
राजस्थान रॉयल्सनं (Rajasthan Royals) कोणतीही अपेक्षा नसताना पहिल्या आयपीएल स्पर्धेचं विजतेपद पटकावले होते. त्यामुळे या टीमबद्दल अनेकांना आपुलकी आहे. पहिल्या वर्षानंतर राजस्थानला कधीही ही स्पर्धा जिंकता आलेली नाही. मागच्या वर्षी तर ही टीम शेवटच्या क्रमांकावर होती. आता नवा कॅप्टन संजू सॅमनस (Sanju Samsan) आणि नवा मार्गदर्शक (Kumar Sangakkara) यांच्या ‘राज’वटीमध्ये दूर दिसणारे पहिले ‘स्थान’ मिळवण्याचा राजस्थान रॉयल्सचा (IPL 2021 RR Preview) प्रयत्न असेल.
राजस्थानची बलस्थाने
मागच्या वर्षी स्वत:साठी बॅटींग ऑर्डरमध्ये सतत बदल करणारा आणि एका विदेशी खेळाडूची जागा अडवून बसलेल्या स्टीव्ह स्मिथची (Steve Smith) राजस्थाननं हकालपट्टी केली आहे. स्मिथच्या जागी संजू सॅमसन कॅप्टन झाला आहे. त्यामुळे विदेशी खेळाडूची एक जागा ओपन झाली आहे.
संजू सॅमसनला T20 वर्ल्ड कपपूर्वी (T20 World Cup 2021) राष्ट्रीय निवड समितीचा विश्वास जिंकण्यासाठी ही चांगली संधी आहे. संजूमध्ये गुणवत्ता आहे. त्याचा माईंडसेटT20 क्रिकेटला साजेसा आहे. पण सातत्य नाही. त्याच्या गुणवत्तेला सातत्याची जोड मिळाली तर ते राजस्थानसाठी सर्वात मोठा बोनस ठरेल.
जोस बटलर (Jos Buttler) आणि बेन स्टोक्स (Ben Stokes) ही इंग्लंडची वर्ल्ड चॅम्पियन जोडी राजस्थान रॉयल्सकडं आहे. स्टोक्सला ओपनिंगला पाठवण्याचं डावपेच मागच्या आयपीएलमध्ये यशस्वी झाले होते. बटलरचा नंबर सतत बदलण्यासाठी स्मिथ यंदा राजस्थानमध्ये नाही. त्यामुळे बटलर-स्टोक्स जोडीकडून राजस्थानला चांगले रिटर्न्स मिळण्याची अपेक्षा आहे.
आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागड्या ख्रिस मॉरीसकडून राजस्थानकडून मोठ्या अपेक्षा आहेत. स्पर्धेच्या पूर्वार्धात जोफ्रा आर्चर नसल्यानं आगोदरच दुप्पट असलेल्या अपेक्षा आता चौपट (IPL 2021 RR Preview) झाल्या आहेत. मॅचच्या प्रत्येक टप्प्पत विशेषत: डेथ ओव्हरमध्ये मॉरीसची बॉलिंग राजस्थानसाठी निर्णायक ठरु शकते.
राहुल तेवातिया हा एक स्टार मागच्या वर्षी आयपीएलला राजस्थाननं दिला. बॅटींग आणि बॉलिंग या दोन्ही क्षेत्रात तेवातियानं धमाल केली होती. त्याच्या जोरावर त्याची टीम इंडियामध्येही निवड झाली. पण खराब फिटनेसमुळे त्याला बाहेर बसावं लागलं. या आयपीएलमध्ये तेवातिया पुन्हा एकदा टीम इंडियात येण्यासाठी धमाका करु शकतो.
कार्तिक त्यागी या अंडर 19 टीममधून आलेल्या बॉलरनंही मागील आयपीएलमध्ये विराट कोहली, शेन वॉटसन आणि क्विंटन डी कॉक सारख्या दिग्गजांना आऊट करुन सर्वांना प्रभावित केलं होतं. कार्तिक नेट बॉलर म्हणून टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलियात होता. त्याला ऑस्ट्रेलियात मिळालेल्या अनुभवाचा राजस्थानला फायदा होणार आहे.
Explained: राजस्थान रॉयल्सनं स्टीव्ह स्मिथची हकालपट्टी का केली?
राजस्थानच्या मार्गातील धोके
जोफ्रा आर्चरची अनुपस्थिती स्पर्धेच्या पूर्वार्धात राजस्थानला जाणवणार आहे. आर्चरनं मागच्या आयपीएलमध्ये राजस्थानच्या बॉलिंगचा भार एकट्याच्या खांद्यावर पेलला होता. त्यानं 20 विकेट्स घेत Most Valuable Player चा पुरस्कारही पटकावला होता. आर्चर जखमी असल्याचा फटका राजस्थानला बसणार आहे.
राजस्थानचे बॉलर्स ‘पॉवर प्ले’ आणि ‘डेथ ओव्हर्स’मध्ये मागील आयपीएल स्पर्धेत सर्वात महागडे ठरले होते. तसंच त्यांच्या टीमकडं फक्त लेग स्पिनर आहेत. श्रेयस गोपाळ या राजस्थानच्या प्रमुख स्पिनरसाठी मागील आयपीएल निराशाजनक ठरले होते. स्पिन बॉलिंगमध्ये वैविध्य नसण्याचा फटका त्यांना भारतीय पिचवर विशेषत: डावखुऱ्या बॅट्समनसमोर (IPL 2021 RR Preview) बसू शकतो.
राजस्थानकडं अनेक तरुण बॅट्सन असले तरी त्यापैकी एकानंही आयपीएलमध्ये भरीव कामगिरी केलेली नाही. त्यामुळे त्यांच्या बॅटींगचा लोड हा बटलर-स्टोक्स आणि सॅमसन या ‘टॉप थ्री’ वर येणार आहे. हा लोड कमी करण्यासाठी डेव्हिड मिलरच्या समावेशाचा पर्याय राजस्थानकडं आहे. पण तसं केल्यास त्यांना एक विदेशी फास्ट बॉलर कमी खेळवावा लागेल. तो पर्याय देखील राजस्थानसाठी महागडा आहे.
IPL 2020 च्या ‘हिरो नंबर 1’ ची टीम इंडियात एन्ट्री!
राजस्थान रॉयल्सची टीम : संजू सॅमसन (कॅप्टन), बेन स्टोक्स, यशस्वी जैस्वाल, मनन व्होरा, अनुज रावत, रियान प्रयाग, डेव्हिड मिलर, राहुल तेवातिया, महिपाल लोमरोर, श्रेयस गोपाळ, मयंक मार्कंडेय, जोप्रा आर्चर, एण्ड्रयू टाय, जयदेव उनाडकत, कार्तिक त्यागी, शिवम दुबे, ख्रिस मॉरीस, मुस्तफिजूर रहमान, चेतन सकारिया, केसी करिप्पा, लियाम लिविंगस्टोन, कुलदीप यादव आणि आकाश सिंह
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.