फोटो – BCCI/IPL

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) ने इंडियन प्रीमियर लीगच्या चौदाव्या सिझनचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर (IPL 2021 Schedule)  केले आहे. मागच्या वर्षी कोरोना व्हायरसमुळे ही स्पर्धा युएईमध्ये झाली होती. यंदा पुन्हा आयपीएल भारतामध्ये होणार आहे. या स्पर्धेची पहिली मॅच 9 एप्रिल रोजी चेन्नईत होणार असून फायनल मॅच 30 मे रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम (Narendra Modi Stadium) इथे होणार आहे.

 कोणत्या शहरांमध्ये होणार मॅच?

मुंबई, कोलकाता, बंगळुरु, दिल्ली, चेन्नई आणि अहमदाबाद या सहा शहरांमध्ये IPL चे 56 साखळी (League) लढती होतील. मुंबई कोलकाता, बंगळुरु आणि अहमदाबाद या चार स्पर्धांमध्ये प्रत्येकी 10 लढती होतील. तर दिल्ली आणि अहमदाबादमध्ये प्रत्येकी 8 लढती होणार आहेत.

बाद फेरी कुठे होणार आहे?

आयपील 2021 च्या बाद फेरीतील सर्व चार सामने हे अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होतील. 25 मे पासून बाद फेरीचे सर्व सामने अहमदाबादमध्ये होणार आहेत. याच ठिकाणी 30 मे रोजी स्पर्धेची फायनल होणार आहे.

वेळापत्रकाचे मुख्य वैशिष्ट्य काय?

IPL 2021 वेळापत्रकाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे (IPL 2021 Schedule) यंदा कोणत्याही टीमची लढत त्यांच्या होम ग्राऊंडवर होणार नाही. प्रत्येक टीम ही सहापैकी चार शहरांमध्ये पात्रता फेरीत खेळणार आहे.

मुंबई इंडियन्सचे सामने कोणत्या शहरात होणार?

गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) सामन्यांनीच या सिझनला सुरुवात होणार आहे. मुंबई इंडियन्सची पहिली लढत ही 9 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) विरुद्ध चेन्नईत होणार आहे.

मुंबईच्या पात्रता फेरीतील एकूण 14 लढतीपैकी पाच लढती चेन्नईत होतील. त्यानंतर पुढच्या चार लढती दिल्लीमध्ये, तीन लढती बंगळुरुमध्ये तर शेवटच्या दोन लढती या कोलकातामध्ये होणार आहेत.

( वाचा : IPL 2021 MI : मजबूत मुंबई इंडियन्स आणखी झाली भक्कम )

मॅच किती वाजता सुरु होणार?

यावर्षी एकूण 11 डबल हेडर (एकाच दिवशी दोन मॅच) आहेत. त्या दिवशी पहिली मॅच भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 मिनिटांनी सुरु होईल. तर दुसरी मॅच रात्री 7.30 वाजता सुरु होणार आहेत.

ज्या दिवशी एकच लढत असेल त्या दिवशी मॅच रात्री 7.30 वाजताच सुरु होणार आहे.

आयपीएल 2021 चे संपूर्ण वेळापत्रक

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: