फोटो – ट्विटर

पहिल्या आयपीएल विजेतेपदाच्या प्रतीक्षेत असलेल्या विराट कोहलीच्या (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीममध्ये दुसऱ्या टप्प्यापूर्वी मोठे बदल करण्यात आले आहेत. सध्या फॉर्मात असलेल्या सिंगापूर आणि श्रीलंकेच्या टीममधील खेळाडूचा आरसीबीमध्ये समावेश (New RCB Players) करण्यात आला आहे. त्याचबरोबर आरसीबीच्या हेड कोचनंही पदाचा राजीनामा दिला आहे.

चांगल्या कामगिरीचं बक्षीस

श्रीलंकेचा लेगस्पिनर वानेंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) याची आरसीबीनं निवड केली आहे. हसरंगाचा ऑस्ट्रेलियन स्पिनर अ‍ॅडम झम्पाच्या जागी समावेश करण्यात आला आहे. झम्पानं आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात एकही मॅच न खेळता माघार घेतली होती. तर हसरंगानं भारताच्या नवोदीत बॅट्समन्सना चांगलेच त्रस्त केले होते.

त्यानं तीन टी20 सीरिजमध्ये सर्वाधिक 7 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानं शेवटच्या टी20 मध्ये 9 रन देत 4 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. ICC च्या T20 रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या हसरंगाला आयपीएल टीम करारबद्ध करणार अशी चर्चा होती. त्यात अखेर आरसीबीनं बाजी मारली आहे.

आरसीबीनं श्रीलंकेचा फास्ट बॉलर दुष्मंथा चमीराची (Dushmantha Chameera) डॅनियल सॅम्सच्या जागी निवड केली आहे. सॅम्सला आरसीबीनं दिल्ली कॅपिटल्सकडून खरेदी केली होते. तो आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उपलब्ध नसल्यानं चमीराला निवडण्यात आलं आहे. चमीरानं इंग्लंड आणि भारताविरुद्धच्या सीरिजमध्ये चांगली बॉलिंग केली होती.

सिंगापूरचा पहिला खेळाडू

आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच सिंगापूरच्या क्रिकेटपटूला (First Singapore international cricketer to play in IPL) एखाद्या टीमनं करारबद्ध केले आहे. सध्या T20 लीगमध्ये जबरदस्त फॉर्मात असलेल्या टीम डेव्हिडचा (Tim David) आरसीबीनं समावेश (New RCB Players) केलाय. न्यूझीलंडच्या फिन अ‍ॅलनच्या जागी त्याची टीममध्ये निवड करण्यात आली आहे.

टीम डेव्हिडच्या समावेशानं आरसीबीची मिडल ऑर्डर मजबूत झाली आहे. त्यानं यूएईमध्येच झालेल्या पीएसएल स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात लाहोर कलंदर टीमकडून चांगली कामगिरी केली होती. त्याचबरोबर द हंड्रेड स्पर्धेत तो साऊथर्न ब्रेव्ह टीमचा सदस्य आहे. बिग बॅश लीगमध्येही डेव्हिड होबार्टच्या टीमकडून खेळला असून तिथंही त्यानं प्रभावित केले आहे.

डेव्हिडनं आजवर 14 आंतरराष्ट्रीय T20 मॅचमध्ये 46.50 च्या सरासरीनं 558 रन केले आहेत. त्याचा स्ट्राईक रेट 158.52 आहे. त्याचबरोबर त्यानं 5 विकेट्सही घेतल्या आहेत.

हेड कोचचा राजीनामा

आरसीबीचा हेड कोच सायमन कॅटिच (Simon Katich steps down as RCB Coach) याने वैयक्तिक कारणामुळे पदाचा राजीनामा दिला आहे. कॅटिचची या सिझनमध्येच आरसीबी कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्याच्या अनुपस्थितीमध्ये आरसीबीचे डायरेक्टर ऑफ क्रिकेट माईक हेसन (Mike Hesson) हेच हेड कोचची जबाबदारी सांभाळतील.

‘RCB मध्ये गेल्यानंतर काय जादू झाली?’ मॅक्सवेलनं सांगितलं रहस्य

विराट कोहलीच्या आरसीबीनं पहिल्या टप्प्यात (IPL 2021) चांगली कामगिरी केलीय. या टीमनं 7 पैकी 5 मॅच जिंकल्या असून ते सध्या पॉईंट टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहेत.  

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: