फोटो – ट्विटर / @RCBTweets

दरवर्षी आयपीएल (IPL) स्पर्धा सुरु होण्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची (RCB) हवा असते. टीममधील बऱ्याच रिक्त जागा भरण्यासाठी ते यंदा देखील ऑक्शन टेबलवर सक्रीय होते. ग्लेन मॅक्सवेल, ख्रिस मॉरीस, कायले जेमिसन, झाय रिचर्डसन या चार विदेशी खेळाडूंसाठी त्यांनी जोरदार बोली (RCB 2021) लावली. यापैकी दोन खेळाडूंना घेण्यात ते यशस्वी झाले. शेवटच्या टप्प्यात त्यांनी शाहरुख खानला टीममध्ये घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तो यशस्वी झाला नाही, म्हणून काही भारतीय खेळाडूंना त्यांनी करारबद्ध केलं.

विराटची प्रतिक्रिया

आरसीबीचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli)  टीममधील नव्या खेळाडूंबाबत भलताच उत्साहित आहे. ‘आम्हाला हवं ते मिळालं’ या शब्दात त्यानं आनंद व्यक्त केला आहे. मागचा सिझन टीममसाठी चांगला होता. आता या सिझनमध्ये आणखी काही पावलं पुढं टाकण्याचं मनोरथ त्यानं बोलून दाखवलं आहे.

रिस्क है तो…

विराट कोहली आणि आरसीबीचे फॅन्स नेहमीप्रमाणे उत्साहात आहेत. त्यांची ऑक्शन टेबलवरील कामगिरी पाहिली तर बेभरवशाच्या आणि नव्या खेळाडूंवर आरसीबीनं यंदा जुगार खेळून रिक्स घेतली आहे, हे लक्षात येतं.

बेभरवशाच्या खेळाडूचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) आहे. मॅक्सवेलला घेण्यासाठी कोहली आणि धोनीच्या टीममध्ये जोरदार वॉर झालं. त्यामध्ये अखेर कोहलीच्या टीमनं बाजी मारली. मॅक्सवेलची आरसीबीकडून खेळण्याची इच्छा (RCB 2021)  होती. त्याला टीममध्ये घेऊन विराट आणि एबीडी जोडीचा ताण कमी करण्याचा आरसीबीचा प्रयत्न आहे. मॅक्सवेलनं मागच्या आयपीएल सिझनमध्ये (IPL 2020) 13 मॅचमध्ये फक्त 108 रन काढले. त्याला संपूर्ण स्पर्धेत एकही सिक्स मारता आला नाही. आजवर एकाही आयपीएलमध्ये त्याला सातत्यपूर्ण खेळ करता आलेला नाही. अशा मॅक्सवेलवर आरसीबीनं मोठी बोली लावली आहे.

( वाचा : IPL 2020 मधील खराब कामगिरीचे मॅक्सवेलने सांगितले कारण… )

मॅक्सवेलसोबतच डॅन ख्रिस्टियनने (Dan Christian) या आणखी एका ऑस्ट्रेलियन ऑल राऊंडरला आरसीबीनं करारबद्ध केलं आहे. ख्रिस्टियन यावर्षी बिग बॅश लीगमध्ये चांगल्या फॉर्मात होता. त्यानं जगभरात भरपूर T20 क्रिकेट खेळलं आहे. विविध T20 लीगच्या 10-12 विजेत्या टीमचा तो सदस्य आहे. तो यापूर्वीही आयपीएल खेळला आहे. पण, तेंव्हा त्याला फार कमाल करता आली नव्हती. आता मोठ्या गॅपनंतर आणि कारकीर्दीच्या उत्तरार्धात तो भारतात T20 क्रिकेट खेळणार आहे.

कायले ठरेल कातिल?

कायले जेमिनसन (Kyle Jamieson) हा यंदा फॉर्मात असलेला न्यूझीलंडचा उंचापुरा फास्ट बॉलर ऑलराऊंडरही आरसीबीनं मोठ्या किंमतीत घेतला आहे. ख्रिस मॉरीसला स्वस्तात परत घेण्याची त्यांची योजना फसली. त्यामुळे त्यानं मागील वर्षी मॉरीसला मोजलेल्या पैशांपेक्षा जास्त किंमत जेमिनसनसाठी आरसीबीनं मोजली.

जेमिनसनं पाकिस्तानची झोप उडवली होती. त्याला भावी आंद्रे रसेल म्हंटलं जातं. पण हे सर्व त्यानं न्यूझीलंडमध्ये केलं आहे. भारतात आजवर एकदाही न खेळलेल्या या नव्या खेळाडूला मोठी रक्कम देऊन आरसीबीनं मोठी रिस्क घेतली आहे.

आरसीबीनं जेमिनसनप्रमाणेच मोहम्मद अझहरुद्दीन, के.एस. भरत यांच्यासह आणखी काही भारतीय खेळाडू खरेदी (RCB 2021) केले आहेत. यापैकी अझहरुद्दीनचा वापर ते ओपनर म्हणून करु शकतात. तर टीममच्या मीडल ऑर्डरसाठी त्यांना या नवोदित खेळाडूंवर विसंबून राहवं लागणार आहे.

( वाचा : IPL 2020 : आरसीबीसाठी पहिले पाढे (नेहमीच) पंचावन्न! )

एकूणच आरसीबीनं बेभरवशाच्या आणि नवोदीत खेळाडूंवर यंदा जुगार लावून रिस्क घेतली आहे. ही ‘रिस्क’ त्यांना पहिलं विजेतेपद मिळवून आरसीबी फॅन्सच्या टीमवरील ‘इश्क’ ला यश देते का हे काही महिन्यात स्पष्ट होईल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची टीम : विराट कोहली, एबी डीव्हिलियर्स, युजवेंद्र चहल, देवदत्त पडिक्कल, वॉशिंग्टन सुंदर मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, अ‍ॅडम झम्पा, शाहबाज अहमद, जोश फिलिप, केन रिचर्डसन पवन देशपांडे, ग्लेन मॅक्सवेल, कायले जेमिसन, डॅन ख्रिस्टीयन, सचिन बेबी, रजत पाटीदार, केएस भरत, मोहम्मद अझहरुद्दीन आणि सुयश प्रभूदेसाई

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: