फोटो – बीसीसीआय, आयपीएल

आयपीएल 2022 स्पर्धा सुरू होऊन आता दोन आठवडे उलटले आहेत. प्रत्येक टीमनं किमान 4 मॅच तरी खेळल्या आहेत. या स्पर्धेचा सुरूवातीचा महत्त्वाचा टप्पा आता पार पडला आहे. आत्तापर्यंतच्या मॅचेसमधून स्पर्धेचा ट्रेंड कोणत्या दिशेला जात आहे, हे स्पष्ट होतय. गेल्या काही वर्षांमध्ये टीम इंडियाच्या शर्यतीमध्ये मागे पडलेल्या 3 भारतीय खेळाडूंच्या करिअरला या आयपीएल सिझनमध्ये (Boost for 3 Indian Players) संजीवनी मिळाली आहे.

शिवम दुबे

सध्या चेन्नई सुपर किंग्सकडून (Chennai Super Kings) खेळत असलेल्या शिवम दुबेनं (Shivam Dube) 1 वन-डे आणि 13 T20 इंटरनॅशनलमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. शिवम शेवटचं कोरोना लॉक डाऊन लागण्याच्या थोडं आधी म्हणजेच फेब्रुवारी 2020 मध्ये टीम इंडियाकडून खेळला. कधी युवराज सिंह तर कधी हार्दिक पांड्याशी त्याची तुलना करण्यात आली, पण शिवमच्या करिअरला गेल्या 2 वर्षांमध्ये टेक ऑप मिळाला नाही. मागील दोन सिझन त्याचा आयपीएल फॉर्मही साधारण होता.

या आयपीएलमध्ये शिवम पहिल्यांदाच सीएसकेकडून खेळतोय. सीएसकेची कामगिरी पहिल्या 5 मॅचमध्ये साधारण झाली असली तरी शिवमनं नवी भरारी घेतलीय. त्यानं 5 मॅचमध्ये 2 हाफ सेंच्युरीसह 207 रन केले आहे. यामध्ये त्याचा स्ट्राईक रेट हा 176.92 इतका आहे. टीम इंडियात फिनिशरच्या जागेसाठी हार्दिक पांड्या आणि व्यंकटेश अय्यरमध्ये स्पर्धा सुरू होती. या स्पर्धेत आता शिवमनंही एन्ट्री (Boost for 3 Indian Players) केली आहे.

IPL 2022: चेन्नई सुपर किंग्सचा नवा ‘लॉर्ड शिवम दुबे’!

उमेश यादव

‘विदर्भ एक्स्प्रेस’ म्हणून ओळखण्यात येणाऱ्या उमेश यादवनं (Umesh Yadav) यंदा तब्बल 2 वर्षांनी आयपीएल स्पर्धेत कमबॅक केले. केकेआरक़डून त्यानं सिझनमधील पहिल्याच ओव्हरमध्ये मागील आयपीएल सिझनमध्ये ऑरेंज कॅप मिळवणाऱ्या ऋतुराज गायकवाडला आऊट केले. त्या विकेटनंतर उमेशनं मागं वळून पाहिलेलं नाही.

केकेआरच्या सुरूवातीच्या यशात उमेशचा महत्त्वाचा वाटा आहे. उमेशनं 6.60 च्या इकोनॉमी रेटनं 10 विकेट्स घेतल्या आहेत. पहिल्या 6 ओव्हर्सच्या ‘पॉवर प्ले’ विकेट्स घेत उमेश प्रतिस्पर्धी टीम्सना बॅकफुटवर ढकलण्याचं काम करत आहे. उमेश आता टेस्ट टीमचाही नियमित सदस्य नाही. लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमध्ये तो शेवटचं 2019 साली खेळला आहे. भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी या दोन सिनिअर बॉलर्सची T20 मधील कामगिरी साधारण होत असताना उमेश पुन्हा एकदा फॉर्मात आलाय. विदर्भ एक्स्प्रेससाठी ही गूड न्यूज (Boost for 3 Indian Players) आहे.

कुलदीप यादव

या आयपीएलमध्ये चायनामन बॉलर कुलदीप यादवच्या करिअरलाही संजीवनी मिळाली आहे. कुलदीप यादवसाठी मागील 3 आयपीएल सिझन भलतेच खराब गेले. त्याला या काळात फक्त 14 मॅच खेळण्याची संधी मिळाली. त्यामध्ये त्यानं अवघ्या 5 विकेट्स घेतल्या. 2021 मधील आयपीएलमध्ये तर केकेआरनं त्याला संपूर्ण सिझन खेळवलंच नाही.

या आयपीएल ऑक्शनमध्ये दिल्ली कॅपिटल्सनं कुलदीपला खरेदी केलं. दिल्लीकडून त्याचा खेळ बहरला आहे. त्यानं 4 मॅचमध्ये 10 विकेट्स घेतल्या आहेत. दिल्लीनं जिंकलेल्या पहिल्या 2 मॅचमध्ये ‘प्लेयर ऑफ द मॅच’ कुलदीपच होता. दुर्मिळ गटातील बॉलर असलेला कुलदीपचा हा फॉर्म टीम इंडियासाठीही (Boost for 3 Indian Players) महत्त्वाचा आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: