फोटो – ट्विटर, बीसीसीआय, आयपीएल

यूएई आणि ओमान या देशात झालेली T20 वर्ल्ड कप स्पर्धा (T20 World Cup 2021) ऑस्ट्रेलियानं जिंकली आहे. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा ओपनिंग बॅटर डेव्हिड वॉर्नरनं 289 रन केले. त्यानं ऑस्ट्रेलियासाठी ‘करो वा मरो’ अशी परिस्थिती असलेल्या शेवटच्या तीन मॅचमध्ये महत्त्वाचं योगदान देत टीमला पहिल्यांदाच T20 वर्ल्ड कपचं विजेतेपद मिळवून दिलं. वॉर्नरच्या या कामगिरीनंतर त्याला या आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) टीमनं दिलेली वागणूक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आयपीएल सिझन सुरू झाला तेव्हा वॉर्नर SRH टीमचा कॅप्टन होता. स्पर्धेच्या दरम्यान त्याची हैदराबादनं टीममधूनही हकालपट्टी केली होती. वॉर्नरला देण्यात आलेल्या या वागणुकीवर स्पष्टीकरण देताना हैदराबादच्या कोचनं मोठा गौप्यस्फोट (Why David Warner Dropped?) केला आहे.   

काय दिली वागणूक?

वॉर्नर हैदराबादसाठी मॅच खेळण्यासाठी उपलब्ध आहे आणि तरीही बेंचवर बसलाय हे 2014 पासून पहिल्यांदाच घडलं. वॉर्नर या सिझनमधील पहिल्या सहा मॅचमध्ये हैदराबादचा क्रमांक दोनचा यशस्वी बॅट्समन होता. 6 पैकी दोन वेळा त्यानं हाफ सेंच्युरी झळकावली. पण त्याचा स्ट्राईक रेट हा 110 इतका कमी होता. हैदराबादचे  5 पैकी 4 पराभव रनचा पाठलाग करताना झाले. यापैकी एकाही मॅचमध्ये वॉर्नरला शेवटपर्यंत उभं राहून टीमसाठी मॅच जिंकून देता आली नाही.

आयपीएलचा सेकंड हाफ चार महिन्यांच्या ब्रेक नंतर सुरू झाला. या चार महिन्यांमध्येही वॉर्नर क्रिकेटपासून दूर होता. या हाफमधील पहिल्या मॅचमध्ये 0 आणि दुसऱ्या मॅचमध्ये फक्त 2 रन वॉर्नरनं काढले होते. त्यानंतर टीम मॅनेजमेंटनं व़ॉर्नरला वगळून जेसन रॉयचा (Jason Roy) टीममध्ये समावेश केला.

ऑस्ट्रेलियाचा वनवास संपला, न्यूझीलंडला हरवत बनले वर्ल्ड चॅम्पियन

काय केला गौप्यस्फोट?

SRH टीमचे असिस्टंट कोच ब्रॅड हॅडीननं (Brad Haddin) ‘ग्रेड क्रिकेटर्स’ या पॉडकास्टमध्ये याबाबतचं गौप्यस्फोट (Why David Warner Dropped?) केला आहे. ‘वॉर्नरला काढण्याचं कारण क्रिकेटशी संबंधित नव्हतं,’ असा दावा हॅडीननं केला आहे. ‘मी तुम्हाला सांगतो की, हा निर्णय क्रिकेटशी संबंधित नव्हता. माझ्या मते तुम्ही डेव्हिडबाबत एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, तो आऊट ऑफ फॉर्म नव्हता. त्यानं एक मोठा ब्रेक घेतला होता. तो बांगलादेश किंवा वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर गेला नव्हता. तो ब्रेक त्याच्यासाठी चांगला ठरला होता. तो नेटमध्ये चांगला खेळत होता. पण, काही गोष्टी आमच्या नियंत्रणात (Why David Warner Dropped?)  नव्हत्या. कोचिंग स्टाफही त्यामध्ये काही करू शकत नव्हता. असा गौप्यस्फोट हॅडीननं केला आहे.  

हॅडीन पुढे म्हणाला की, ‘वॉर्नर आऊट ऑफ फॉर्म होता म्हणून त्याला काढलं नाही. त्यानं लय सापडण्यासाठी काही मॅच खेळणं आवश्यक होतं. या वर्ल्ड कपमध्ये आपण ते शेवटच्या टप्प्यात पाहिले. त्यामध्ये त्यानं त्याचा क्लास दाखवला.’ असं हॅडीननं सांगितलं.

कुणाकडं इशारा….

डेव्हिड वॉर्नरला SRH च्या टीममधून काढण्याचा निर्णय कुणाचा होता?  त्याबाबत हॅडीननं नेमकं नाव सांगितलं नाही. पण त्याचा इशारा टीमच्या मालकांकडं आहे असं मानलं जात आहे. वॉर्नरला काढण्याचा आदेश SRH टीमच्या मालकांनीच दिला, असं हॅडीनला यामधून सुचवायचं आहे, असं मानलं जात आहे.

एक अध्याय संपला! डेव्हिड वॉर्नर आणि SRH नं घेतला एकमेकांचा निरोप

सनरायझर्स हैदराबादचा वरिष्ठ खेळाडू मनिष पांडे (Manish Pandey) याला टीममधून वगळण्याच्या निर्णयावर वॉर्नरनं जाहीर नाराजी व्यक्त केली होती. दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्ध 25 एप्रिल रोजी झालेल्या मॅचमध्ये वॉर्नरनं नाराजी व्यक्त केली होती. या वक्तव्यानंतरच वॉर्नर आणि SRH मॅनेजमेंटचे संबंध विकोपाला गेले आणि त्यामधून त्याची हकालपट्टी झाली, असा आजवरचा अंदाज होता. पण, आता हॅडीनच्या ताज्या गौप्यस्फोटानं या प्रकरणाला वेगळं वळण आलं आहे.

डेव्हिड वॉर्नरनं T20 वर्ल्ड कपपूर्वी बोलताना पुढील सिझनमध्ये आपण सनरायझर्स हैदराबादकडून खेळणार नसल्याचं जाहीर (Why David Warner Dropped?) केलं आहे. पुढील सिझनपूर्वी मेगा ऑक्शन होणार असून या ऑक्शनमध्ये वॉर्नरला त्याला वर्ल्ड कपमधील खेळ पाहाता चांगली रक्कम मिळणार हे स्पष्ट आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: