
मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) या आयपीएलमधील (IPL 2021) विजयी अभियानाला ब्रेक लागला आहे. दिल्ली कॅपिटल्सनं (Delhi Capitals) त्यांचा 6 विकेट्सनं पराभव केला. चेन्नईत झालेल्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सच्या बॅट्समन्सना कमाल करता आली नाही. त्यांनी दिल्लीपुढे 138 रनचं टार्गेट ठेवलं. जे दिल्लीनं शेवटच्या ओव्हरमध्ये 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. या मॅचनंतर रोहित शर्माबाबत एक काळजीची बातमी (Rohit Sharma News) समोर आली आहे.
रोहित बाहेर का गेला?
मुंबई इंडियन्सची फिल्डिंग सुरु असताना रोहित शर्मा बहुतेक काळ ड्रेसिंग रुममध्ये होता. यापूर्वी मागील आयपीएलमध्ये रोहित स्नायू दुखावल्यानं काही मॅच खेळला नव्हता. त्यानंतर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांच्या जाहीर सुचनेनंतरही तो आयपीएलमध्ये खेळला. त्यानं आयपीएल मॅचला महत्त्व दिलं. यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याला फक्त शेवटच्या दोन टेस्ट खेळता आल्या. वन-डे, T-20 सीरिज आणि पहिल्या दोन टेस्टमध्ये खेळू शकला नव्हता.
या आयपीएलमध्येही रोहितनं तब्बल 7 वर्षांनी बॉलिंग केली. त्यावेळी पहिला बॉल टाकण्यापूर्वीच तो खाली पडला होता. त्यामुळे रोहित दिल्ली कॅपिटल्सच्या विरुद्ध बहुतेक काळ ड्रेसिंगरुममध्ये गेल्यानं अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला होता.
IPL 2021, Explained: रोहित शर्मानं सात वर्षांनंतर बॉलिंग का केली?
समोर आलं कारण…
रोहित शर्मानं मॅच संपल्यानंतर बोलताना तो बाहेर का गेला होता, याबाबत उत्तर (Rohit Sharma News) दिलं आहे. मला छोटी दुखापत होती, ती आता बरी होईल’ असं रोहितनं सांगितलं. रोहित दुखापतग्रस्त असूनही मागच्या आयपीएलमध्ये खेळला होता. त्यावेळी देखील शेवटपर्यंत मुंबई इंडियन्स किंवा रोहित शर्मा यानं त्याच्या दुखापतीबाबत स्पष्टपणे सांगितलं नव्हतं.
आता देखील रोहित शर्मा शर्माची दुखापत किती गंभीर आहे, हे समोर आलेलं नाही. त्यामुळे 23 एप्रिज रोजी पंजाब किंग्ज (PBKS) विरुद्ध होणाऱ्या मॅचमध्ये रोहित खेळणार का? यासाठी त्या दिवसापर्यंत वाट पाहावी लागेल. रोहित शर्मा दुखापतीमुळे बाहेर गेला तर त्याची जागा घेण्यासाठी मुंबई इंडियन्सकडं प्लेयर आहेत. पण त्याचा अनुभव आणि कॅप्टनसीचं कौशल्य याची कमतरता भरुन काढणारं कुणीही नाही. त्यामुळे ऐन आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सला फटका बसू शकतो.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.