फोटो – ट्विटर / @SunRisers

आपल्याकडील सर्व रिसोर्सेचा पूर्ण वापर करुन लढणारी टीम म्हणजे सनरायझर्स हैदराबाद (SRH). मागच्या वर्षी (IPL 2020) त्यांच्या टीममधील खेळाडू ठराविक अंतरानं दुखापतग्रस्त होत गेले. त्यामुळे ते वेळोवेळी अडचणीत सापडले, पण डगमगले नाहीत. त्यांनी तिसरा क्रमांक पटकावला. डेव्हिड वॉर्नरच्या (David Warner) नेतृत्त्वाखाली ते आता नव्या सिझनसाठी (SRH 2021) ते सज्ज झाले आहेत.

फारशी संधी नव्हतीच

यावर्षीच्या आयपीएल ऑक्शनपूर्वी (IPL 2021 Auction) सनरायझर्स  हैदराबादकडं सर्वात कमी रक्कम (10.75 कोटी) आणि सर्वात कमी रिक्त जागा (3) होत्या. त्यामुळे त्यांना फारशी संधी नव्हतीच. ऑक्शनचा बहुतेक काळ ते प्रेक्षकांच्या भूमिकेत होते. कृष्णप्पा गौतमसाठी त्यांनी 9 कोटींपर्यंत बोली लावली. अखेर चेन्नई सुपर किंग्स (CSK) त्यांना माघार घ्यावी लागली. त्यांनी यावर्षी मुजीब उर रहमान (Mujeeb Ur Rahman), जगदीश सुचित (Jagadeesh Suchith) आणि केदार जाधव (Kedar Jadhav) या तीन खेळाडूंना घेतलं.

फास्ट बॉलर हवा होता पण

सनरायझर्स हैदराबादकडं 140-150 च्या वेगानं बॉलिंग करणारा बॉलर नाही. त्यांच्या टीममधील ही समस्या मागच्या वर्षीच लक्षात आली होती. त्यामुळे ते यंदा फास्ट बॉलरची खरेदी करतील (SRH 2021) असा अंदाज होता. त्यासाठी अनेक चांगले पर्यायही उपलब्ध होते. त्यांनी मात्र अफगाणिस्तानचा 19 वर्षांचा ऑफ स्पिनर मुजीब उर रहमानची निवड केली.

मुजीब 19 वर्षांचा असला तरी त्याच्याकडं जगभरात T20 क्रिकेट खेळण्याचा चांगला अनुभव आहे. मागच्या वर्षी अनिल कुंबळेच्या किंग्ज इलेव्हन पंजाबनं त्याचा फार उपयोग केला नाही. यंदा तो ऑक्शनमध्ये उपलब्ध होताच त्याला सनरायझर्सनं खरेदी केलं. राशिद खान आणि मोहम्मद नबीनंतर सनरायझर्सच्या टीममधील तो तिसरा अफगाणिस्तानचा खेळाडू आहे.

राशिद आणि मुजीब या दोघांना एकत्र खेळणं प्रतिस्पर्धी टीमला अवघड ठरेल. त्याचबरोबर सनराझर्सचे सर्व खेळाडू उपलब्ध असतील तर भुवनेश्वर कुमार, संदीप शर्मा, टी.नटराजन, राशिद खान आणि मुजीब उर रहेमान असा भक्कम बॉलिंग अटॅक ते अंतिम 11 मध्ये खेळवू शकतात. फास्ट बॉलर्सच्या बाबतीत सनरायझर्सनं स्वत:कडील भारतीय खेळाडूंवरच विश्वास ठेवला आहे.

( वाचा : IPL 2020 : सनरायझर्स हैदराबाद ‘ते शेवटपर्यंत लढले’ )

केदारचा समावेश

मागच्या वर्षीच्या आयपीएलमध्ये फ्लॉप गेलेल्या केदार जाधवला (Kedar Jadhav) सनरायझर्सनं अगदी शेवटच्या क्षणी खरेदी केलं. केदारचा खराब सिझन झालेला आहे. आता त्याच्याकडं गमावण्यासारखं काहीच नाही. त्यामुळे त्याला पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध करण्यासाठी या संधीचा वापर करता येईल. मधल्या फळीला (मीडल ऑर्डर) स्थैर्य देऊ शकेल असा अनुभवी बॅट्समन सनराझर्सला (SRH 2021) हवा होता. केदार तो प्रश्न किती सोडवू शकेल हे या आयपीएलमध्येच स्पष्ट होईल.

( वाचा : SMAT : CSK मधून हकालपट्टीटची भीती असलेल्या बॅट्समनची सलग दुसऱ्यांदा आक्रमक खेळी! )

सनरायझर्स हैदराबादची टीम : डेव्हिड वॉर्नर, अब्दुल समद, अभिषेक शर्मा, बसिल थंपी, भुवनेश्वर कुमार, जेसन होल्डर, जॉनी बेअरस्टो, केन विल्यमसन, केदार जाधव, खलील अहमद, मनिष पांडे, मिचेल मार्श, मोहम्मद नबी, मुजीप उर रहमान, प्रियम गर्गस रशिद खान, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, श्रीवत्स गोस्वामी, सिद्धार्थ कौल, टी. नटराजन, विजय शंकर, विराट सिंग आणि वृद्धीमान साहा

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading