फोटो – सोशल मीडिया

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या इतिहासातील कागदावर भक्कम पण मैदानात निराशा करणारी टीम म्हणून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore, RCB) प्रसिद्ध आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील ही टीम कागदावर भक्कम आहे. मागच्या वर्षी ‘प्ले ऑफ’मध्ये प्रवेश करुन आरसीबीनं कामगिरीत सुधारणा केली आहे. पण बंगळुरुच्या फॅन्सचं विजेतेपदाचं भव्य स्वप्न पूर्ण करण्यासाठी आरसीबीला या सिझनमध्ये जोरदार कंबर कसावी लागणार (IPL 2021 RCB Preview) आहे.

आरसीबीची बलस्थाने

कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आणि मिस्टर 360 एबी डीव्हिलियर्स (AB de Villiers) ही आयपीएलमधीलच नाही तर क्रिकेट विश्वातील दोन मोठी नावं आरसीबीकडं आहेत.या दोन्ही खेळाडूंचा रेकॉर्ड आणि क्षमता याबद्दल माहिती नसलेला क्रिकेट फॅन कोणीही नसेल.

विराट आणि डीव्हिलियर्सच्या जोडीला यंदा ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) हा धडाकेबाज ऑस्ट्रेलियन यंदा आरसीबीकडं आला आहे. मॅक्सवेल चालला तर विराट आणि डीव्हिलियर्सवरील ताण बराच कमी होऊ शकतो. त्याचबरोबर विराट, डीव्हिलियर्स आणि मॅक्सवेल हे तीघंही एकत्र चालले तर आरसीबी ही या स्पर्धेतील सर्वात धोकादायक टीम ठरु शकते.

या तिघांच्या जोडीला देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal)  हा तरुण खेळाडू आरसीबीमध्ये आहे. पडिक्कलनं मागच्या आयपीएलमध्ये ठसा उमटवला होता. तसंच नुकत्याच झालेल्या विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy 2021) स्पर्धेतही त्यानं चार सलग सेंच्युरी झळकात जबरदस्त फॉर्मात असल्याचं दाखवून दिलं आहे. विराटसोबत पडिक्कल ओपनिंगला येणार आहे. त्यामुळे त्याला या स्पर्धेत पहिल्या बॉलपासून नैसर्गिक खेळ करण्याची संधी मिळेल.

( IPL 2021 RCB: बेभरवशाच्या आणि नव्या खेळाडूवर आरसीबीचा जुगार, रिस्क है तो…)

बंगळुरुच्या बॉलिंगची भिस्त ही वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) आणि युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) या स्पिनर्सवर असेल. सुंदरला पॉवर प्ले मध्ये तर चहलला मधल्या ओव्हर्समध्ये बॉलिंग करण्याचा भक्कम अनुभव आहे. त्याचबरोबर सुंदरचा बॅटींगमधील फॉर्म पाहता त्याचा काही मॅचमध्ये टॉप ऑर्डरमध्येही प्रयोग (IPL 2021 RCB Preview) होऊ शकतो.

न्यूझीलंडच्या कायले जेमिसन (Kyle Jamieson) याला आरसीबीनं मोठी रक्कम देऊन घेतलं आहे. जेमिसन आजवर भारतामध्ये खेळलेला नाही. भारतामधील कोऱ्या पाटीवर तो काय लिहितो यावरही आरसीबीच्या बॉलिंगचं भवितव्य अवलंबून असेल.

आरसबीच्या मार्गातील धोके

‘आत्मसंतुष्टता’ हा आरसीबीच्या वाटचालीतला मोठा धोका आहे. मागच्या आयपीएलमध्ये पूर्वार्धात चांगली सुरुवात केल्यानंतर त्यांचा खेळ अचानक ढेपाळला होता. त्याचबरोबर मोठ्या मॅचचं प्रेशरही आरसीबीला अनेकदा सहन होत नाही हा इतिहास (IPL 2021 RCB Preview) आहे.

आरसीबीला मागच्या आयपीएलमध्ये मिडल ओव्हर्समध्ये वेगानं रन काढता आले नव्हते. यंदा विराट ओपनिंग करणार आहे. त्यामुळे तो सुरुवातीलाच हात मोकेळे करु शकतो. पण विराट लवकर आऊट झाला तर नंतरच्या बॅट्समनवर पुन्हा प्रेशर वाढण्याची शक्यता आहे. डीव्हिलियर्सवर त्याचा अतिरिक्त ताण वाढेल. विराट आणि डीव्हिलियर्स या दोघांना सांभाळलं तर आरसीबीची टीम ब्ल़ॉक होते, ही त्यांची परंपरा आहे.

आरसीबीच्या टॉप ऑर्डरमध्ये अनेक दिग्गज चेहरे असले तरी त्यांच्या लोअर ऑर्डरमध्ये मोठा हिटर नाही. त्यामुळे ग्लेन मॅक्सवेलवरची जबाबदारी आणखी वाढली आहे. मॅक्सवेलचा आयपीएलमधील फॉर्म हे एक रहस्य आहे. ते रहस्य यावर्षी देखील कायम राहिलं तर आरसीबीची अडचण आणखी वाढू शकते.

आरसीबीकडं नवदीप सैनी (Navdeep Saini) आणि मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) हे दोन भारतीय बॉलर्स आहेत. या दोघांनीही मागच्या आयपीएलनंतर भारताकडून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पण त्यांच्याकडे T20 क्रिकेटमध्ये डेथ ओव्हर्समध्ये बॉलिंग करण्याचा अनुभव नाही. ख्रिस मॉरीसला आरसीबीनं यंदा सोडलं. त्यामुळे डेथ ओव्हर्समध्ये आरसीबीच्या बॉलिंगचा भार कोण वाहणार हा मोठा प्रश्न आहे.

( नवदीप सैनी : दर मॅचला 200 रुपये मानधन ते सिडनी टेस्टमधील सदस्य )

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची टीम : विराट कोहली, एबी डीव्हिलियर्स, युजवेंद्र चहल, देवदत्त पडिक्कल, वॉशिंग्टन सुंदर मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, अ‍ॅडम झम्पा, शाहबाज अहमद, फिन एलन ,केन रिचर्डसन पवन देशपांडे, ग्लेन मॅक्सवेल, कायले जेमिसन, डॅन ख्रिस्टीयन, डॅनियल सॅम्स, हर्षल पटेल, सचिन बेबी, रजत पाटीदार, केएस भरत, मोहम्मद अझहरुद्दीन आणि सुयश प्रभूदेसाई

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: