
विराट कोहलीची (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) ही तीन मॅचनंतर या आयपीएल सिझनमधील (IPL 2021) एकमेव अपराजित टीम आहे. या टीमच्या विजयामध्ये ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) आणि एबी डीव्हिलियर्स (AB de Villiers) या दोन अनुभवी बॅट्समनचा मोठा वाटा आहे. या जोडीनं (Maxwell – ABD) कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (Kolkata Knight Riders) झालेल्या मॅचमध्ये विजयात मोठं योगदान दिलं. त्याचबरोबर एक आयपीएल रेकॉर्ड देखील केला.
RCB ला सावरलं आणि KKR ला तुडवलं
केकेआरचा मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) याने एकाच ओव्हरमध्ये दोन विकेट्स घेत आरसीबीला मोठा धक्का दिला होता. दुसऱ्याच ओव्हरमध्ये आरसीबीची अवस्था 2 आऊट 9 अशी झाली त्यावेळी मॅक्सवेल मैदानात आला. या स्पर्धेत मॅक्सवेल फॉर्मात आहे. त्यानं सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या मॅचमध्ये (RCB vs SRH) पाच वर्षांनी आयपीएल हाफ सेंच्युरी झळकावली होती. फॉर्मात असल्यानं आत्मविश्वास वाढलेल्या मॅक्सवेलनं अवघड परिस्थितीतही त्याच्या नैसर्गिक खेळाला मुरड घातली नाही.
मॅक्सवेलनं सुरुवातीपासूनच केकेआरच्या बॉलर्सची धुलाई केली. देवदत्त पडिक्कल दुसऱ्या बाजूला शांत असतानाही मॅक्सवेलचा धडाका सुरु होता. त्यामुळे आरसीबीची इनिंग कुठंही संथ झाली नाही. मॅक्सवेलनं पडिक्कलसोबत तिसऱ्या विकेटसाठी 86 रनची पार्टनरशिप केली.
दिग्गजांची जुगलबंदी
देवदत्त पडिक्कल आऊट झाल्यानंतर मॅक्सवेल आणि डीव्हिलियर्स (Maxwell – ABD) ही जोडी जमली. या जोडीनं चौथ्या विकेटसाठी 53 रनची वेगवान पार्टरनरशिप केली. अखेर मॅक्सवेलला पॅट कमिन्सनं आऊट केलं. त्यापूर्वी त्यानं 49 बॉलमध्ये 9 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीनं 78 रन काढले होते.
‘RCB मध्ये गेल्यानंतर काय जादू झाली?’ मॅक्सवेलनं सांगितलं रहस्य
मॅक्सवेल आऊट झाल्यानंतर डीव्हिलियर्सनं (नेहमीप्रमाणे) आरसीबीच्या इनिंगची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेतली. डीव्हिलियर्सच्या फटकेबाजीमुळे आरसीबीनं शेवटच्या 24 बॉलमध्ये 56 रन काढले. मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध आधीच्या मॅचमध्ये 5 विकेट्स घेणाऱ्या आंद्रे रसेलला (Andre Russell) डीव्हिलियर्सनं विशेष टार्गेट केले. डीव्हिलियर्सनं त्याच्या 2 ओव्हर्समध्ये 5 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीनं 38 रन काढले.
डीव्हिलियर्सनं फक्त 34 बॉलमध्ये 9 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीनं नाबाद 76 रन काढले. त्याच्या फटकेबाजीमुळेच आरसीबीला निर्धारित 20 ओव्हरमध्ये 4 आऊट 204 पर्यंत मजल मारली. त्याचबरोबर मॅक्सवेल-डीव्हिलियर्स जोडीनं (Maxwell – ABD) एक खास रेकॉर्डही केला आहे. या दोघांनी आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच चौथ्या आणि पाचव्या नंबरवर येऊन एकाच मॅचमध्ये 75 पेक्षा जास्त रन केले. आयपीएल स्पर्धेत पहिल्यांदाच चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाच्या बॅट्समननं एकाच मॅचमध्ये 75 पेक्षा जास्त रन केले आहेत.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.