फोटो – ट्विटर

या वर्षी आयपीएल स्पर्धा सुरू होण्यापूर्वी ज्याची कुणी कल्पनाही केली नसेल, ते आता घडलं आहे. सनरायझर्स हैदराबादचा माजी कॅप्टन डेव्हिड वॉर्नरनं (David Warner SRH) आयपीएल स्पर्धा (IPL 2021) सुरू असतानाच टीमला निरोप दिला आहे. आता वॉर्नर या आयपीएलमध्येच नाही तर भविष्यातही हैदराबादकडून खेळणार नाही. राजस्थान रॉयल्स विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये (Rajasthan Royals vs Sunrisers Hyderabad)  वॉर्नरला टीममधून वगळण्यात आले होते. त्यानंतर वॉर्नरनं स्वत: सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे.

काय म्हणाला वॉर्नर?

राजस्थान रॉयल्स विरुद्ध होणाऱ्या मॅचपूर्वी वॉर्नरच्या फॅननं सोशल मीडियावर प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना त्यानं ही माहिती दिली आहे. ‘वॉर्नर स्टेडियममध्ये आहे का? आम्हाला तो दिसत नाहीय… असं फॅननं विचारलं होतं. त्यावर ‘दुर्दैवानं आता हे होणार नाही, पण टीमला पाठिंबा देत राहा’ असं धक्कादायक उत्तर वॉर्नरनं दिलं.

वॉर्नरचा हैदराबाद मॅनेजमेंटसाठी हिरो ते झिरो होण्याचा प्रवास याच सिझनमध्ये सुरू झाला. आयपीएलच्या पहिल्या हाफमध्ये टीमच्या खराब कामगिरीचं खापर वॉर्नरवर फोडण्यात आलं. त्याला आधी कॅप्टनपदावरुन आणि नंतर टीममधून काढण्यात आले. दुसऱ्या हाफमध्ये पुन्हा त्याला टीममधून वगळण्यात आल्यानंतर वॉर्नरनं मैदानात न येता हॉटेलमध्ये राहणेच पसंत केले. या आयपीएलमध्ये पुढं न खेळण्याबाबत वॉर्नर आणि टीम मॅनेजमेंट यांच्यात सहमती झाल्याची माहिती आहे.

SRH ची ओळख होता वॉर्नर

डेव्हिड वॉर्नर हा सनरायझर्स हैदराबादची (David Warner SRH)  ओळख होता. त्यानं हैदराबादसाठी सर्वाधिक रन केले आहेत. हैदराबादसाठी त्यानं 95 मॅचमध्ये 2 सेंच्युरी आणि तब्बल 40 हाफ सेंच्युरीसह 4015 रन केले आहेत. हा सिझन खराब जाऊनही त्याची सरासरी ही 49.55 इतकी अविश्वसनीय आहे. तसंच त्याचा स्ट्राईक रेट हा 142.59 आहे. सर्वाधिक रन करण्याच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या शिखर धवनपेक्षा फक्त 10 मॅच अधिक खेळून वॉर्नरनं जवळपास 1500 रन जास्त काढले आहेत.    

Explained सर्वात बेस्ट डेव्हिड वॉर्नरला हैदराबादनं का काढलं?

वॉर्नरच्याच कॅप्टनसीमध्ये हैदराबादनं 2016 साली (IPL 2016) आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद पटकावले होते. त्यानंतरच्या सिझनमध्येही हैदराबादला सातत्यानं ‘प्ले ऑफ’ मध्ये नेण्यात वॉर्नरची कामगिरी निर्णायक ठरली आहे. हैदराबादच्या टीममधील नवोदित भारतीय खेळाडूंकडून चांगली कामगिरी करुन घेणारा तो हुशार कॅप्टन होता. फिल्डिंग करताना संपूर्ण 20 ओव्हर्स मैदानातील त्याची एनर्जी हा अनुभवण्याचा विषय होता.

का संपला अध्याय?

डेव्हिड वॉर्नर दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर होता. भारताविरुद्ध झालेली टेस्ट सीरिज देखील यामुळे तो पूर्ण खेळू शकला नाही. क्रिकेटपासून दूर राहण्याचा फटका त्याच्या बॅटींगला यावर्षी बसला. सुरुवातीच्या काळात त्याला लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही, तसंच त्याचा स्ट्राईक रेटही कमी झाला होता.

आयपीएलच्या पहिल्या सिझनमध्ये हैदराबादची कामगिरी निराशाजनक होत होती. टीमची पराभवाची मालिका सुरू होती. त्यातच मनिष पांडेला (Manish Pandey) टीममधून काढण्याचा मॅनेजमेंटचा निर्णय आपला नाही तर मॅनेजमेंटचा असल्याचं वॉर्नरनं जाहीरपणे सांगितलं होतं. त्यानंतर लगेच त्याची कॅप्टन पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आणि केन विल्यमसन (Kane Williamson) हैदराबादचा कॅप्टन झाला.

विराटनंतर RCB चा कॅप्टन कोण होणार? 3 जणांची नावं सर्वात आघाडीवर

आयपीएलचा सेकंड हाफ चार महिन्यांच्या ब्रेक नंतर सुरू झाला. या चार महिन्यांमध्येही वॉर्नर क्रिकेटपासून दूर होता. या हाफमधील पहिल्या मॅचमध्ये 0 आणि दुसऱ्या मॅचमध्ये फक्त 2 रन वॉर्नरनं काढले होते. त्यामुळे टीम मॅनेजमेंटनं व़ॉर्नरला वगळून जेसन रॉयचा (Jason Roy) टीममध्ये समावेश केला. टीममधून दुसऱ्यांदा वगळल्यानंतर वॉर्नरनं आपण आता यापूढे सनरायझर्स हैदराबादकडून (David Warner SRH) खेळणार नसल्याचं जाहीर केलं.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: