फोटो – सोशल मीडिया

मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore) यांच्यातील लढतीनं आयपीएल स्पर्धेचा 14 वा सिझन (IPL 2021) सुरु झाला आहे. या स्पर्धेच्या पहिल्या मॅचमध्ये दोन्ही टीम कोणत्या खेळाडूंना घेणार याची उत्सुकता होती. त्यावेळी मुंबई इंडियन्सनं अनेक दिग्गजांना बाजूला करत मार्को जेन्सन (Who is Marco Jansen?) या 6 फुट 8 इंच उंचीच्या दक्षिण आफ्रिकन बॉलरची टीममध्ये निवड केली. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

कोण आहे मार्को जेन्सन?

मुंबई इंडियन्सनं इतरांपेक्षा जास्त ट्रॉफी का जिंकल्या? याचं कारण म्हणजे योग्य खेळाडूंची निवड हे आहे. जसप्रीत बुमराह (Jaspreet Bumrah), कृणाल पांड्या (Krunal Pandya) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) ही याची प्रमुख उदाहरणं आहेत. हे तिघंही अगदी नवोदीत असताना त्यांची निवड मुंबई इंडियन्सनं केली होती. आज हे सर्व टीम इंडियाचे (Team India) सदस्य आहेत.

दरवर्षी एक नवा खेळाडू घेऊन येण्याची खासियत मुंबई इंडियन्सनं यावेळी देखील जपली आहे. त्यांनी यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या मार्को जेन्सन (Marco Jansen)  याला क्रिकेट विश्वासमोर सादर केलं आहे. मार्को 20 वर्षांचा आहे, पण त्याच्यावर मुंबई इंडियन्सचं मॅनेजमेंट गेल्या दोन वर्षांपासून लक्ष ठेवून होतं.

( IPL 2021 MI Preview: बेस्ट टीम विजेतेपदाची हॅटट्रिक करण्यासाठी सज्ज! )

यशस्वी पदार्पण

 मार्को दक्षिण आफ्रिकेच्या वॉरियर्स या टीमकडून खेळतो. त्यानं पहिल्याच फर्स्ट क्लास सिझनमध्ये सर्वांचं लक्ष वेधलं होतं. त्यानं पहिल्या सिझनमध्ये 14 मॅचमध्ये 22.96 च्या सरासरीनं 54 विकेट्स घेतल्या होत्या.

मार्कोनं 13 लिस्ट A मॅचमध्ये 16 तर 10 T20 मध्ये 6 विकेट्स घेतल्या आहेत. त्याबरोबर तो लोअर ऑर्डरमधील उपयुक्त बॅट्समन देखील असून त्याच्या नावावर तीन सेंच्युरी आहेत. भारतीय टीम 2018 साली दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेली होती, त्यावेळी विराट कोहलीला नेटमध्ये बॉलिंग केल्यानंतरही मार्को चर्चेत आला होता.

मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटला आयपीएल ऑक्शनच्या वेळी (IPL 2021 Auction) मार्कोसाठी मोठं युद्ध रंगेल असं वाटलं होतं. पण तो त्यांना त्याच्या 20 लाख या बेस प्राईजमध्येच मिळाला. यामुळे आश्चर्य वाटल्याचं मत मुंबई इंडियन्सचा मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धनेनं  व्यक्त केलं होतं.

मार्कोकडं वेग आहे. त्याची उंची आणि डावखुरी फास्ट बॉलिंग हे त्याचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे तो यावेळी मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये आणखी मजबुती देणार आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: