फोटो – BCCI/IPL

IPL 2021 कोरोना व्हायरसमुळे अचानक अनिश्चित काळासाठी स्थगित झाली. ही स्पर्धा आता होणार का? झाली तर कुठे होणार? हे प्रश्न क्रिकेट फॅन्सना सतावत होते. आयपीएल स्पर्धा स्थगित झाली, त्याच दिवशी म्हणजे 4 मे 2021 रोजी ही स्पर्धा सप्टेंबर महिन्यात पुन्हा होईल आणि भारतामध्ये झाली नाही, तर UAE मध्ये होईल अशी बातमी ‘Cricket मराठी’ ने दिली होती. बीसीसीआयच्या शनिवारी झालेल्या विशेष बैठकीमध्ये ‘Cricket मराठी’ ने महिनाभरापूर्वी दिलेल्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले आहे. आता य स्पर्धेच्या उर्वरित 31 मॅच यूएईमध्ये (IPL 2021 In UAE) होणार असून त्याला सप्टेंबरमध्ये सुरुवात होणार आहे.

आता त्यानंतर स्वाभाविकच या स्पर्धेचं वेळापत्रक काय असेल? हा प्रश्न सर्वांना पडला आहे. BCCI नं त्याची योजना तयार केली आहे. ही योजना ‘Cricket मराठी’ तुम्हाला सांगणार आहे. ती सांगण्यापूर्वी खालील लिंकवर क्लिक करुन आपली जूनी बातमी वाचा.

IPL 2021 पुन्हा होणं शक्य आहे? वाचा काय आहेत BCCI समोरचे पर्याय

काय आहे वेळापत्रक?

आयपीएलचे नव्या वेळापत्रक बीसीसीआयने सर्व फ्रँचायझींशी बोलून निश्चित केले आहे. पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (PBKS vs DC) या 2 मे रोजी झालेल्या मॅचनंतर आयपीएल 2021 मध्ये एकही मॅच झालेली नाही. उर्वरित मॅच रद्द झाल्या असत्या तर बीसीसीआयला 2500 कोटींचे नुकसान झाले असते. आता हे नुकसान टाळण्यासाठी तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं व्यस्त वेळापत्रक लक्षात घेऊन नवे वेळापत्रक तयार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

24 दिवसांमध्ये होणार 31 मॅच

आयपीएलच्या उर्वरित 31 मॅचसाठी (IPL 2021 In UAE) BCCI ने 24 दिवसांचा कालवधी निश्चित केला आहे. 17 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर रोजी या स्पर्धेचा उत्तरार्ध रंगेल. 17 सप्टेंबर रोजी शुक्रवार असून 10 ऑक्टोबर रोजी रविवारी या सिझनची फायनल होणार आहे.

इंग्लंड दौऱ्यावरील टीम इंडियाचे खेळाडू 14 सप्टेंबर रोजी फ्री होतील. त्यानंतर ते विशेष विमानानं युएईला येतील. त्यांच्यासाठी बायो-बबल ते बायो-बबल हस्तांतर योजनेला यूएई सरकार मान्यता देईल असा बीसीसीआयला विश्वास आहे. इंग्लंड दौऱ्यावर न गेलेले खेळाडू यूएई सरकारच्या नियमाप्रमाणे क्वारंटाईन कालावधी पूर्ण करतील.

IPL 2021 स्थगित झाल्यानं ‘या’ 5 फ्लॉप स्टार्सनी सोडला सुटकेचा निश्वास

4 शनिवार – रविवार मिळणार

उर्वरित आयपीएल 17 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीमध्ये झाले तर 4 शनिवार – रविवारचा वापर बीसीसीआयला करता येणार आहे. शनिवार-रविवार डबल हेडर (एकाच दिवशी दोन मॅच असतील) आयपीएल ‘प्ले ऑफ’ च्या 4 मॅचसाठी 7 दिवस राखून ठेवण्यात आले आहेत. या मॅच 4 ऑक्टोबर रोजी सुरु होतील.

खेळाडूंना पर्याय शोधणार

आयपीएल 2021 चा उर्वरित सिझन इंग्लंडचे खेळाडू खेळणार नाहीत, हे त्यांच्या बोर्डाने (ECB) स्पष्ट केले आहे. याबाबत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी बीसीसीआय पुन्हा एकदा इंग्लंड बोर्डाशी चर्चा करुन काही मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहे. इंग्लंड बोर्ड निर्णयावर ठाम राहिले तर त्यांना पर्याय म्हणून अन्य खेळाडूंना करारबद्ध करण्याची परवानगी (IPL 2021 In UAE) सर्व फ्रँचायझींना दिली जाणार आहे. उर्वरित सीझन न खेळणाऱ्या सर्व खेळाडूंना आर्थिक फटका बसणार आहे.

इंग्लंडचे खेळाडू न आल्यास अन्य खेळाडूंना करारबद्ध करण्यासाठी फ्रँचायझींकडे अजून पुरेसा वेळ आहे. उर्वरित आयपीएलमध्ये जितके खेळाडू खेळणार नाहीत त्यापेक्षा जास्त खेळाडू खेळण्यास उत्सुक आहेत.

मुंबई इंडियन्सने राजस्थानला दाखवले TARE, शांत द्रविडही संतापला

पॉईंट टेबलची स्थिती काय?

आयपीएल स्पर्धा स्थगित होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सची (DC) टीम पाँईट टेबलमध्ये 12 पॉईंट्ससह टॉपवर होती.  तर सनरायझर्स हैदराबादची (SRH) टीम 7 मॅचमध्ये अवघे 2 पॉईंट्स मिळवून शेवटच्या नंबरवर आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: