फोटो – सोशल मीडिया, आरसीबी

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) टीमनं आगामी सिझनसाठी त्यांचा कॅप्टन जाहीर केला आहे. आरसीबीनं अपेक्षेप्रमाणे फाफ ड्यू प्लेसिसची (Faf du Plessis) कॅप्टनपदी नियुक्ती केली आहे. राहुल द्रविड, केव्हिन पीटरसन, अनिल कुंबळे, डॅनियल व्हिटोरी, विराट कोहली आणि शेन वॉटसन यांच्यानंतरचा फाफ हा सातवा आरसीबीचा कॅप्टन असेल. आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये (IPL 2022 Mega Auction) फाफला खरेदी करताच तो आरसीबीचा कॅप्टन होईल, असा अंदाज होता. तो अखेर खरा ठरला. फाफची आरसीबी कॅप्टनपदी नियुक्ती ही योग्य असल्याची 3 प्रमुख कारणं (Why Faf Good Choice for RCB Captain) आहेत.

कॅप्टनपदाचा अनुभव

फाफ ड्यू प्लेसिसनं 36 टेस्ट, 39 वन-डे आणि 40 T20 इंटरनॅशनलमध्ये दक्षिण आफ्रिकेची कॅप्टनसी केली आहे. यामध्ये त्याने अनुक्रमे 18,28 आणि 25 मॅच कॅप्टन म्हणून जिंकल्या आहेत. T20 इंटरनॅशनलमध्ये त्याच्या विजयाची सरासरी 61.25 आहे. या प्रकारात सर्वाधिक मॅचमध्ये कॅप्टनसी करणाऱ्या यादीमध्ये फाफ 11 व्या क्रमांकावर आहे.

त्याचबरोबर आयपीएल स्पर्धेत तो चेन्नई सुपर किंग्सच्या (Chennai Super Kings) लीडरशीप टीमचा अनेक वर्षांपासून सदस्य होता. त्याला आयपीएलमधील एका यशस्वी टीमच्या कामाची पद्धत माहिती आहे. ती पद्धत तो कॅप्टन म्हणून आरसीबीमध्ये राबवू शकतो.

दक्षिण आफ्रिकेचा चोकर्स टॅग हटण्यासाठी झटणारा लीडर

सिनिअर खेळाडू

आरसीबीसाठी यंदाची आयपीएल स्पर्धा वेगळी आहे. विराट कोहली (Virat Kohli) आता टीमचा कॅप्टन नाही. तर एबी डीव्हिलियर्सने (AB de Villiers) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आयपीएल मेगा ऑक्शननंतर तयार झालेल्या आरसीबीच्या टीममध्ये कॅप्टनपदाचे तीन दावेदार होते.

फाफ ड्यू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल आणि दिनेश कार्तिक यांची नाव कॅप्टनपदासाठी चर्चेत होती. यापैकी मॅक्सवेल वैयक्तित कारणामुळे आयपीएलचा सुरूवातीचा टप्पा खेळणार नाही. दिनेश कार्तिक स्पर्धात्मक क्रिकेट कमीच खेळतो. या दोघांपेक्षाही फाफकडे अनुभव जास्त आहे. तो जगभरातील T20 लीगमध्ये खेळतो. यापैकी काही टीमचा तो कॅप्टनही होता. त्याचबरोबर फाफ पहिल्या मॅचपासून उपलब्ध आहे.

विराट कोहली सारख्या अनुभवी आणि सुपरस्टार खेळाडूपासून ते आरसीबीनं करारबद्ध केलेल्या एखाद्या नवोदीत खेळाडूपर्यंत सर्वांना काही अनुभवाच्या गोष्टी फाफ सांगू शकतो. आरसीबीच्या टीममधील एक प्रकारे डीव्हिलियर्सची जागा तो यंदा भरणार आहे. आरसीबीचा हा अनुभवी खेळाडू कॅप्टनपदाची त्यामुळेच योग्य निवड (Why Faf Good Choice for RCB Captain)  आहे.

आयपीएलचा रेकॉर्ड

फाफ ड्यू प्लेसिस आयपीएल स्पर्धेतील भक्कम रेकॉर्डसह आरसीबीमध्ये दाखल झाला आहे. त्याने 100 आयपीएल मॅचमध्ये 39.94 च्या सरासरीनं 2935 रन केले आहेत. यामध्ये 22 हाफ सेंच्युरींचा समावेश आहे. मागील आयपीएल स्पर्धेत त्यानं 16 मॅचमध्ये 633 रन काढले. ऑरेंज कॅप मिळवणाऱ्या ऋतुराज गायकवाडपेक्षा तो फक्त 2 रननं मागे होता.

RCB Squad Analysis: कशी आहे IPL 2022 ची टीम बंगळुरू? यंदा आयपीएल जिंकणार का?

फाफच्या या भक्कम रेकॉर्डमुळेच आरसीबीनं 7 कोटींची रक्कम मोजत त्याला आयपीएलमध्ये करारबद्ध केलं आहे. आयपीएल स्पर्धेतील यशस्वी बॅटर असलेला फाफ कॅप्टनपदासाठीही योग्य व्यक्ती (Why Faf Good Choice for RCB Captain) आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: