कोलकाता नाईट रायडर्सनं (Kolkata Knight Riders) मंगळवारी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये विजयाच्या तोंडातून पराभव खेचून आणला. मॅचमधील 40 पैकी 35 ओव्हर केकेआरचं वर्चस्व होतं. मात्र शेवटच्या पाच ओव्हर्समध्ये त्यांच्या बॅट्समननं खराब खेळ केला. त्यामुळे मुंबई इंडियन्सनं 10 रननं मॅच जिंकली. केकेआरच्या या खराब कामगिरीवर टीमचा मालक शाहरुख खान नाराज (Shah Rukh Khan on KKR) झाला आहे.

KKR चं होतं वर्चस्व

कोलकाता नाईट रायडर्सनं (KKR)  टॉस जिंकण्यापासून बराच काळ चांगला खेळ केला. त्यांच्या स्पिनर्सनी ‘पॉवर प्ले’ मध्ये चांगली बॉलिंग केली. तर फास्ट बॉलर्सनी नंतरच्या काळात मुंबई इंडियन्सच्या बॅट्समन्सना मोठा स्कोअर करु दिला नाही.

आंद्रे रसेलनं (Andre Russell) तर फक्त 2 ओव्हर्समध्ये 5 विकेट्स घेऊन कमाल केली. त्याच्या स्पेलमुळे मुंबई इंडियन्सची टीम 5 आऊट 125 वरुन 152 रनवर ऑल आऊट झाली.

सुरुवात चांगली

153 रनचा पाठलाग करताना नितीश राणा (Nitish Rana) आणि शुभमन गिल (Shubman Gill) यांनी केकेआरला जोरदार सुरुवात केली. या दोघांनी 8.5 ओव्हर्समध्ये 72 रनची ओपनिंग दिली. शुभमन गिलला 33 रनवर आऊट करत राहुल चहरनं (Rahul Chahr) ही जोडी फोडली.

30 बॉलमध्ये हवे होते 31 रन!

केकेआरला शेवटच्या पाच ओव्हर्समध्ये जिंकण्यासाठी 31 रनची गरज होती आणि त्यांच्या सात विकेट्स शिल्लक होत्या. 30 बॉल 31 रन हे टार्गेट केकेआर रमत-गमत पार करणार असं वाटत असतानाच त्यांच्या बॅट्समननी बेजाबादार खेळ करत विकेट फेकल्या आणि 10 रननं मॅच गमावली.

IPL 2021 KKR Preview: प्रयोग कमी केले तरी बरंच काम होईल!

शाहरुख खान नाराज

कोलकाता नाईट रायडर्सचा मालक शाहरुख खान हा चांगलाच निराश झाला आहे. शाहरुख खान आयपीएल दरम्यान सहसा टीमचा उत्साह वाढवणारे ट्विट्स करत असतो. या धक्कादायक पराभवानंतर मात्र त्याला नाराजी लपवता आली नाही.

‘कोलकाता नाईट रायडर्सची अतिशय खराब कामगिरी. सर्व फॅन्सची माफी मागत आहोत.’, असं ट्विट करत शाहरुख खाननं त्याची नाराजी (Shahrukh Khan on KKR) सार्वजनिक केली आहे.

पुन्हा ये रे माझ्या मागल्या..

कोलकाता नाईट रायडर्सनं मागील सिझनमध्ये (IPL 2020) देखील या प्रकारे मॅच गमावल्या आहेत. त्यामुळे त्यांना ‘प्ले ऑफ’ गाठण्यात अपयश आले होते. यावर्षी देखील त्याच पद्धतीनं पराभव झाल्यानं टीम मॅनेजमेंटनं आयपीएलपूर्वी केलेल्या तयारीवर फॅन्स प्रश्न विचारत आहेत. फॅन्स तसंच मालकाच्या नाराजीनंतर (Shah Rukh Khan on KKR) आता पुढील स्पर्धेत चांगली कामगिरी करण्याचं आव्हान केकेआर समोर आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: