फोटो – BCCI/IPL

मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) गेल्या आठ वर्षात पाच वेळा आयपीएल (IPL) स्पर्धा जिंकली आहे. त्यांना सलग दोन वर्ष स्पर्धा जिंकता आली नव्हती. ती उणीव देखील त्यांनी मागच्या वर्षी भरुन काढली. मुंबई इंडियन्सची टीम ही सध्या आयपीएलमधीलच नाही तर जगातील बेस्ट T20 मानली जाते. आता आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच विजेतेपदाची हॅटट्रिक करण्यासाठी ही टीम सज्ज (IPL 2021 MI Preview) झाली आहे.  

मुंबई इंडियन्सची बलस्थाने

मुंबई इंडियन्सच्या टॉप सात पैकी पाच बॅट्समन हे नुकत्याच झालेल्या भारत-इंग्लंड सीरिजमध्ये (India vs England) खेळली आहेत. तर अन्य दोन बॅट्समन म्हणजे क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) आणि कायरन पोलार्ड (Kieron Pollard) हे दोघं T20 क्रिकेटमधील धोकादायक बॅट्समन म्हणून ओळखले जातात.

टॉप सातमध्ये अगदीच कुणी जखमी असेल तरच बदल करण्याची मुंबई इंडियन्सची पद्धत आहे. त्यामुळे ख्रिस लीन (Chris Lynn) सारखा आक्रमक ओपनर देखील मागील संपूर्ण सिझन अंतिम 11 च्या बाहेर होता.

सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि इशान किशन (Ishan Kishan) या दोघांसाठी मागील आयपीएल चांगलं गेलं आहे. नुकतंच त्यांनी टीम इंडियाकडून पदार्पण केलं आहे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास आणखी वाढला आहे. या दोघांकडून या स्पर्धेत मुक्त फटकेबाजी पाहयला (IPL 2021 MI Preview) मिळू शकते.

मुक्त फटकेबाजीचा विषय निघाल्यानर कायरन पोलार्ड आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांचा उल्लेख तर करायलाच हवा. मुंबई इंडियन्स शेवटच्या पाच ओव्हर्समध्ये भरपूर रन करतात. शेवटच्या टप्प्यातील हाणामारीचं श्रेय या दोघांना आहे. हार्दिकनं भारत-इंग्लंड सीरिजच्या शेवटच्या वन-डेमध्ये फटकेबाजी केली आहे. तर पोलार्डनं श्रीलंकेविरुद्धच्या T20 मध्ये एकाच ओव्हरमध्ये सहा सिक्स मारण्याचा पराक्रम केला आहे.

( IPL 2021 MI : मजबूत मुंबई इंडियन्स झाली आणखी भक्कम! )

हार्दिक पांड्यानं बॉलिंग करायला सुरुवात केली ही देखील मुंबई इंडियन्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. हार्दिकनं T20 मालिकेत 17 ओव्हर बॉलिंग केली होती. त्यामध्ये त्यानं तीनच विकेट्स  घेतल्या असल्या तरी 6.94 च्या इकॉनॉमी रेटनं त्यानं रन दिले होते. हार्दिकचा पर्याय बॉलिंगला उपलब्ध झाल्यानं मुंबईला आणखी एक अतिरिक्त बॉलर मिळाला आहे.

मुंबई इंडियन्सच्या बॉलिंगचा अटॅक हा जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि  ट्रेंट बोल्ट (Trent Boult) या दोन भेदक बॉलर्समुळे खतरनाक बनला आहे. बुमराह इनिंगच्या सुरुवातीला आणि शेवटच्या टप्प्यात खतरनाक बॉलिंग करु शकतो. तर ‘पॉवर प्ले’ मध्ये प्रतिस्पर्धी टीमच्या टॉप ऑर्डरला हादरे देण्याची जबाबदारी बोल्टवर असेल.

रोहित शर्माची (Rohit Sharma) कॅप्टनसी हे देखील मुंबई इंडियन्सचं मोठं बलस्थान आहे. मुंबईची पाचही विजेतेपद रोहितच्या कॅप्टनसीमध्ये आली आहेत. ही टीम घडवण्यात आणि ती स्थिर करण्यात रोहितच्या खंबीर कॅप्टनसीचा मोठा वाटा आहे. मॅचच्या कोणत्याही टप्प्यावर शांतपणे निर्णय घेण्याची क्षमता रोहितकडं आहे. त्यामुळे त्याच्या कॅप्टनसीमध्ये प्लेयर्सचा खेळ आणखी उंचावतो. यावर्षी मुंबई इंडियन्सनं हॅट्ट्रिक केली तर आगामी T20 वर्ल्ड कपमध्ये ‘रोहितला कॅप्टन करा’ ही मागणी आणखी जोर धरणार आहे.

मुंबई इंडियन्सच्या मार्गातील धोके

रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांचा ऑफ स्पिनर्सविरुद्धचा फॉर्म हा त्यांच्या लौकिकाला साजेसा नाही. त्यामुळे प्रतिस्पर्धी कॅप्टन ‘पॉवर प्ले’ मध्ये ऑफ स्पिनर आणून या दोघांना शांत करण्याचा प्रयत्न (IPL 2021 MI Preview) करु शकतो.

मागील आयपीएलमध्ये मधल्या ओव्हर्समध्ये मुंबई इंडियन्सचा इकॉनॉमी रेट (8.1) आणि विकेट घेण्याचा रनरेट (27.9) हा शेवटून दुसरा होता. कृणाल पांड्यानं (Krunal Pandya) मागच्या आयपीएलमध्ये फक्त 6 विकेट्स घेतल्या आहेत. तर राहुल चहर (Rahul Chahar) मागच्यावर्षी अपेक्षापूर्ती करु शकला नाही. त्यामूळे त्यांना फायनलमध्ये राहुलच्या जागी जयंत यादवला खेळवावं लागलं.

( गतविजेत्या मुंबई इंडियन्सचं संपूर्ण शेड्यूल ‘इथे’ वाचा )

स्पिनर्सची ही मर्यादा झाकण्यासाठी यंदा मुंबई इंडियन्सनं आयपीएल इतिहासातील तिसऱ्या क्रमांकाचा यशस्वी बॉलर पियूष चावला (Piyush Chawala) याला खरेदी केलं आहे. चावलासाठी मागील आयपीएल चांगले गेले नव्हते. यंदा त्यानं लौकिकाला साजेसा खेळ केला (IPL 2021 MI Preview)  तर मुंबईची स्पिन बॉलिंगची अडचण दूर होईल.  

मुंबई इंडियन्सची टीम : रोहित शर्मा, आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंह, धवल कुलकर्णी, हार्दिक पंड्या, इशान किशन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, कृणाल पांड्या,कायरन पोलार्ड, क्विंटन डिकॉक, राहुल चहर, सूर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट, क्रिस लिन, सौरभ तिवारी, मोहसिन खान, पियुष चावला, अ‍ॅडम मिल्ने, नॅथन कुल्टर नाइल, जेम्स नीशम, मार्को जेन्सन, युद्धवीर सिंग आणि अर्जुन तेंडुलकर

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: