

यशाचा आर्किटेक्ट

आता आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्याच मॅचमध्ये वरुणनं कमाल केली आहे. त्यानं 4 ओव्हरमध्ये ग्लेन मॅक्सवेल, हसरंगा आणि सचिन बेबी यांना आऊट करत आरसीबी 100 च्या पुढे जाणार नाही, याची खबरदारी घेतली. गौतम गंभीर कॅप्टन असताना केकेआरनं दोनदा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं. गंभीरच्या त्या टीममध्ये स्पिनर्सच्या यशाचा मोठा वाटा होता. आता स्पर्धेच्या निर्णायक टप्प्यात वरुणला गवसलेला सूर हा केकेआरसाठी मोठी आशादायक गोष्ट आहे.

टीम इंडियाच्या निवडीसाठी असलेली मोठी स्पर्धा पार करण्यात वरुणला यश आलंय. 6 बॉल 6 पद्धतीनं त्याची टाकण्याच्या क्षमतेमुळे निवड समितीनं T20 वर्ल्ड कपसाठी त्याच्यावर विश्वास ठेवला आहे. जागतिक क्रिकेटमध्ये मिस्ट्री स्पिनर्स फार नाहीत. वरुणचं हे वेगळेपण त्याला विशेष बनवते.

यशस्वी भव! T20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया जाहीर, 15 जणांच्या ‘विराट’ सेनेवर इतिहास घडवण्याची जबाबदारी

T20 वर्ल्ड कपपूर्वी यूएईमध्येच वर्ल्ड कप होणार आहे. त्यामुळे वरुणला येथील पिचचा चांगला अनुभव येईल. भारतीय टीम वर्ल्ड कपमधील 5 पैकी 4 मॅच दुबईच्या स्पिनर्सला मदत करणाऱ्या पिचवर खेळणार आहे. या पिचवर वरुणची अंतिम 11 मध्ये निवड होण्याची संधी जास्त आहे. त्यामुळे त्याला विकेट्स घेण्याची जबाबदारी पार पाडावी लागेल. केकेआरच्या या मिस्ट्री स्पिनरला (Varun Chakravarthy KKR) आगामी वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाच्या यशाचा ‘आर्किटेक्ट’ होण्याची संधी आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: