
विराट कोहलीनं (Virat Kohli) तीन दिवसांमध्ये क्रिकेट फॅन्सना दुसरा धक्का दिला आहे. त्यानं गुरुवारी (16 सप्टेंबर 2021) रोजी T20 टीमची कॅप्टनसी सोडत असल्याचं जाहीर केलं होतं. त्यापाठोपाठ आता रविवारी (19 सप्टेंबर 2021) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची (RCB) कॅप्टनसी सोडण्याची घोषणा (Virat quit RCB Captainship) केली आहे. या आयपीएलनंतर विराट आरसीबीची कॅप्टनसी सोडणार आहे.
काय म्हणाला विराट?
आयपीएल स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच दिवशी विराटनं कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय जाहीर केला. ‘एक कॅप्टन म्हणून माझं हे शेवटचं आयपीएल असेल, हे आज संध्याकाळी मी टीमला सांगितलं आहे. मी हा निर्णय टीम मॅनेजमेंटला देखील कळवला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून माझ्या मनात हा विचार सुरू होता. नुकतीच मी T20 टीमची कॅप्टनसी देखील सोडली होती. वर्कलोड मॅनेज करणे हे या निर्णयाचे मुख्य कारण आहे.
मी गेल्या अनेक वर्षांपासून भरपूर क्रिकेट खेळत आहे. स्वत:ला फ्रेश ठेवण्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे. मी टीमसोबतच असेन, असं आरसीबी मॅनेजमेंटला कळवलं आहे. टीमसोबतचा 9 वर्षांचा प्रवास संस्मरणीय होता. मी या फ्रँचायझीसाठी यापुढे देखील खेळणार आहे. हा एक छोटा टप्पा आहे. प्रवास पुढेही सुरु असेल.
विराट कोहली कॅप्टनसी सोडणार, T20 वर्ल्ड कपनंतर कमी करणार जबाबदारी
आरसीबी सध्या एका बदलातून जात आहे. पुढच्या वर्षी मेगा आयपीएल ऑक्शन होणार आहे. मी आरसीबी शिवाय अन्य कोणत्याही टीमकडून खेळण्याचा विचारही करु शकत नाही. टीम मॅनेजमेंटला देखील तसं कळवलं आहे.’ असं विराटनं कॅप्टनसी सोडताना (Virat quit RCB Captainship) सांगितलं.
विराटची साधारण कामगिरी
विराट कोहली 2008 साली झालेल्या पहिल्या आयपीएलपासून आरसीबीच्या टीममध्ये आहे. तो 2013 साली आरसीबीचा कॅप्टन बनला. टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कॅप्टन असलेल्या विराटचा आरसीबीसाठीचा रेकॉर्ड साधारण आहे. त्याच्या कॅप्टनसीमध्ये आरसीबीला आजवर एकदाही आयपीएल स्पर्धा जिंकता आलेली नाही. तसंच फक्त 3 वेळा टीमनं ‘प्ले ऑफ’ मध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे विराटवर अनेकदा टीका (Virat quit RCB Captainship) झाली आहे.
‘आठ वर्षांपासून एकही IPL ट्रॉफी जिंकली नाही, तरी कॅप्टन कसा?’, गंभीरचा विराटला प्रश्न
विराटनं आत्तापर्यंत एकूण 131 मॅचमध्ये आरसीबीची कॅप्टनसी केली आहे. त्यामध्ये 60 मॅच जिंकल्या असून 64 मध्ये टीमचा पराभव झाला आहे. 3 मॅच टाय झाल्या असून 4 मॅचचा कोणताही निकाल लागला नाही.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा
You must be logged in to post a comment.