
भारतीय कुटुंबात साधारणपणे मुलाला ‘खेळावरचं लक्ष कमी करुन अभ्यास कर’, असा सल्ला दिला जातो. त्याची गोष्ट उलटी आहे. तो अभ्यासात हुशार होता. कायम पुस्तकात गढलेल्या मुलाला त्याच्या आईनं क्रिकेट खेळायला भाग पाडले. वयाच्या 19 व्या वर्षापर्यंत तो क्रिकेट विरंगुळा म्हणून खेळत होता. त्यानंतर त्यानं हळूहळू क्रिकेटवर लक्ष केंद्रीत केलं. आज तो कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Ridrers) नवा स्टार बनला आहे. यूएईमध्ये कोलकातानं (KKR) मिळवलेल्या तिन्ही विजयात महत्त्वाची भूमिका असलेल्या व्यंकटेश अय्यरची (Who is Venkatesh Iyer?) गोष्ट ही अनेकांपेक्षा वेगळी आहे.
CA, MBA आणि क्रिकेट
व्यंकटेश अय्यर हा क्रिकेटमुळे न झालेला चार्टड अकाऊंटट (CA) आणि देशाला न मिळालेला MBA आहे. दक्षिण भारतीय परिवारातील व्यंकटेशचा जन्म हा मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये झाला. त्याचे आई-वडील त्याच शहरात नोकरी करत होते. 2016 साली तो सीए इंडरमीडिएट परिक्षा पास झाला. पण तो पर्यंत त्याची मध्य प्रदेशच्या वरिष्ठ टीममध्ये T20 आणि 50 ओव्हर्सच्या टीममध्ये निवड झाली होती. सीएच्या अभ्यासामुळे त्याचं क्रिकेट काही वर्ष तरी सुटलं असतं. त्यामुळे त्यानं सीए न करता MBA ला प्रवेश घेतला.
अभ्यासात हुशार असलेल्या व्यंकटेशला एमबीए करणाऱ्या कॉलेजनं क्रिकेट खेळण्यासही प्रोत्साहन दिलं. त्याला क्रिकेटसाठी कॉलेजला दांडी मारण्याची परवानगी दिली. त्यानं कॉलेज आणि क्रिकेट या दोन्हीची योग्य सांगड घालत शिक्षण पूर्ण केलं. तसंच क्रिकेटमध्येही प्रगती केली.
KKR चा मिस्ट्री स्पिनर होणार टीम इंडियाच्या यशाचा ‘आर्किटेक्ट’
2021 ठरलं टर्निंग पॉईंट
व्यंकटेश (Who is Venkatesh Iyer?) 2016 पासून मध्य प्रदेशकडून खेळतोय. 2018-19 च्या सिझनमध्ये त्याची रणजी ट्रॉफी टीममध्ये निवड झाली. त्याच्या करिअरला यावर्षी खऱ्या अर्थानं ब्रेक मिळाला. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत त्यानं मध्यप्रदेशकडून सर्वाधिक 227 रन केले. या स्पर्धेत त्याची सरासरी 75.66 तर स्ट्राईक रेट 149.34 इतका होता. त्यानंतर आयपीएल लिलावाच्यापूर्वी (IPL 2021 Auction) झालेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्यानं 146 बॉलमध्ये 198 रनची खेळी केली. या खेळीमुळे तो आयपीएल फ्रँचायझींच्या नजरेत भरला.
KKR मध्ये निवड आणि…
सौरव गांगुलीला आयडॉल मानणाऱ्या व्यंकटेशची गांगुलीच्या शहरातील आयपीएल टीम म्हणजे केकेआरमध्ये निवड झाली. भारतामध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या फेजमध्ये (IPL 2021 Phase 1) तो बेंचवर होता. या काळातही नेटमध्ये अव्वल दर्जाच्या बॉलर्सचा सामना करुन तो बरंच काही शिकला.
भारतीय क्रिकेटचा चेहरा बदलणारा आपला दादा!
आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात केकेआरची कामगिरी निराशाजनक झाली होती. टीमनं 7 पैकी फक्त 2 मॅच जिंकल्या होत्या. पॉईंट टेबल्सच्या खालच्या भागात असलेल्या केकेआरला दुसऱ्या टप्प्यात बदल करण्याची गरज होती. नव्या दमाच्या व्यंकटेश अय्यरला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (KKR vs RCB) मॅचमध्ये ओपनिंगला संधी देत केकेआरनं तो बदल केला. व्यंकटेशनं त्या मॅचमध्ये त्या संधीचं सोनं केलं.
मुंबई इंडियन्स विरुद्ध केकेआरला (KKR vs MI) एक दुर्मिळ विजय मिळवून देण्यात व्यंकटेशच्या हाफ सेंच्युरीचे मोलाचे योगदान होते. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स (KKR vs DC) मॅचमध्ये व्यंकटेशनं आंद्रे रसेलची (Andre Russell) बॉलिंगमधील कमतरता भरुन काढली. त्यानं 4 ओव्हर्समध्ये 29 रन देत हेटमायर आणि अक्षर पटेल या दोन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. बॅटींगप्रमाणेच बॉलिंगमध्येही आपण टीमच्या विजयात हातभार लावू शकतो, हे व्यंकटेशनं (Who is Venkatesh Iyer?) या मॅचमध्ये दाखवून दिले आहे.
संदर्भ : Who is Venkatesh Iyer, KKR’s latest debutant?
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.