फोटो – ट्विटर, विस्डेन इंडिया

आयपीएल 2022 पूर्वी झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये (IPL 2022 Mega Auction) सर्वच टीमची नव्यानं रचना झाली. गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन नव्या टीम दाखल झाल्यानं आयपीएलचं स्वरूप आणखी बदललं. या आयपीएल सिझनमध्ये 5 भारतीय खेळाडूंनी (5 Good Picks in IPL 2022) पैसा वसूल खेळ करत त्यांच्यावर टीमनं दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला आहे.

युजवेंद्र चहल

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं (Royal Challengers Bangalore) युजवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) रिटेन केले नव्हते. आरसीबीला हा निर्णय चांगलाच महाग पडला आहे. चहलला राजस्थान रॉयल्सनं (Rajasthan Royals) साडेसहा कोटींना खरेदी केले. राजस्थाननं केलेल्या या गुंतवणुकीचा चहलनं भक्कम परतावा दिला आहे.

पहिल्या 6 मॅचमध्ये सर्वाधिक 17 विकेट्स घेत पर्पल कॅपच्या शर्यतीमध्ये आघाडी घेतलीय. कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध एका ओव्हरमध्ये त्यानं हॅट्ट्रिकसह 4 विकेट्स घेतल्या. राजस्थाननं 6 पैकी 5 वेळा नंतर बॅटींग केलीय. आयपीएलमध्ये जाणवणाऱ्या ड्यू फॅक्टरचा कोणताही परिणाम चहलनं बॉलिंगवर होऊ दिलेला नाही. मागील T20 वर्ल्ड कपमध्ये आपल्याला वगळलं ही चूक झाल्याचंच तो निवड समितीला प्रत्येक मॅचमधील खेळातून (5 Good Picks in IPL 2022) सांगतोय. तसंच आगामी T20 वर्ल्ड कपमध्ये त्याला वगळता येणार नाही, हे देखील आता त्यानं नक्की केलंय.

कुलदीप यादव

युजवेंद्र चहलचा टीम इंडियातील जुना पार्टनर कुलदीप यादव (Kuldeep Yadav) या आयपीएलपूर्वी अजिबात फॉर्ममध्ये नव्हता. त्याला दिल्ली कॅपिटल्सनं (Delhi Capitals) फक्त 2 कोटींना खरेदी केले. गेले संपूर्ण सिझन केकेआरच्या बेंचवर  बसलेल्या कुलदीपला दिल्लीचा कॅप्टन ऋषभ पंतनं (Rishabh Pant) विश्वास दिला. कुलदीपनं सर्वोत्तम कामगिरी करत हा विश्वास सार्थ ठरवलाय.

कुलदीप सध्या दिल्ली कॅपिटल्सचा सर्वात यशस्वी बॉलर आहे. जमलेली जोडी फोडण्याचं किंवा सर्वात धोकादायक बॅटरला आऊट करण्याचं काम तो करतोय. दिल्लीनं जिंकलेल्या पहिल्या तीन्ही मॅचमध्ये कुलदीप ‘प्लेयर ऑफ द मॅच’ आहे.

टीम इंडियातून मागे पडलेल्या 3 खेळाडूंच्या कारकिर्दीला मिळली नवी संजीवनी

राहुल त्रिपाठी

पुण्याच्या राहुल त्रिपाठीनं (Rahul Tripathi) मागील दोन सिझनमध्ये केकेआरकडून निरनिराळ्या नंबरवर चांगला खेळ केला होता. त्रिपाठीला यंदा सनरायझर्स हैदराबादनं (Sunrisers Hyderabad) तब्बल साडेआठ कोटींना खरेदी केलंय. तसंच त्याला तीन नंबरवर खेळण्याची फिक्स जागा दिली आहे.

त्रिपाठीनं पहिल्या 6 मॅचमध्ये हैदराबादकडून सर्वाधिक 173.72 च्या स्ट्राईक रेटनं सर्वाधिक 205 रन केले आहेत. त्यात कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध केलेल्या आक्रमक 37 बॉलमध्ये 71 रनचा समावेश आहे. हैदराबादची बॅटींग टॉप 5 खेळाडूंवर अवलंबून आहे. या 5 जणांमध्ये त्रिपाठी हा भक्कम आधारस्तंभ (5 Good Picks in IPL 2022) बनलाय.

शिवम दुबे

राजस्थान रॉयल्सकडून (Rajasthan Royals) गेल्या सिझनमध्ये खेळलेल्या शिवम दुबेला (Shivam Dube) चेन्नई सुपर किंग्सनं 4 कोटींना खरेदी केले. मागील 3 आयपीएल सिझनमध्ये मिळून 1 हाफ सेंच्युरी करणाऱ्या शिवमनं या सिझनमधील पहिल्या पाच मॅचमध्येच दोन हाफ सेंच्युरी झळकावल्या आहेत. सीएसकेच्या निराशाजनक कामगिरीत त्यांना शिवमच्या रूपानं एक चांगला खेळाडू यंदा मिळाला आहे.

IPL 2022: चेन्नई सुपर किंग्सचा नवा ‘लॉर्ड शिवम दुबे’!

तिलक वर्मा

सीएसकेप्रमाणेच मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) देखील हा सिझन निराशाजनक ठरला आहे. या खराब सिझनमध्ये तिलक वर्मा (Tilak Varma) हा तरूण भारतीय बॅटर त्यांना मिळाला आहे. तिलकचा हा पहिलाच आयपीएल सिझन आहे. त्याला मुंबई इंडियन्सनं फक्त 1 कोटी 70 लाखांना खरेदी केलंय.

रोहित शर्मा, इशान किशन हे मुंबईच्या टॉप ऑर्डरचे बॅटर फेल होत असताना तिलक सातत्यानं चांगला खेळतोय. त्यानं पहिल्या 7 मॅचमध्ये 46.80 च्या सरासरीनं 234 रन केले आहेत. यामध्ये 2 हाफ सेंच्युरींचा समावेश आहे. 19 वर्षाच्या तिलकचा भविष्य काळ हा उज्ज्वल असल्याचं त्यानं पहिल्याच सिझनमध्ये दाखवून (5 Good Picks in IPL 2022) दिलंय.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: