फोटो – ट्विटर

एखादी अगदी रंगात आलेली मैफील अचानक थांबल्यानंतर जी भावना होते तशीच भावना आयपीएल स्पर्धेच्या (IPL 2021) पूर्वार्धात क्रिकेट फॅन्सची झाली होती. संपूर्ण देशात कोरोना व्हायरसचा धोका शिगेला असताना आयपीएलच्या बायो-बबलमध्येही कोरोनाचा शिरकाव झाला. त्यामुळे 29 मॅचनंतर आयपीएल स्पर्धा रद्द करावी लागली. आता पुन्हा एकदा या वर्षाच्या उत्तरार्धात आयपीएल (IPL 2021 Returns) ही स्पर्धा यूएईमध्ये रंगणार आहे.

हाय व्होल्टेज मॅचनं सुरुवात

आयपीएल स्पर्धेचा माहोल पहिल्या मॅचपासून बनवायचा असेल तर मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Mumbai Indians vs Chennai Super Kings) यासारखी मॅच नाही. आयपीएलमधील दोन सर्वात यशस्वी टीम, सर्वाधिक फॅन बेस असलेल्या टीम, हुशार कॅप्टन आणि तुल्यबळ खेळाडू यांचा समावेश असलेल्या या टीममधील लढती (MI vs CSK) नेहमीच रंगतदार होतात, असा इतिहास आहे.

कायरन पोलार्डच्या पराक्रमानं मागील मॅचमध्ये मुंबई इंडियन्सनं (MI) चेन्नई सुपर किंग्स (CSK) पराभव केला होता. रोहित शर्मानं त्या मॅचचं वर्णन त्याचा सहभाग असलेली एक सर्वोत्तम T20 मॅच असं केलं होतं. पहिल्या हाफमध्ये झगडत असलेल्या मुंबईला आता आयपीएल यूएईमध्ये परतल्यानं दिलासा मिळाला आहे. तर चेन्नईसाठी मात्र टीम लयात असताना आलेला ब्रेक हा काळजी घेऊन आलाय. त्यांना त्यांच्या प्रमुख खेळाडूच्या फिटनेसची चिंता (IPL 2021 Returns) आहे.

पहिल्यांदाच आयपीएल खेळणारे हे 3 खेळाडू ठरणार गेमचेंजर!

धोनीला 2 दिग्गजांची चिंता

सीएसकेचा ओपनिंग बॅट्समन आणि टीमकडून फर्स्ट हाफमध्ये सर्वाधिक रन काढणारा फाफ ड्यू प्लेसिस (Faf Du Plessis) गेल्या काही महिन्यांपासून खराब फिटनेसाचा सामना करत आहे. त्याला फिटनेसमुळेच हंड्रेड स्पर्धा (The Hundred 2021) खेळता आली नव्हती. तसंच कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये (CPL 2021) शेवटच्या तीन मॅच तो खेळला नव्हता. फाफ चेन्नईच्या प्रॅक्टीसमध्ये सहभागी झाला होता. पण त्याच्या खेळण्याबाबतचा निर्णय शेवटच्या क्षणी होईल. तो खेळला नाही तर रॉबिन उथप्पाला चेन्नईकडून पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.

सीपीएल स्पर्धा जिंकून जोशात असलेला सेंट किट्सचा कॅप्टन ड्वेन ब्राव्हो (Dwayne Bravo) देखील पूर्ण फिट नाही. तो दुखापतीमुळे सीपीएलमधील काही मॅच खेळला नव्हता. तसंच त्यानं मागील 5 मॅचमध्ये बॉलिंग केलेली नाही.धोनीला डेथ ओव्हर्समध्ये त्याची चिंता सतावणार आहे.

त्याचबरोबर चेन्नईचा आणखी एक भरवशाचा ऑल राऊंडर सॅम करन (Sam Curran) 15 सप्टेंबर रोजी यूएईत दाखल झालाय. त्याचा क्वारंटाई कालावधी अद्याप संपलेला नसल्यानं तो मुंबई विरुद्धची मॅच खेळू शकणार नाही. चेन्नईच्या टीमनं पहिल्या हाफमध्ये जोरदार कामगिरी केलीय. अनुभवी धोनी आणि रैना ही जोडी देखील या हाफमध्ये फॉर्मात आली तर पहिल्या मॅचपासून (IPL 2021 Returns) चेन्नईचा विजयरथ दौडू लागेल.

मुंबई इंडियन्सचा Josh High

आयपीएल विजेतेपदाची हॅट्ट्रिक पूर्ण करण्याच्या इराद्यानं रोहित शर्माची (Rohit Sharma) मुंबई इंडियन्स स्पर्धेच्या उत्तरार्धात उतरणार आहे. मागील वर्षी यूएईमध्ये झालेल्या आयपीएलमध्ये मुंबईनं सुरुवातीपासूनच लय पकडली होती. स्लो स्टार्ट करण्याची सवय असलेल्या या टीमला आयपीएल पुन्हा यूएईमध्ये परतल्यानं (IPL 2021 Returns) या रम्य आठवणी उभारी देणाऱ्या आहेत.

सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), इशान किशन (Ishan Kishan) आणि राहुल चहर (Rahul Chahar) या मुंबईच्या खेळाडूंची T20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात निवड झाली आहे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास सध्या उंचावर असेल. ऑल राऊंड हार्दिक पांड्याचा (Hardik Pandya) फॉर्म आणि फिटनेस चांगला असणं आगमी T20 वर्ल्ड कपसाठी आवश्यक आहे. त्यामुळे त्याच्या खेळाकडं संपूर्ण देशाचं लक्ष असेल.

यशस्वी भव! T20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया जाहीर, 15 जणांच्या ‘विराट’ सेनेवर इतिहास घडवण्याची जबाबदारी

मुंबई इंडियन्सकडे रोहित शर्मा, कायरन पोलार्ड आणि जसप्रीत बुमराह हे तीन खेळाडू चांगल्या फॉर्मात आहेत. त्याचबरोबर द हंड्रेड स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारा अ‍ॅडम मिल्ने हा देखील मुंबईकडं आहे. तो या मॅचमध्ये तिसरा फास्ट बॉलर म्हणून खेळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर चेन्नईकडे असलेली डावखुऱ्या बॅट्समनची असलेली गर्दी लक्षात घेता जयंत यादवला खेळवण्याचा प्रयोगही रोहित शर्मा या मॅचमध्ये (IPL 2021 Returns) करु शकतो.

मुंबई इंडियन्सची संभाव्य टीम: रोहित शर्मा (कॅप्टन), क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड, कृणाल पांड्या, अ‍ॅडम मिल्ने/जयंत यादव, राहुल चहर, जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट

चेन्नई सुपर किंग्सची संभाव्य टीम : ऋतुराज गायकवाड, फाफ ड्यू प्लेसिस/रॉबिन उथप्पा, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन), ड्वेन ब्राव्हो, दीपक चहल, शार्दुल ठाकूर आणि लुंगी एन्गिडी

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading