फोटो – ट्विटर, बीसीआय, आयपीएल

11 मॅचमध्ये 11.62 च्या सरासरीनं 83 रन. 6 इनिंगमध्ये बॉलिंग केल्यानंतर फक्त 1 विकेट. ‘प्ले ऑफ’ मध्ये जाण्यासाठी झगडणाऱ्या राजस्थान रॉयल्सचा (RR) ऑल राऊंडर रियान परागची (Riyan Parag Rajasthan Royals) या आयपीएल सिझनमधील (IPL 2021) आजवरची आकडेवारी आहे. रियानसाठी हा आयपीएल सिझन निराशाजनक गेलाय. पण, तरीही राजस्थाननं त्याच्यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे.  

त्याचे वय पाहा

जगातील सर्वात टफ T20 लीगमध्ये गेल्या काही वर्षांपासून खेळणारा रियान हा फक्त 19 वर्षांचा आहे. आसाम या क्रिकेटच्या नकाशात फारसं अस्तित्व नसणाऱ्या राज्यातून तो पुढे आला आहे. त्याला आयपीएलचे कॉन्ट्रॅक्ट हे काही लॉटरी पद्धतीनं मिळालेलं नाही. त्यामागे त्याची गुणवत्ता कारणीभूत आहे.

राष्ट्रीय जलतरणपटूचा मुलगा असलेल्या रियानच्या घरात तो लहान असल्यापासूनच खेळाला पोषक वातावरण होते. त्यामुळे त्यानं खूप लहान वयात क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. त्याच्या वयापेक्षा मोठ्या गटात खेळणाऱ्या रियाननं वयाच्या 12 व्या वर्षी आसामच्या अंडर 16 टीमचं प्रतिनिधित्व केलं. त्यानंतर वर्षभरातच त्यानं अंडर 19 टीममध्ये जागा मिळवली. इतकच नाही तर वयाच्या 16 व्या वर्षी 2018 साली तो टीम इंडियाकडून अंडर 19 वर्ल्ड कप खेळला. त्यामुळेच त्याची 2019 साली राजस्थान रॉयल्सच्या टीमध्ये (Riyan Parag Rajasthan Royals) निवड झाली.

159 रन करुनही विराट कोहलीच्या टीमनं जिंकला होता वर्ल्ड कप, VIDEO

आयपीएल रेकॉर्ड

रियाननं त्याच्या पहिल्याच आयपीएल सिझनमध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (DC) हाफ सेंच्युरी झळकावली. त्यानं त्या मॅचमध्ये ट्रेंट बोल्ट, इशांत शर्मा, अमित मिश्रा आणि अक्षर पटेल यांचा सामना करत ही कामगिरी केली आणि टीमला विजय मिळवून दिला. त्याचबरोबर तो आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात हाफ सेंच्युरी झळकावणारा बॅटर बनला.

रियाननं मागच्या आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध (SRH) अडचणीच्या प्रसंगी 26 बॉलमध्ये 42 रनची खेळी करुन राजस्थानला विजय मिळवून दिला होता. राशिद खान आणि हैदराबादच्या अन्य बॉलर्सचा त्यानं त्या मॅचमध्ये शेवटच्या ओव्हर्समध्ये दबावात यशस्वी सामना केला होता.

रियान पराग हा एक लेग स्पिनर देखील आहे. ज्याचा वापर अजून कॅप्टननं पूर्ण क्षमतेनं केलेला नाही. तसंच चपळ फिल्डर देखील आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या मॅचमध्ये त्यानं याचं उदाहरण देत विराट कोहलीला (Virat Kohli) रन आऊट केलं होतं.

…त्याला वेळ द्यायला हवा

रियान परागकडं सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत आसामचा कॅप्टन म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ही जबाबदारी स्विकारताच त्यानं बंगाल विरुद्ध 54 बॉलमध्ये 77 रनची खेळी केली तसंच निर्णायक क्षणी 2 विकेट्स घेत टीमला बलाढ्य प्रतिस्पर्धी विरुद्ध विजय मिळवून दिला होता.

रियानचा नेहमीचा बॅटींग क्रमांक 4 आहे. मैदानात आल्यावर स्थिर होऊन नंतर आक्रमण खेळण्याचा त्याचा खेळ आहे. राजस्थानकडून तो सध्या सहाव्या क्रमांकावर येतो. तिथं त्याच्याकडून काही मोजक्या बॉलमध्ये 360 डिग्रीत खेळ करण्याची अपेक्षा केली जात आहे.

राजस्थान रॉयल्सला शेवटच्या ओव्हरमध्ये सनसनाटी विजय मिळवून देणारा कार्तिक त्यागी कोण आहे?

या आयपीएलमधील त्याच्या खराब कामगिरीमुळे 19 वर्षांच्या रियानचे मुल्यमापन करणे चूक आहे. या वयात अनेकांना राज्याच्या टीममध्ये जागा मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. तो आज त्याच्या राज्य टीमचा कॅप्टन आहे. तसंच राजस्थान रॉयल्स या आयपीएलमधील टीममधील एक चर्चित चेहरा आहे. त्यामुळे राजस्थानच्या मॅनेजमेंटनं त्याच्या गुणवत्तेला वाव मिळेल अशी संधी त्याला देणे, त्याच्यावर (Riyan Parag Rajasthan Royals) विश्वास ठेवणे आवश्यक आहे. त्यामधूनच राजस्थान रॉयल्स आणि टीम इंडियाला भविष्यात एक चांगला क्रिकेटपटू मिळू शकेल.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: