फोटो – BCCI-IPL

इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या सिझनसाठी (IPL 2021) खेळाडूंच्या लिलावाची (IPL Auction) तारीख जाहीर झाली आहे. चेन्नईमध्ये 18 फेब्रुवारी रोजी हा लिलाव होणार आहे. IPL च्या अधिकृत ट्विट्स हँडलवरुन या लिलावाची घोषणा करण्यात आली आहे.

कुठे होणार आयपीएल?

ही आयपीएल स्पर्धा कुठे होणार याची अधिकृत घोषणा BCCI नं अद्याप केलेली नाही. BCCI अध्यक्ष सौरव गांगुली (Sourv Ganguly) य़ांनी यापूर्वी ही स्पर्धा भारतामध्ये होणार असल्याचे संकेत दिले आहेत. या स्पर्धेच्या आयोजनाचा निर्णय भारतामधील कोव्हिड परिस्थितीवर अवलंबून असेल. मागच्या वर्षी कोव्हिडमुळे आयपीएल स्पर्धेचं (IPL 2020) आयोजन सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये युएईमध्ये (UAE) करण्यात आलं होतं.

यंदा काही कारणांमुळे ही स्पर्धा भारतात झाली नाही तर तिचं आयोजन हे युएईमध्ये होणार आहे. मुश्ताक अली T20 स्पर्धा ही 31 जानेवारी रोजी संपणार आहे. या स्पर्धेनंतरच आयपीएल आयोजनाबाबत अंतिम निर्णय होईल.

( वाचा : Explained: राजस्थान रॉयल्सनं स्टीव्ह स्मिथची हकालपट्टी का केली? )

कोणत्या टीमकडं किती पैसे?

किंग्ज इलेव्हन पंजाबकडं (KIXP) या लिलावासाठी सर्वात जास्त 53 कोटी 20 लाख रुपये शिल्लक आहेत. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (RCB)  नंबर असून त्यांच्याकडं 35 कोटी 40 लाख बाकी आहेत. राजस्थान रॉयल्सकडं (RR) 34 कोटी 85 लाख तर चेन्नई सुपर किंग्सकडं (CSK) 22 कोटी 90 लाख रुपये बाकी आहेत.

या स्पर्धेचं पाचवेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या पर्समध्ये 15 कोटी 35 लाख रुपये शिल्लक आहेत. मागील स्पर्धेच्या उपविजेत्या दिल्ली कॅपिटल्सकडं 12 कोटी 90 लाख रुपये आहेत. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि सनरायझर्स हैदराबादकडं (SRH) सर्वात कमी  10 कोटी 75 लाख रक्कम बाकी आहे.

( वाचा : ‘आठ वर्षांपासून एकही IPL ट्रॉफी जिंकली नाही, तरी कॅप्टन कसा?’, गंभीरचा विराटला प्रश्न )

कोणत्या टीममध्ये किती जागा बाकी?

आयपीएल स्पर्धेच्या नियमानुसार प्रत्येक टीममधील खेळाडूंची किमान मर्यादा 18 तर कमाल मर्यादा 25 आहे. विदेशी खेळाडूंची मर्यादा 8 आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडं सर्वात जास्त 13 जागा (4 विदेशी) शिल्लक आहेत. त्यानंतर किंग्ज इलेव्हन पंजाब 9 जागा (5 विदेशी) यांचा नंबर आहे. त्यानंतर राजस्थान रॉयल्स 8 जागा (3 विदेशी), कोलकाता 8 जागा (2 विदेशी) असा क्रम आहे.

मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये 7 जागा (4 विदेशी) तर चेन्नईच्या टीमकडं 7 जागा (1 विदेशी) शिल्लक आहेत. दिल्ली कॅपिटल्सच्या टीममध्ये 6 जागा (2 विदेशी) शिल्लक आहेत. हैदराबादच्या आयपीएल टीममध्ये सर्वात कमी 3 जागा शिल्लक आहेत. या टीममध्ये विदेशी खेळाडूंसाठी अवघी एक जागा बाकी आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: