फोटो – ट्विटर/HoodaOnFire

आयपीएल स्पर्धेतील (IPL 2021) पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स (PBKS vs RR) ही सोमवारी झालेली लढत शेवटच्या बॉलपर्यंत रंगली. पंजाब किंग्जनं पहिल्यांदा बॅटींग करत 7 आऊट 221 रन काढले. पंजाबकडून कॅप्टन के.एल. राहुलनं (KL Rahul) सर्वात जास्त 91 रन काढले. त्याचबरोबर दीपक हुडानं (Deepak Hooda) 28 बॉलमध्ये 64 रनचं आक्रमक योगदान दिल्यानं पंजाबला 200 चा टप्पा ओलांडता आला.

बढतीचा फायदा

पंजाबचा स्कोअर 9.5 ओव्हर्सनंतर 2 आऊट 89 असा होता. ख्रिस गेल आऊट झाल्यानंतर वेस्ट इंडिजचा दुसरा तडाखेबंद बॅट्समन निकोलस पूरन बॅटींगला येईल असाच सर्वांचा अंदाज होता. त्यावेळी पंजाबच्या मॅनेजमेंटनं पूरनच्या जागी हुडाला बढती देण्याचा निर्णय घेतला.

हुडानं बॅटींगला येताच पंजाबनं टॉप गियर टाकला. 9 ते 16 ओव्हरच्या दरम्यान स्लो रनरेट ही पंजाबची मागील आयपीएलमधील समस्या होती. हुडानं आता टीमचं फक्क नाव बदललं नसून जुनी समस्या देखील संपली असल्याचं दाखवून दिलं. त्यानं मैदानात येताच राजस्थानच्या बॉलर्सची धुलाई सुरु केली.

त्यानं सुरुवातच फोर मारत केली. त्यानंतर शिवब दुबेच्या ओव्हरमध्ये दोन तर श्रेयस गोपालच्या ओव्हरमध्ये तीन सिक्स लगावले. या दोन ओव्हरनंतर तो 15 बॉलमध्ये 39 रनवर पोहचला होता. बांगलादेशच्या मुस्तफिजूल रहेमाननं हुडाला जीवदान दिलं. याचा फायदा घेत त्यानं आयपीएल लिलावातील सर्वात महागडा खेळाडू असलेल्या ख्रिस मॉरीसच्या बॉलिंगवर सिक्स लगावला. दीपक हुडानं (Deepak Hooda) फक्त 20 बॉलमध्ये 50 रन पूर्ण केले.

हुडानं त्याच्या हाफ सेंच्युरीमध्ये फोरपेक्षा जास्त सिक्स लगावले होते. त्यानं एक फोर आणि सहा सिक्सच्या मदतीनं आयपीएल करियरमधील तिसरी हाफ सेंच्युरी पूर्ण केली. या हाफ सेंच्युनंतरही हुडा थांबला नाही. त्यानं चेतन सकारियाच्या ओव्हरमध्ये सलग तीन फोर लगावले. अखेर 18 व्या ओव्हरमध्ये मॉरिसला एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात हुडा रियान प्रयागकडं कॅच देऊन आऊट झाला. यापूर्वी त्यानं कॅप्टन केएल राहुलसोबत 105 रनची वेगवान पार्टरनरशिप केली होती.

IPL 2021 PBKS Preview: नाव बदललं, आता खेळ बदलण्याचं आव्हान!

कॅप्टनशी झालं होतं भांडण

दीपक हुडासाठी (Deepak Hooda) मागील काही महिने खराब गेले होते. बडोद्याकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या हुडाचं सय्यद मुश्ताक अली स्पर्धेच्या दरम्यान टीमचा कॅप्टन कृणाल पांड्या (Krunal Pandya) बरोबर जोरदार भांडण झालं होतं. या भांडणातून त्यानं स्पर्धा न खेळताच टीममधून माघार घेतली होती.

या कारणामुळे बडोदा क्रिकेट असोसिएशननं हुडावर शिस्तभंगाची कारवाई करत त्याला निलंबितही केलं. त्या सर्व पार्श्वभूमीवर आयपीएलच्या पहिल्याच मॅचमध्ये झळकावलेली आक्रमक हाफ सेंच्युरी दीपक हुडासाठी दिलासादायक बाब आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading