
चेन्नई सुपर किंग्सनं (Chennai Super Kings) राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) पराभव करत या आयपीएलमधील सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. या विजयासह चेन्नईचा नेट रन रेट हा अधिक भक्कम झालाय. सध्या सीएसके पॉईंट टेबलवर दुसऱ्या क्रमांकावर आहे. या मोठ्या विजयानंतरही सीएसकेचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) समाधानी नाही. धोनी इतरांवर नाही तर स्वत:च्या चुकीवर नाराज आहे. राजस्थानवरील विजयानंतर धोनीनं या चुकीची (Dhoni’s Mistake) कबुली दिली.
धोनीचा महिमा…
महेंद्रसिंह धोनी हा केवळ चेन्नई सुपर किंग्स किंवा आयपीएलमधील नाही तर T20 क्रिकेटमधील एक अनुभवी खेळाडू आहे. त्याच्याच कॅप्टनसीमध्ये टीम इंडियानं 2007 साली पहिली T20 वर्ल्ड कप जिंकला. आयपीएलमध्येही तो सुपर किंग्सचा (CSK) पहिल्या सिझनपासून (IPL 2008) कॅप्टन असून त्यानं 200 मॅच सीएसकेची कॅप्टनसी केली आहे.
धोनीचा दरारा, धोनीचा दर्जा आणि धोनीचा अनुभव हा खूप मोठा आहे. तो 2019 च्या वर्ल्ड़ कपनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट कधीही खेळला नाही. मागच्या वर्षी तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायर झाला. तरीही त्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. अन्य सेलिब्रेटी मंडळींसारखं चर्चेच राहण्याची धडपड तो करत नाही. सध्या फक्त आयपीएल स्पर्धांमध्येच तो सार्वजनिक पातळीवर सातत्याने दिसतो. त्यामुळे या स्पर्धेत तो कसं खेळतो, काय बोलतो याची सर्वांना उत्सुकता असते.
IPL 2021 CSK Preview: चुका सुधाराव्या लागतील पण कशा?
धोनीचं काय चुकलं?
राजस्थान रॉयल्सविरुद्ध चौदाव्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर सुरेश रैना (Suresh Raina) आऊट झाला आणि महेंद्र सिंह धोनी मैदानात आला. यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये तो 2 बॉलमध्ये शून्यावर आऊट झाला होता. राजस्थान विरुद्ध त्यानं पहिला रन काढण्यासाठी सहा बॉल घेतले.
धोनीला पहिल्या 5 बॉलवर एकही रन काढता आला नाही. या 5 पैकी 4 बॉल तो राहुल तेवातियाच्या (Rahul Tewaita) ओव्हरमध्ये त्यानं निर्धाव (डॉट) खेळले. धोनीनं मॅच संपल्यानंतर या चुकीची कबुली (Dhoni’s Mistake) दिली आहे.
“माझ्या मते आम्ही आणखी रन काढू शकलो असतो. मी खेळलेल्या पहिल्या 6 बॉलचा आम्हाला अन्य एखाद्या मॅचमध्ये फटका बसला असता. तुम्ही खेळत असताना तुम्हा या कामगिरीसाठी अनफिट आहात, असं म्हंटलेलं आवडत नाही. परफॉर्मन्स ही वेगळी गोष्ट आहे. 24 वर्षांचा होतो तेंव्हाही मी त्याची कधी खात्री दिली नाही. आता 40 व्या वर्षी देखील ती मी देणार नाही.” असं धोनीनं स्वत:च्या खेळाचं विश्लेषण केलं.
दीपक चहरच्या नावावर आहे बॅट्समन्सना धडकी भरवणारा रेकॉर्ड
हा खेळण्यासाठी अनफिट आहे, असं कुणीही माझ्याकडं बोट दाखवून म्हणत नाही, ही माझ्यासाठी मोठी सकारात्मक गोष्ट आहे. मी तरुण मुलांसोबत खेळतोय. ते खूप वेगानं पळतात. त्यांना चॅलेंज करणं ही खूप चांगली गोष्ट आहे,’’ असं धोनी या मॅचनंतर म्हणाला.
धोनीनं राजस्थान विरुदध 17 बॉलमध्ये 18 रन काढले. चेतन सकारिया (Chetan Sakariya) यानं त्याला आऊट केलं. चेन्नईनं दिलेलं 189 रनचं आव्हान राजस्थानला पेलवलं नाही. त्यांना निर्धारित 20 ओव्हरमध्ये 9 आऊट 143 पर्यंतच मजल मारता आली. राजस्थानचा हा स्पर्धेतील दुसरा पराभव आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.