फोटो – ट्विटर/BCCI-IPL

दोन वेळा आयपीएल स्पर्धा जिंकलेल्या कोलकाता नाईट रायडर्सची (KKR) या सिझनमध्ये (IPL 2021) अडखळती वाटचाल सुरु आहे. केकेआरच्या अपयशाचं सर्वात मोठं कारण हे इऑन मॉर्गनची (Eoin Morgan) कॅप्टनसी आहे. फक्त कॅप्टन म्हणून नाही तर बॅट्समन म्हणूनही मॉर्गन या स्पर्धेत सातत्यानं फेल होत आहे. त्यामुळे रिकी पॉन्टिंग (Ricky Ponting), गौतम गंभीर (Gautam Gambhir) या ज्येष्ठ खेळाडूंचा आदर्श घेऊन मॉर्गन स्वत:हून केकेआरची कॅप्टनसी सोडणार का? (Should Morgan Step Down?) हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

मॉर्गनचं काय चुकलं?

कोलकाता नाईट रायडर्सचे बॅट्समन हा त्यांच्या 5 पराभवातील मोठा घटक आहे. शूभमन गिल, नितीश राणा आणि राहुल त्रिपाठी हे तीन्ही नवे खेळाडू आहेत. यापैकी फक्त गिलला आंतरराष्ट्रीय सामन्यांचा (तो देखील थोडा) अनुभव आहे. आयपीएलच्या अन्य सर्व टीममध्ये टॉप ऑर्डर ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा मोठा अनुभव असलेल्या बॅट्समनचा समावेश आहे.

गिल, राणा आणि त्रिपाठी यांना चांगली कामगिरी करण्यात अपयश येतंय. त्यामुळे केकेआर अनेकदा इनिंगच्या सुरुवातीलाच मागे पडलेली आहे. टॉप ऑर्डरच्या या समस्येवर तोड काढणं ‘वर्ल्ड चॅम्पियन’ टीमचा कॅप्टन असलेल्या मॉर्गनला जमलेलं नाही. टीम सॅफर्ट (Tim Seifert) आंतरराष्ट्रीय अनुभव असलेला ओपनर केकेआरच्या बेंचवर बसला आहे. शाकिब अल हसन (Shakib Al Hasaan) या अनुभवी ऑल राऊंडरचा नंबर 3 वर उपयोग केला जाऊ शकतो. यापैकी काहीही कॅप्टन मॉर्गननं (Should Morgan Step Down?) केलेलं नाही.

IPL 2021: कोलकाता नाईट रायडर्स तळाला जाण्याचं सर्वात मोठं कारण!

प्लॅन B कुठं आहे?

दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या मॅचमध्ये शिवम मावीची पहिली ओव्हर महागडी गेली. पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) यानं त्याच्या ओव्हरमध्ये सलग 6 फोर लगावले. केकेआर या ओव्हरमुळे बॅक फुटवर गेली. त्यावेळी पॅट कमिन्स (Pat Cummins) या सर्वात अनुभवी बॉलरला मॉर्गननं बॉलिंग द्यायला हवी होती.

कमिन्सकडं अनुभव आहे. तो शॉर्ट बॉल टाकून दिल्लीच्या ओपनर्सना अडचणीत आणू शकतो. मॉर्गननं त्याला पॉवर प्लेच्या शेवटच्या म्हणजेच सहाव्या ओव्हरमध्ये पहिल्यांदा बॉलिंगला आणलं. त्यामुळे दिल्लीच्या ओपनर्सना पहिल्या 5 ओव्हर्स निर्धास्त खेळता आलं. त्यांचा जम बसला.

दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या मॅचमध्ये फक्त कमिन्स या एकाच केकेआरच्या बॉलर्सला विकेट्स मिळाल्या. चांगली बॉलिंग करणाऱ्या बॉलर्सकडं दुर्लक्ष हे मॉर्गनचं वैशिष्ट (Should Morgan Step Down?)  आहे. यापूर्वी आरसीबीविरुद्ध वरुण चक्रवर्तीनं एकाच ओव्हरमध्ये दोन विकेट्स घेतल्यानंतर मॉर्गननं त्याची बॉलिंग बंद केली होती. तसंच मागच्या वर्षी देखील लॉकी फर्ग्युसनचा असाच उशीरा वापर केला होता.

IPL 2021: ‘…तर कुणीही कॅप्टन होईल’, मॉर्गनला सेहवागनं फटकारलं

एक जागा अडवली

मिडल ऑर्डरला स्थैर्य देण्यासाठी केकेआरनं मॉर्गनला करारबद्ध केलं. टॉप ऑर्डर फेल जात असताना चार नंबरवर बॅटींगला येणारा मॉर्गन देखील अपयशी ठरतोय. त्यानं या सिझनमधील पहिल्या 7 मॅचमध्ये 15.33 च्या सरासरीनं फक्त 92 रन केले आहेत. यामध्ये एकही हाफ सेंच्युरी नाही. शून्यावर तो दोनदा आऊट झालाय.

कॅप्टन आणि बॅट्समन या दोन्ही पातळीवर मॉर्गन फेल आहे. शाकिब अल हसन, लॉकी फर्ग्युसन, टीम सॅफर्ट आणि बेन कटींग ही मंडळी बेंचवर बसली आहेत. तर मॉर्गन मात्र टीममधील चार परदेशी खेळाडूंपैकी एक जागा अडवून बसला आहे.

कार्तिक गेला, मॉर्गन आला, केकेआरचा गोंधळ आणखी वाढला!

हिंमत दाखवणार का?

कोणत्याही क्रिकेटपटूच्या आयुष्यात फॉर्म जाणं, बॅडपॅच हा टप्पा कधी ना कधी येतो. मॉर्गनच्या करियरमध्येही तो सध्या आला आहे. रिकी पॉन्टिंगनं कॅप्टनसी सोडल्यामुळे रोहित शर्मा (Rohit Sharma) मुंबई इंडियन्सचा कॅप्टन झाला. आज मुंबई इंडियन्सची टीम ही आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी टीम आहे. गौतम गंभीरनंही दिल्ली कॅपिटल्सची कॅप्टनसी स्वत:हून सोडली. श्रेयस अय्यर हा तरुण खेळाडू कॅप्टन बनला. श्रेयसच्या कॅप्टनसीमध्ये दिल्लीनं 2019 साली तिसरा तर 2020 साली दुसरा क्रमांक पटकावला. 2021 मध्ये दिल्लीची टीम विजेतेपदाची प्रबळ दावेदार आहे. पॉन्टिंग आणि गंभीरनं कॅप्टनसी सोडल्यानं त्यांत्या आयपीएल टीमचं भलं झालं. आता केकेआरचं भलं करण्यासाठी मॉर्गन स्वत:हून कॅप्टनसी सोडण्याची हिंमत (Should Morgan Step Down?) दाखवेल का?

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: