फोटो – ट्विटर / @mipaltan

पाच वेळेस आयपीएल (IPL) स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सनं आपण इतर टीमच्या एक पाऊल पुढे का आहोत? हे पुन्हा एका स्पर्धा सुरु होण्यापूर्वी लिलावाच्या टेबलावर दाखवून दिलं आहे. मुंबई इंडियन्सनच्या सात जागा रिक्त होत्या. त्या त्यांनी उत्तम पद्धतीनं (MI 2021) भरल्या.

फास्ट बॉलिंग अटॅक

मुंबई इंडियन्सला विदेशी फास्ट बॉलर्लसची सर्वात जास्त आवश्यकता होती. अ‍ॅडम मिल्ने (Adam Milne) हा न्यूझीलंडचा फास्ट बॉलर आणि त्यांचा जुना खेळाडू मुंबईनं खरेदी केला. त्याचबरोबर नॅथन कुल्टर नाईल (Nathan Coulter- Nile) हा देखील आणखी एक जुना खेळाडू त्यांनी पहिल्यापेक्षा जुन्या किंमतीमध्ये घेतला. हार्दिक पांड्या किती बॉलिंग करेल हे स्पष्ट नसल्यानं त्याचा कोटा कुल्टर नाईल भरु काढू शकतो. त्याचबरोबर शेवटच्या ओव्हर्समध्ये त्याची बॅटिंग नेहमीच उपयुक्त आहे.

मुंबईकडं प्रत्येक खेळाडूचा बॅक अप रेडी (MI 2021) असतो. त्यामुळे कुल्टर नाईलचा बॅक अप म्हणून त्यांनी जेम्स नीशम (James Neesham) हा आणखी एक न्यूझीलंडचा ऑल राऊंडर घेतला. नीशमला आजवर आयपीएलमध्ये कमाल करता आलेली नाही. पण त्याची क्षमता दुर्लक्षता येणार नाही.

मुंबई इंडियन्सच्या फास्ट बॉलिंग अटॅकमधील एक नवं नाव आहे ते म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा मार्को जेन्सन.

( वाचा : IPL 2021 Auction: मुंबई इंडियन्सला विजेतेपदाची हॅट्ट्रिक करण्यासाठी ‘हे’ खेळाडू करणार मदत )

कोण आहे मार्को जेन्सन?

नव्या खेळाडूंना हेरण्यासाठी मुंबई इंडियन्सनं उभ्या केलेल्या टीमनं मार्को जेन्सन (Marco Jansen) याला शोधलं आहे. 6 फुट 8 इंच उंची असलेल्या 20 वर्षाच्या बॉलरवर मुंबई ही टीम गेल्या दोन वर्षांपासून लक्ष ठेवून होती. त्याच्याकडं ताशी 140 किलो मीटर पेक्षा जास्त वेगानं बॉलिंग करण्याची क्षमता आहे. तसेच खालच्या क्रमांकावर खेळण्याची उत्तम क्षमताही आहे. त्याची बॉलिंग प्रतिस्पर्धी टीमनं फारशी पाहिलेली नाही. त्यामुळे अगदी सुरुवातीपासूनही मार्को या आयपीएलमध्ये खेळताना (MI 2021) दिसू शकेल.

स्पिनचा गुंता सुटला

मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये अनुभवी स्पिनरची कमतरता होती. राहुल चहर एक वर्ष चालला. पण मागच्या वर्षी राहुल आणि कृणाल पांड्या दोघांनीही बॉलिंगमध्ये निराशा केली. त्यामुळे या डिपार्टमेंटमधील खड्डा भरुन काढण्यासाठी मुंबईनं अनुभवी पियुष चावलाला (Piyush Chawala) टीममध्ये घेतलं आहे. हरभजन सिंग आणि प्रज्ञान ओझा यांचं काम चावला या टीमसाठी करु शकेल.

अर्जुन आला रे!

अर्जुन तेंडुलकरबाबत (Arjun Tendulkar) मुंबई इंडियन्स काय करणार हा सर्वांसाठी उत्सुकतेचा विषय होता. मुंबई इंडियन्सनं अर्जुनला टीममध्ये घेत याचं अपेक्षित उत्तर दिलं आहे. मुंबईच्या टीममधील खोली पाहता त्याला अंतिम 11 मध्ये यावर्षी संधी मिळण्याची शक्यता नाही. मात्र अर्जुनवर येत्या काही वर्षात आणखी काम केले जाईल. अनुभवी झहीर खानच्या मार्गदर्शनाचाही त्याला फायदा मिळेल. तसंच बुमराह, बोल्टकडून त्याला काही शिकता येईल. अर्जुनप्रमाणेच युद्धवीर सिंग हा हैदराबादकडून खेळणारा आणखी तरुण बॉलर मुंबईनं घेतला आहे. त्याच्यासाठी देखील हे आयपीएल शिकण्याची संधी असेल.

( वाचा : बीसीसीआयच्या बैठकीतील मोठ्या निर्णयाचा मुंबई इंडियन्सच्या फॅन्सना दिलासा )

मुंबई इंडियन्सची टीम : रोहित शर्मा, आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंह, धवल कुलकर्णी, हार्दिक पंड्या, इशान किशन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, कृणाल पांड्या,कायरन पोलार्ड, क्विंटन डिकॉक, राहुल चहर, सूर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट, क्रिस लिन, सौरभ तिवारी, मोहसिन खान, पियुष चावला, अ‍ॅडम मिल्ने, नॅथन कुल्टर नाइल, जेम्स नीशम, मार्को जेन्सन, युद्धवीर सिंग आणि अर्जुन तेंडुलकर

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: