फोटो – BCCI, IPL

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं (Royal Challengers Bangalore) आयपीएल चॅम्पियन होण्याचं स्वप्न पून्हा एकदा लांबणीवर पडलं आहे. कोलकाता नाईट रायडर्सनं (Kolkata Knight Riders) त्यांचा 4 विकेट्सनं पराभव केला. विराट कोहलीचं (Virat Kohli) आरसीबी कॅप्टन म्हणून हे शेवटचं वर्ष होतं. त्यामुळे त्याच्यासाठी तरी यंदा आरसीबीनं (RCB) आयपीएल ट्रॉफी जिंकावी, अशी अनेकांची इच्छा होती. ती इच्छा अपूर्ण राहिली. संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या आरसीबीनं प्ले ऑफच्या मॅचमध्ये केलेल्या 5 चुकांमुळे विराट कोहलीचं आयपीएल चॅम्पियन कॅप्टन होण्याचं स्वप्न भंग (5 Mistakes of RCB) पावलं.

टीम निवड

आरसीबी मॅनेजमेंटच्या नेहमीची सवय त्यांना या प्ले ऑफमध्ये देखील नडली. चांगले पर्याय बेंचवर असतानाही आरसीबीनं ‘प्ले ऑफ’मध्ये तीच टीम खेळवली. एबी डिविलियर्स (AB de Villiers) फॉर्मात नव्हता. त्यामुळे आरसीबीनं एक अतिरिक्त बॅटर खेळवणं आवश्यक होतं. आरसीबीकडं तो पर्याय टीम डेव्हिडच्या (Tim David) रुपानं होता. जगभरातील टी20 लीगचा अनुभव असलेला डेव्हिडचं हाणामारीचं कौशल्य आरसीबीसाठी उपयोगी पडलं असतं.

आरसीबीनं न्यूझीलंडचा फास्ट बॉलर कायले जमेसीनचा (Kyle Jamieson) यूएईमध्ये फार वापर केलाच नाही. जेमीसनला आरसीबीनं 15 कोटी मोजून खरेदी केले होते. इतक्या महागड्या खेळाडूला त्यांनी बेंचवरच ठेवले. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गाजवणारा जेमीसन हा एका ओव्हरमध्ये 3 सिक्स देणाऱ्या डॅन ख्रिस्टीनपेक्षा नक्कीच चांगला पर्याय होता. तसंच त्याचं बॅटींगमधील कौशल्य देखील फॉर्मात नसलेल्या ख्रिस्टीनपेक्षा सरस (5 Mistakes of RCB) ठरलं असतं.

संथ बॅटींग

विराट कोहलीनं शारजाहच्या पिचवर टॉस जिंकून बॅटींग करण्याचा धाडसी निर्णय घेतला होता. हा निर्णय घेत असताना त्याच्या किमान 170 रनचं टार्गेट डोळ्यासमोर असेल. आरसीबीनं सुरूवात देखील चांगली केली होती. पॉवर प्ले संपण्याच्या आतच (5.3 ओव्हर्स) आरसीबीनं 50 रन पूर्ण केले होते.

पॉवर प्लेनंतर केकेआरनं स्पिनर्स सुरू केले. त्यानंतर आरसीबीच्या बॅटींगचा वेग कमी झाला. केएस भरत आल्यावर वेगानं खेळू शकत नसेल तर मैदानात स्थिर झालेल्या विराटवर रन काढण्याची जबाबदारी होती. विराटला ती जबाबदारी पूर्ण करता आली नाही. पहिले 50 रन 33 बॉलमध्ये पूर्ण करणाऱ्या आरसीबीला पुढील 50 रन पूर्ण करण्यासाठी 52 बॉल लागले.

विराटनंतर RCB चा कॅप्टन कोण होणार? 3 जणांची नावं सर्वात आघाडीवर

नियोजन फसले

केकेआरचा स्पिन अटॅक 17 व्या ओव्हरमध्ये संपला. त्यानंतर शेवटची 3 ओव्हर्स मॉर्गननं फास्ट बॉलर्सचा वापर केला. विराट आऊट झाल्यानंतर मैदानात असलेल्या मॅक्सवेल-डिविलियर्स जोडीनं याचा विचार केला नाही. या दोघापैकी एक जण संपूर्ण 20 ओव्हर मैदानात राहिला असता तर आणखी 20 रन तरी सहज वाढले असते. पण, तसं झालं नाही. त्याचा फटका (5 Mistakes of RCB) आरसीबीला बसला.

शाहबाज अहमदचा विसर

आरसीबीकडं शाहबाज अहमद हा एक उपयुक्त स्पिनर होता. त्यानं या आयपीएलमध्ये दोन वेळा एका ओव्हरमध्ये एक पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या होत्या. विराटनं केकेआरकडं डावखुरे बॅटर्स जास्त असल्यानं त्याला बॉलिंग दिलीच नाही. विराटनं सुरूवातीला त्याला 2 ओव्हर्स बॉलिंग दिली असती तर कदाचित त्याला ख्रिस्टीनकडं शेवटी पुन्हा जावं लागलं नसतं.हर्षल पटेल आणि सिराज ही जोडी त्याला 20 व्या ओव्हरपर्यंत वापरणे शक्य होते.

64 घरांचा सरदार ते 22 यार्डातील सैनिक

नरीनचे नियोजन नाही

रनरेट वाढवण्यासाठी केकेआर सुनील नरीनला चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर पाठणार हे संपूर्ण देशाला माहिती होते. विराट कोहलीला हे कसं लक्षात आलं नाही, याचं आश्चर्य आहे. त्यानं नरीनचं नियोजन केलं नाही. नरीनसमोर डॅन ख्रिस्टीन हा महागड्या बॉलिंगसाठी प्रसिद्ध असलेला ख्रिस्टीन त्यानं उभा केला. नरीननं त्याला सलग 3 सिक्स मारले आणि मॅच केकेआरकडं (5 Mistakes of RCB) झुकवली.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

      

error: