फोटो – BCCI/IPL

सनरायझर्स हैदराबादनं (SRH) 2016 साली आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर प्रत्येक वर्षी या टीमनं ‘प्ले ऑफ’ मध्ये प्रवेश केला आहे. गेल्या पाच वर्षात एकाही आयपीएल टीमला ही कामगिरी करता आलेली नाही. त्याचबरोबर मागच्या पाच वर्षात त्यांना विजेतेपद जिंकण्यातही अपयश आलेलं आहे. नेहमी अंडर रडार असणाऱ्या या टीमला विजेतेपद मिळवण्यासाठी काही गोष्टी बरोबर (IPL 2021 SRH Preview) कराव्या लागणार आहेत.

सनरायझर्सची बलस्थानं

सनरायझर्स हैदराबादचा कॅप्टन डेव्हिड वॉर्नर (David Warner) हे टीमचं सर्वात मोठं बलस्थान आहे. वॉर्नरच्या फॉर्मवर टीमची वाटचाल नेहमी अवलंबून असते. वॉर्नरनं टीमला आणि फॅनला निराश केलेलं नाही. त्याचबरोबर एक कॅप्टन म्हणूनही वॉर्नरचा वावर टीमचा उत्साह वाढवणारा असतो.

जॉनी बेअरस्टो, वृद्धीमान साहा, केन विल्यमसन आणि मनिष पांडे ही टॉप हेवी बॅटींग ऑर्डर हैदराबादकडं आहे. विल्यमसन आणि बेअरस्टो यापैकी कुणाला खेळवायचं हा प्रश्न त्यांना मागच्या सिझनमध्ये होता. हे दोघंही यंदा फ़ॉर्मात आहे. त्यामुळे सुरुवातीच्या काळात तरी दोघंही खेळतील असा अंदाज आहे. जेसन रॉयचा देखील सनरायझर्सनं समावेश केला आहे, पण तो वॉर्नर जखमी झाला तरच त्याला संधी मिळण्याची (IPL 2021 SRH Preview) शक्यता आहे.

साहा आणि मनिष हे दोघंही टीम इंडियाच्या शर्यतीमध्ये मागे पडले आहेत. साहाचं नाव जवळपास बाद झालं असलं तरी आपण अजून संपलेलो नाही हे दाखवण्याची त्याला संधी आहे. तर मनिष पांडेसाठी पुन्हा एकदा शर्यतीमध्ये येण्यासाठी ही स्पर्धा महत्त्वाची आहे.

सनरायझर्सचा बॉलिंग अटॅक हा सर्वात भक्कम आहे. भुवनेश्वर कुमार आणि टी. नटराजन हे दोन बेस्ट डेथ ओव्हर्स बॉलर्स त्यांच्याकडं आहेत. भुवनेश्वरनं इंग्लंड विरुद्धच्या सीरिजमध्ये जोरदार पुनरागमन केलं आहे. तर नटराजनचा खेळ मागील आयपीएलनंतर प्रत्येक स्पर्धेत सुधारला आहे. या जोडीला पॉवर प्ले मध्ये हमखास यशस्वी होणार संदीप शर्मा देखील सनरायझर्सकडं आहे.

सनराझर्सकडं T20 क्रिकेटमधील सर्वात धोकायदायक स्पिनर राशिद खान (Rashid Khan) आहे. रन वाचवणे आणि विकेट काढणे या दोन्ही गोष्टी तो सातत्यानं करतो. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वात चांगला इकॉनॉमी रेट (6.24) राशिदचा आहे. त्याच्या चार ओव्हर्स प्रतिस्पर्धी टीमला फक्त खेळून काढाव्या लागतात. राशिदचा वापर कसा करायचा हे वॉर्नरला चांगलं माहिती आहे. तसेच लोअर ऑर्डरमध्ये त्याची फटकेबाजी देखील टीमसाठी नेहमी उपयोगी ठरली आहे.

IPL 2020 : सनरायझर्स हैदराबाद, ‘ते’ शेवटपर्यंत लढले!

सनरायझर्सच्या मार्गातील धोके

डेव्हिड वॉर्नर भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरिजमध्ये पूर्ण फिट नव्हता. त्याच्या फिटनेसवर अजूनही शंका आहे. वॉर्नरला फिटनेसमुळे बाहेर बसावं लागलं तर तो सनरायझर्ससाठी सर्वात मोठा धक्का असेल.

या टीमच्या मिडल ऑर्डरमध्ये अनुभवाची कमतरता आहे. विजय शंकरला अजून अपेक्षापूर्ती करता आलेली नाही. ही उणीव कमी करण्यासाठी त्यांनी यंदा केदार जाधवची (Kedar Jadhav) निवड केली आहे. केदारचा आणि एकूणच मिडल ऑर्डरचा फॉर्म सनरायझर्ससाठी या स्पर्धेत निर्णायक ठरु शकतो.

अस्सल वेगवान फास्ट बॉलर आणि राशिद खानच्या जोडीला स्पिनरची अंतिम 11 मधील अनुपस्थिती ही देखील सनरायझर्ससाठी डोकेदुखी आहे. विदेशी खेळाडूच्या मर्यादेमुळे  मोहम्मद नबी आणि मुजीब या अफगाण स्पिनर्सना बहुतेक काळ बेंचवर बसावं लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रश्नावर टीम मॅनेजमेंट कसा मार्ग काढतं त्यावर ही टीम विजेतेपदाचा मोठा धमाका करणार का?  (IPL 2021 SRH Preview) हे अवलंबून असेल.

‘आहे’ बॉलिंग भक्कम तरीही…काही प्रश्न कायम!

सनरायझर्स हैदराबादची टीम : डेव्हिड वॉर्नर, अब्दुल समद, अभिषेक शर्मा, बसिल थंपी, भुवनेश्वर कुमार, जेसन होल्डर, जॉनी बेअरस्टो, केन विल्यमसन, केदार जाधव, खलील अहमद, मनिष पांडे, मिचेल मार्श, मोहम्मद नबी, मुजीप उर रहमान, प्रियम गर्गस रशिद खान, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, श्रीवत्स गोस्वामी, सिद्धार्थ कौल, टी. नटराजन, विजय शंकर, विराट सिंग आणि वृद्धीमान साहा

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: