फोटो – ट्विटर

आयपीएलमध्ये सतत कॅप्टन बदलणारी टीम अशी ओळख मिळालेल्या पंजाब किंग्जला आजवर एकदाही या स्पर्धेचं विजेतेपद मिळवता आलेलं नाही. यंदाच्या लिलावापूर्वी (IPL 2022 Mega Auction) पर्समध्ये सर्वाधिक रक्कम (72 कोटी) पंजाब किंग्जकडेच होती. त्यामुळे पंजाबने आयपीएल लिलावात टीमची नव्यानं बांधणी केली आहे. या नव्या टीममध्ये काही उपयुक्त खेळाडूंना पंजाबने खरेदी केले आहे. त्यापैकी 5 खेळाडूंमध्ये पंजाब किंग्जचं (5 important players of Punjab Kings) भविष्य बदलण्याची क्षमता आहे.

1. मयंक अग्रवाल

मयंक अग्रवालवर (Mayank Agarwal) पंजाबच्या मॅनेजमेंटनं विश्वास दाखवत त्याला फक्त रिटेन केले नाही तर या सिझनमध्ये कॅप्टन केले आहे. गेली 5 सिझन मयांक पंजाबकडून खेळत आहे. के एल राहुल नंतरचा महत्त्वाचा बॅटर म्हणून त्याने या काळात स्थान निर्माण केले. मयांकने पंजाबकडून खेळताना आत्तापर्यंत 1317 रन्स केले आहेत. ‘पॉवर प्ले’ मध्ये झटपट रन्स, तसंच सेट झाल्यावर मोठे स्कोर करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. IPL 2020 मध्ये राजस्थानविरुद्ध केलेली सेंच्युरी हे या क्षमतेचं मुख्य उदाहरण.

आंतरराष्ट्रीय स्तरावर कधीही मयांकने कधीही कॅप्टनसी केलेली नाही. कॅप्टन म्हणून हा सिझन त्याच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. अनेक अनुभवी खेळाडू यंदा पहिल्यांदाच पंजाबकडून खेळत आहेत. (उदा शिखर धवन, कागीसो रबाडा) टीममध्ये खेळीमेळीचं वातावरण निर्माण करणे हे मयंकसाठी आव्हान आहे. गेल्या तीन वर्षापासून दिल्लीकडून आयपीएल गाजवणाऱ्या धवन सोबत मयंकची ओपनिंग पंजाबसाठी किती फायदेशीर ठरेल हे आगामी आयपीएलमध्ये स्पष्ट होईल.

IPL 2022: पंजाब किंग्जनं मयांक अग्रवालला कॅप्टन केल्याची 3 प्रमुख कारणं…

2. शिखर धवन

पंजाब किंग्सजला शिखर धवनला (Shikhar Dhawan) टीममध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी तब्बल आठ कोटी 25 लाख इतकी मोठी रक्कम मोजावी लागली आहे. ही धवनची पाचवी आयपीएल टीम आहे. तो यापूर्वी दिल्ली डेअरडेव्हिल्स, मुंबई इंडियन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला आहे.

धवनने 2016 पासून आयपीएलच्या प्रत्येक सिझनमध्ये चारशेहून अधिक रन्स केल्या आहेत. आयपीएल इतिहासात सर्वाधिक फोर मारण्याचा रेकॉर्ड धवनच्या नावावर आहे. याशिवाय शिखर धवनने हैदराबाद टीमची कॅप्टनसी देखील केली आहे. धवनकडे असलेला अनुभव, सध्याचा आयपीएल फॉर्म या दोन्ही गोष्टी पंजाबच्या टीमचं नशीब बदलायला कारणीभूत ठरू शकतात.

3. जॉनी बेअरस्टो

इंग्लंडच्या या आक्रमक विकेट किपर-बॅटरनं 28 आयपीएल मॅचमध्ये 41. 52 च्या सरासरीनं आणि 142 च्या स्ट्राईक रेटनं 1038 रन्स बेअरस्टोने काढले आहेत. विकेट किपिंग करण्याच्या क्षमतेमुळे जॉनी बेअरस्टो हा ऑल राऊंडर म्हणूनच ओळखला जातो. सनरायझर्स हैदराबादने लिलावादरम्यान बेअरस्टोला टीममध्ये पुन्हा एकदा घेण्यासाठी प्रयत्न केले पण अखेरीस सहा कोटी 75 लाख किंमत लावून पंजाबने बेअरस्टोला त्यांच्याकडून खेचून आणले.

बेअरस्टो (Johnny Bairstow) ओपनिंगला येणार की मिडल ऑर्डरमध्ये खेळणार हे स्पर्धा सुरू झाल्यावर समजेल. बेअरस्टोसाठी 2022 हे यशस्वी वर्ष ठरतंय. त्याने ऑस्ट्रेलिया आणि वेस्टइंडीजमध्ये सेंच्युरी झळकावली आहे बेअरस्टोचा हाच फॉर्म आयपीएलमध्ये कायम राहिल्यास हैदराबादला त्याला रिटेन न केल्याबद्दल पश्चाताप वाटू शकतो.

4. कागिसो रबाडा

कागिसो रबाडाने (Kagiso Rabada) आयपीएलमध्ये पदार्पण केल्यापासून कोणत्याही बॉलरच्या तुलनेत सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. वयाच्या 26 व्या वर्षी तो साउथ आफ्रिकेचा बॉलिंग अटॅक समर्थपणे सांभाळतोय. IPL 2020 मध्ये रबाडा ‘पर्पल कॅप’चा मानकरी ठरला होता. महत्त्वाचा मॅचेसमध्ये विकेट घेण्याची, पॉवरप्लेमध्ये रन्स रोखण्याची जबाबदारी रबाडावर असणार आहे. अर्शदीप सिंह, ईशान पोरेल, रिषी धवन आणि नाथन एलिस या बॉलर्सची रबाडाला साथ मिळणार आहे.

5. शाहरुख खान

पंजाब किंग्जचा कायरन पोलार्ड अशी ओळख मिळालेल्या शाहरुख खानवर (Shahrukh Khan) शेवटच्या ओव्हर्समध्ये वादळी बॅटींग करण्याची जबाबदारी असेल. टीमच्या अपेक्षित धावसंख्येत किमान 20 रनची वाढ करण्याची जबाबदारी शाहरुखवर असणार आहे. तसंच तो टीमसाठी सहावा किंवा सातवा बॉलिंग ऑप्शन ठरू शकतो.

शाहरूख खाननं शेवटच्या बॉलवर सिक्स लगावत तामिळनाडूला केलं चॅम्पियन, 4 बॉलमध्ये ठोकले 22 रन! VIDEO

शाहरूख खान टी20 साठी भारतीय निवड समितीच्या रडारवर असलेला एक महत्त्वाचा खेळाडू आहे. धवन, बेअरस्टो प्रमाणे शाहरूख देखील फॉर्ममध्ये (5 important players of Punjab Kings) आहे. त्याने नुकतीतच रणजी स्पर्धेत दिल्ली विरुद्ध 148 बॉल्समध्ये 194 धावांची तडाखेबंद खेळी केली होती.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: