फोटो – ट्विटर, विराट कोहली

Ee Sala Cup Namde (या वर्षी कप आमचा आहे) म्हणून दरवर्षी सुरु होणारी आरसीबीची गाडी यावेळी देखील (IPL 2021 RCB Review) त्याच वळणावर फसली. आरसीबीसाठी हे वर्ष 2016 नंतरचं चांगलं वर्ष होतं. त्यांनी 14 पैकी 9 लीग मॅच जिंकल्या. भारतात आणि यूएईमध्ये दोन्ही ठिकाणी चांगली कामगिरी केली. नव्या खेळाडूंनी विश्वास सार्थ ठरवला. विराट कोहलीचा (Virat Kohli) आरसीबी कॅप्टन म्हणून हा शेवटचा आयपीएल सिझन होता. त्यामुळे आरसबी फॅन्ससाठी यंदाचं वर्ष भावनिक होतं. चांगली कामगिरी करणारी टीम कॅप्टनला कप जिंकून देऊन निरोप देईल, अशी त्यांची आशा होती. पण त्यांचा शेवट नेहमीसारखाच झाला.

दमदार कामगिरी

आरसीबीनं या स्पर्धेत सुरूवात दमदार केली. पहिल्या चार मॅच सरळ जिंकल्या. चेन्नई लेगमध्ये टीम अपराजित राहिली. एबी डिविलियर्स (AB de Villiers ) आणि ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) जोडी जोरात होती. हर्षल पटेल (Harshal Patel) हा नवा डेथ बॉलर टीमला मिळाला होता. त्याला महागड्या कायले जेमिसनची साथ मिळत होती.

मॅक्सवेल-डिव्हिलियर्सची जुगलबंदी, आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच झाला ‘हा’ रेकॉर्ड

आरसीबीचा मागच्या सिझनमधील स्टार देवदत्त पडिक्कलनं (Devdutt Padikkal) मुंबईत राजस्थान रॉयल्स विरुद्ध सेंच्युरी झळकावली. शाहबाज अहमदनं एक मॅच आरसीबीला जिंकून दिली. चेन्नई सुपर किंग्स (CSK vs RCB) विरुद्ध रवींद्र जडेजाचा (Ravindra Jadeja) फटका बसल्यानंतर आरसीबीची गाडी पुन्हा घसरू लागली (IPL 2021 RCB Review)  होती. त्यावेळी कोरोना ब्रेकमुळे स्पर्धा थांबली.

यूएईमध्ये कमबॅक

यूएईममधील आयपीएल सिझनमध्ये आरसीबीची सुरूवात धक्कादायक झाली. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध (KKR vs RCB) टीम फक्त 92 रन काढून ऑल आऊट झाली. त्यानंतर चेन्नई विरुद्धची मॅचही आरसीबीनं मोठ्या फरकानं गमावली.

या दोन पराभवानंतरही आरसीबीनं कमबॅक केलं. हर्षल पटेलच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर मुंबई इंडियन्सचा पराभव केला. राजस्थान रॉयल्सला मोठ्या फरकानं हरवलं. पंजाब किंग्ज विरुद्ध आणिबाणीच्या क्षणी चांगला खेळ करत प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. हैदाराबादमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये पराभव झाला. त्याचा वचपा भरतनं दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध शेवटच्या बॉलवर सिक्स लगावत काढला. आरसीबीनं दिल्लीचा सनसनाटी पराभव केला.

आयपीएल ‘प्ले ऑफ’ (IPL 2021 Playoff) मध्ये मोठ्या अपेक्षेनं प्रवेश केलेल्या आरसीबीनं कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध मात्र चुकांवर चुका केल्या. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा मागच्या वर्षीप्रमाणेच चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं (IPL 2021 RCB Review) लागलं.

विराटनंतर RCB चा कॅप्टन कोण होणार? 3 जणांची नावं सर्वात आघाडीवर

काय चांगलं घडलं?

विराट आणि एबीडी म्हणजे आरसीबी. हे नेहमीचं समीकरण यंदा बदललं. ग्लेन मॅक्सवेलला आरसीबीनं मोठी किंमत देऊन खरेदी केलं. आश्चर्य म्हणजे मॅक्सवेलनंही आरसबीला घसघशीत रिटर्न्स दिले. 2012 ते 20 या काळात 6 हाफ सेंच्युरी झळकावणाऱ्या मॅक्सवेलनं यंदा एकाच सिझनमध्ये 6 हाफ सेंच्युरी झळकावल्या. विराट आणि एबीडी असल्यानं मॅक्सवेलवर यापूर्वीच्या आयपीएल टीममध्ये असतं तसं प्रेशर नव्हतं. त्यामुळे त्यानं सुरुवातीचे काही बॉल स्थिर होण्यास घेतले आणि नंतर दमदार खेळ केला.

मॅक्सवेल प्रमाणेच हर्षल पटेलनंही आरसीबीला घसघशीत रिटर्न दिले. त्यानं एका आयपीएल सिझनमध्ये सर्वाधिक 32 विकेट्स घेण्याच्या ड्वेन ब्राव्होच्या रेकॉर्डची बरोबरी केली. डेथ ओव्हर्समध्ये भरपूर रन देणे ही आरसीबीच्या बॉलर्सची सवय यंदा मोडली त्याला हर्षल पटेलची कामगिरी जबाबदार आहे. हर्षलला मोहम्मद सिराजनंही चांगली साथ दिली. केकेआर विरुद्ध शेवटच्या ओव्हर्समध्ये त्यानं रसेलविरुद्ध अचूक बॉलिंग केली.

0,0,0,0,0,1 आंद्रे रसेलला जखडून ठेवणारे मोहम्मद सिराजचे सहा बॉल काय सांगतात?

काय बिनसलं?

विराट कोहलीचा फॉर्म हा आरसीबीसाठी चिंताजनक विषय ठरला. संपूर्ण स्पर्धेत ओपनिंग करणाऱ्या विराटनं यंदा फक्त 3 हाफ सेंच्युरी झळकावल्या. तसंच त्याची सरासरी ही 28.92 म्हणजे विराटच्या दर्जापेक्षा बरीच कमी होती. विराटनं एकट्याच्या बळावर टीमला एकही मॅच जिंकून दिली नाही. पॉवर प्लेमध्ये दमदार सुरुवात केल्यानंतरही पुन्हा स्लो खेळण्याची त्याची सवय यंदाही कायम होती. केकेआरविरुद्ध निर्णायक लढतीत त्याचा आरसीबीला फटका (IPL 2021 RCB Review) बसला.

भारतामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या एबीडीचा फॉर्म यूएईमध्ये पार हरपला. स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर राहणाऱ्या एबीडीला प्रत्येक मॅचमध्ये स्थिरावण्यासाठी काही बॉल देणे आवश्यक होते. ते आरसीबीनं दिलेच नाहीत. फक्त 4 बॅटर्स घेऊन खेळण्याची आरसीबीची सवय नडली. मॅक्सवेलला तिसऱ्या आणि एबीडीला चौथ्या नंबरवर त्यांनी खेळवलं नाही. तिसऱ्या क्रमांकावर भारतीय अनकॅप बॅटर खेळण्याचा प्रयोग फार क्लिक झाला नाही.

भारतामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या कायले जेमिसनला यूएईत नंतर खेळवलंच नाही. हसरंगाला अधिक संधी मिळायला हवी होती. टीम डेव्हिडही फक्त 1 मॅच खेळला. दुष्यंत चामिराला तर बेंचवरच बसावं लागलं. डॅन ख्रिस्टीन फॉर्मात नसतानाही त्याच्यावर अतिरेकी विश्वास टीम मॅनेजमेंटनं ठेवला. ख्रिस्टीननं केकेआर विरुद्ध टीमला गाळात घातलं.

5 चुकांचा बसला RCB ला फटका, विराटचं स्वप्न अखेर अपूर्ण

पुढच्या वर्षी काय?

विराट कोहली पुढच्या वर्षी आरसीबीचा कॅप्टन नसेल. त्यामुळे आरसीबीला एक भक्कम कॅप्टन शोधावा लागेल. स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर असलेल्या आणि पुढील वर्षी 38 वर्षांचा होणाऱ्या डिविलियर्सबाबतही भावना बाजूला ठेवून विचार करण्याची गरज आहे. देवदत्त पडिक्कल, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज आणि युजवेंद्र चहल या आरसीबीच्या खेळाडूंवर पुढील मेगा ऑक्शनमध्येही मॅनेजमेंटनं बोली लावायला (IPL 2021 RCB Review) हवी.   

स्पर्धेतील क्रमांक4
सर्वात खराब क्षणKKR विरुद्ध ऑल आऊट 92
सर्वात आनंदी क्षणकेएस भरतनं दिल्लीविरुद्ध शेवटच्या बॉलवर लगावलेला सिक्स
सर्वात अपयशी खेळाडूडॅन ख्रिस्टीन
सर्वात यशस्वी बॅटरग्लेन मॅक्सवेल
सर्वात यशस्वी बॉलर हर्षल पटेल
लक्षवेधी खेळाडूहर्षल पटेल
पुढील वर्षी कुणाला रिटेन करावं?विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, युजवेंद्र चहल/मोहम्मद सिराज

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: