फोटो – BCCI/IPL

आयपीएलच्या इतिहासात पंजाबच्या टीमनं आजवर फक्त दोन वेळा ‘प्ले ऑफ’ मध्ये प्रवेश केला आहे. यापूर्वी ही टीम 2014 साली ‘टॉप 4’ मध्ये होती. पंजाबनं नव्या दशकाची सुरुवात नाव बदलण्यापासून केली आहे. पंजाब किंग्ज (Punjab Kings, PBKS) या नावानं आता ही टीम या आयपीएलमध्ये (IPL 2021 PBKS Preview) उतरणार आहे.

पंजाबची बलस्थानं

केएल राहुल (KL Rahul), मयांक अग्रवाल (Mayank Agarwal),  ख्रिस गेल (Chris Gayle) आणि निकोलस पूरन (Nichoals Pooran) ही भक्कम टॉप ऑर्डर पंजाबकडं आहे. राहुल-मयांक सध्या मागच्या आयपीएल इतके फॉर्मात नाहीत. मात्र त्यांना फॉर्मात येण्यास वेळ लागणार नाही. या दोघांनी पुन्हा एकदा चांगली सुरुवात करुन दिली तर पंजाबची सुरुवात भक्कम होईल.

ख्रिस गेल आणि निकोलस पूरन हे T20  क्रिकेटला तयार झालेले दोन बॅट्समन पंजाबकडं आहेत. गेल वयाच्या 40 व्या वर्षातही मॅच विनर आहे. पूरनही T20 क्रिकेटमध्ये मोठं नाव होत आहे. या दोघांमध्ये काही वेळातच समोरच्या टीमच्या बॉलिंगवर हातोडा फिरवण्याची क्षमता आहे.

मोहम्मद शमी दुखापतीनंतर (Mohammed Shami) पुनरागमन करतोय. शमीकडं भक्कम अनुभव असून तो आता मॅचच्या शेवटच्या टप्प्यातही चांगली बॉलिंग करत आहे. अंडर 19 वर्ल्ड कपमधून पुढं आलेल्या रवी बिश्नोईनं मागील आयपीएलमध्ये आपण प्रयोगाला आणि दडपणाला घाबरत नाही, हे दाखवून दिलं (IPL 2021 PBKS Preview) होतं. या अनुभवानंतर तो यंदा आणखी वैविध्यासह या स्पर्धेत उतरणार यात शंका नाही.

मोईसेस हेन्रिके या अनुभवी ऑस्ट्रेलियन ऑल राऊंडरचं तीन वर्षांनंतर आयपीएलमध्ये कमबॅक होतंय. बिग बॅश विजेत्या सिडनी सिक्सर्सचा कॅप्टन असलेल्या हेन्रिक्सकडं T20 क्रिकेटचा मोठा अनुभव आहे. त्याचा हा अनुभव पंजाबला लोअर ऑर्डरमध्ये स्थिरता देऊ शकतो.

पंजाबच्या लोअर ऑर्डरमध्ये शाहरुख खान हा आश्वासक चेहरा आहे. शाहरुखमध्ये मोठे सिक्स मारण्याची क्षमती आहे. ते त्यानं देशांतर्गत क्रिकेटमध्ये सिद्धही केलं आहे. त्यानं नेट्समध्ये कोच अनिल कुंबळे (Anil Kumble) यांनाही प्रभावित केलं असून त्याच्याकडून पहिल्या मॅचपासून चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा पंजाबकडं आहे.

दिनेश कार्तिकला चॅम्पियन करणाऱ्या खेळाडूबद्दल कुंबळे म्हणतो, ‘हा तर आमचा पोलार्ड’

पंजाबच्या मार्गातील धोके

राहुल आणि मयांकचा फॉर्म हा पंजाबसाठी काळजीचा विषय आहे. मागच्या वर्षी राहुल फॉर्मात असतानाही त्याला 7 ते 16 ओव्हर्समध्ये वेगानं रन करता आले नव्हते. राहुलला ही समस्या यंदाही भेडसवण्याची शक्यता आहे.

पहिल्या चार बॅट्समननंतर पंजाबच्या बॅटींग ऑर्डरमध्ये मोठं नाव नाही. मनदीप आणि दीपक हुडा यांना आजवरचा सर्वोत्तम खेळ करावा लागेल. शाहरुख खान नवा आहे. त्यामुळे त्याच्यावर मोठ्या स्पर्धेचा दबाव येऊ शकतो. सर्फराजनंही आजवर निराशाच केली आहे. त्यामुळे इनिंग चांगली फिनिश करण्याचं पंजाबपुढे (IPL 2021 PBKS Preview) आव्हान असेल.

आरसीबी प्रमाणे पंजाबसमोर बॉलिंग ही देखील मोठी समस्या आहे. मोहम्मद शमी आणि ख्रिस जॉर्डन या दोघांनाच T20 क्रिकेटचा अनुभव आहे. त्यापैकी जॉर्डन बेभरवशाचा असून शमी दुखापतीनंतर पुनरागमन करतोय. अंतिम 11 मध्ये एकही अव्वल स्पिनर नसणे ही देखील अनिल कुंबळेच्या टीमची डोकेदुखी आहे.

IPL 2020 : कशी झाली किंग्ज इलेव्हन पंजाबची कामगिरी?

पंजाब किंग्जची टीम : के.एल. राहुल (कॅप्टन), मयांक अग्रवाल, ख्रिस गेल, मनदीप सिंग, प्रबसिमरन सिंग, निकोलस पूरन, दीपक हुडा, एम. अश्विन, रवी बिश्नोई, हरप्रीत बरार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, इशान पोरेल, दर्शन नळकांडे, ख्रिस जॉर्डन, डेव्हिड मलान, झाय रिचर्डसन, शाहरुख खान, रिले मेरडिथ, मोईसेस हेन्रिके, जलाज सक्सेना, उत्कर्ष सिंग, फॅबियन एलन आणि सौरभ कुमार

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: