फोटो – ट्विटर/@mipaltan

मुंबई इंडियन्स (Mumbai Indian) ही इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या (IPL) इतिहासातील सर्वात यशस्वी टीम आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्त्वाखालील या टीमनं आजवर पाचदा (2013, 2015, 2017, 2019 आणि 2020) या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. बीसीसीआयनं (BCCI) 14 व्या सिझनचं (IPL 2021) वेळापत्रक जाहीर केलं आहे. यामध्ये गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या मॅचनं (IPL 2021 MI Schedule) या स्पर्धेची सुरुवात होणार आहे.  

अनोखी संधी

मुंबई इंडियन्सला या वर्षी आजवर कुणालाही जमला नाही असा रेकॉर्ड करण्याची संधी आहे. यंदा मुंबईनं आयपीएल स्पर्धेनं विजेतेपद पटकावल्यास सलग तीनदा आयपीएल स्पर्धा जिंकणारी मुंबई ही आयपीएल इतिहासातील पहिली टीम बनू शकेल. मुंबईनं सध्या सलग दोनदा आयपीएल स्पर्धा (2019 आणि 2020) जिंकली आहे.

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सलग दोनदा विजेतेपद पटकावणारी मुंबई इंडियन्स ही दुसरी टीम आहे. यापूर्वी महेंद्र सिंह धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सनं (CSK) 2010 आणि 2011 अशी सलग दोन वर्ष ही स्पर्धा जिंकली आहे.

( वाचा : IPL 2021 Schedule: तुमच्या प्रश्नांच्या सर्व उत्तरांसह ‘इथे’ पाहा संपूर्ण वेळापत्रक )

मुंबईच्या मॅच कुठे होणार?

यावर्षीच्या आयपीएलचं वैशिष्ट्य म्हणजे यंदा कोणत्याही टीमच्या लढती या त्यांच्या घरच्या मैदानावर (Home Ground) होणार नाही. मुंबई इंडियन्सच्या लढती (IPL 2021 MI Schedule)  चेन्नई, दिल्ली, बंगळुरु आणि कोलकाता या चार शहरांमध्ये होणार आहेत.

मुंबईच्या साखळी फेरीतील सर्वात जास्त पाच लढती चेन्नईत होणार आहेत. त्यानंतर दिल्लीत चार, बंगळुरुत  तीन आणि कोलकातामध्ये मुंबईच्या दोन लढती होणार आहेत.

मुंबई इंडियन्सची पहिली मॅच 9 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) विरुद्ध चेन्नईमध्ये होणार आहे. तर साखळी फेरीतील त्यांची शेवटची लढत 23 मे रोजी दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्ध कोलकातामध्ये होणार आहे.

EL Clasico कधी होणार?

फुटबॉल विश्वात बार्सिलोना विरुद्ध रिअल माद्रीद (Barcelona vs Real Madrid ) या लढतीला मोठं महत्त्व आहे. त्यांच्यामध्ये होणारी लढत ही EL Clasico म्हणून ओळखली जाते.

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Mumbai Indians vs Chennai Super Kings) यांच्या लढतीला देखील हीच परंपरा आहे. पाच वेळेसची विजेती मुंबई इंडियन्स (MI) आणि तीन वेळा विजेती चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यातील लढतीची क्रिकेट फॅन्सना नेहमीच प्रतीक्षा असते.

( वाचा : IPL 2021 CSK: संपूर्ण बदल ‘Definitely Not’ हवे तितके बदल ‘Yes’! )

आयपीएल इतिहासातील दोन सर्वात यशस्वी टीममधील पहिली लढत महाराष्ट्र दिनी म्हणजेच 1 मे रोजी देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये होणार आहे. तर दुसरी लढत 16 मे रोजी बंगळुरुमध्ये होईल.

मुंबई इंडियन्सचे IPL 2021 मधील संपूर्ण वेळापत्रक (IPL 2021 MI Schedule)   

मॅच क्रमांकमॅचठिकाणवेळ तारीख
1मुंबई इंडियन्स (MI) वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) चेन्नई7.30 PM9 एप्रिल
5मुंबई इंडियन्स (MI) वि. कोलकाता नाईट रायडर्स (KKR)चेन्नई7.30 PM13 एप्रिल
9मुंबई इंडियन्स (MI) वि. सनरायझर्स हैदराबाद (SRH)चेन्नई7.30 PM17 एप्रिल
13मुंबई इंडियन्स (MI) वि. दिल्ली कॅपिटल्स (DC)चेन्नई7.30 PM20 एप्रिल
17मुंबई इंडियन्स (MI) वि. पंजाब किंग्ज (PBKS)चेन्नई7.30 PM23 एप्रिल
24मुंबई इंडियन्स (MI) वि. राजस्थान रॉयल्स (RR) दिल्ली3.30 PM29 एप्रिल
27मुंबई इंडियन्स (MI) वि. चेन्नई सुपर किंग्स (CSK) दिल्ली 7.30 PM1 मे
31मुंबई इंडियन्स (MI) वि. सनरायझर्स हैदराबाद (SRH) दिल्ली 7.30 PM4 मे
36मुंबई इंडियन्स (MI) वि. राजस्थान रॉयल्स (RR) दिल्ली7.30 PM8 मे
39मुंबई इंडियन्स (MI) वि. कोलकाता नाईट रायडर्स (KKR)बंगळुरु 7.30 PM10 मे
42मुंबई इंडियन्स (MI) वि. पंजाब किंग्ज (PBKS)बंगळुरु 3.30 PM13 मे
47मुंबई इंडियन्स (MI) वि. चेन्नई सुपर किंग्स (CSK)बंगळुरु 7.30 PM16 मे
51मुंबई इंडियन्स (MI) वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) कोलकाता7.30 PM20 मे
55मुंबई इंडियन्स (MI) वि. दिल्ली कॅपिटल्स (DC) कोलकाता3.30 PM23 मे

टीप – मॅचच्या सर्व वेळा या भारतीय वेळापत्रकानुसार आहेत.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: