फोटो – ट्विटर/DelhiCapaitals

मुंबईकर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) कडून दिल्ली कॅपिटल्सला यंदा (Delhi Capitals) खूप अपेक्षा आहेत. पृथ्वीनं यंदा विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy 2021) सर्वात जास्त 827 रन केले होते. हा विजय हजारे स्पर्धेच्या एका सिझनमधील रेकॉर्ड आहे. त्यामुळे या आयपीएल सिझनमध्ये (IPL 2021) पृथ्वीचा तोच फॉर्म कायम असेल, अशी दिल्लीला आशा आहे. पृथ्वी मागच्या आयपीएलमध्ये अजिबात फॉर्मात नव्हता. खराब फॉर्म असताना पृथ्वीचं काय चुकत होतं? हे दिल्ली कॅपिटल्सचा कोच रिकी पॉन्टिंग (Ponting On Prithvi) याने सांगितलं आहे.  

ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्ड चॅम्पियन टीमचा कॅप्टन असलेला रिकी पॉन्टिंग (Ricky Ponting) गेल्या दोन वर्षांपासून दिल्ली कॅपिटल्सचा कोच आहे. त्यानं एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये पृथ्वी शॉ बद्दल (Ponting On Prithvi) अजब दावा केला आहे.

काय म्हणाला पॉन्टिंग?

मागच्या सिझनमध्ये पृथ्वी शॉ खराब फॉर्ममध्ये होता. ‘त्यानं चांगली कामगिरी करावी म्हणून कोणत्या पद्धतीनं त्याला शिकवता येईल हे मला समजून घ्यायचं होतं. मात्र मागच्या वर्षी त्याची बॅटींग बद्दल एक अजिब थेअरी होती. तो जेंव्हा फॉर्मात होता त्यावेळी त्याला सतत बॅटींग हवी होती. तर फॉर्मात नसताना तो बॅटींग करण्यास तयार नसे. मागच्या सिझनमध्ये त्यानं चार-पाच मॅचमध्ये 10 पेक्षा कमी रन बनवले. त्यावेळी मी त्याला नेट्समध्ये जाऊन नेमकं काय चुकत आहे, याचा शोध घेऊ असं म्हणालो. त्यावेळी त्यानं माझ्या डोळ्यात पाहिलं आणि मी आज बॅटींग करणार नाही, असं सांगितलं’ असा दावा पॉन्टिंगनं (Ponting On Prithvi केला आहे.

पॉन्टिंग पुढे म्हणाला की, ‘मला त्याचं वागणं काही समजली नाही. आता कदाचित सर्व बदललं असेल. गेल्या काही महिन्यात त्यानं बरंच काम केलं आहे. आता त्याने त्याची थेअरी बदलली असावी. आम्ही त्याच्याकडून चांगला खेळ करुन घेऊ शकलो तर तो एक सुपरस्टार खेळाडू बनू शकतो.’

( वाचा : IPL 2021 DC : दिल्ली कॅपिटल्सच्या एक पाऊल पुढे टाकण्यातील अडथळे कायम! )

कसा होता पृथ्वीचा फॉर्म?

पृथ्वी शॉ ने मागच्या सिझनमध्ये दोन हाफ सेंच्युरी झळकावून सुरुवात तर चांगली केली होता. पण त्यानंतर त्याचा फॉर्म घसरला. त्यानं 13 मॅचमध्ये 17.53 च्या सरासरीनं 228 रन काढले होते. फास्ट बॉलर्ससमोर त्याचं तंत्र वारंवार उघडं पडत होतं. शेवटच्या आठ मॅचमध्ये तर त्याला फक्त 20 रन काढता आले.

आयपीएल स्पर्धेतनंतर भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या टेस्टमध्येही पृथ्वी अपयशी ठरला. त्यानंतर त्याची टीम इंडियामधील जागा केली. आता यावर्षी श्रेयस अय्यरच्या (Shreys Iyer) अनुपस्थितीमध्ये पृथ्वीवर दिल्ली कॅपिटल्सची मोठी भिस्त आहे. दिल्ली कॅपिटल्सची पहिली मॅच 10 एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्स (CSK) विरुद्ध होणार आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: