फोटो – ट्विटर, लखनौ सुपर जायंट्स

आयपीएलच्या या सीझनमध्ये (IPL 2022) 8 ऐवजी 10 टीमचा समावेश झाला आहे. टीमची संख्या वाढल्यामुळे मॅचेसची संख्या देखील वाढली आहे. आता पुढचे दोन महिने अनेक दिग्गज खेळाडूंना एकत्र खेळताना पाहण्याची संधी देखील क्रिकेट फॅन्सना मिळणार आहे. लखनौ सुपरजायंट्स (Lucknow Super Giants) आणि गुजरात टायटन्स (Gujrat Titans) या दोन टीम या सिझनमध्ये पहिल्यांदाच खेळणार आहेत. लखनौनं मेंटॉर गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि हेड कोच अँडी फ्लॉवरच्या (Andy Flower) मार्गदर्शनाखाली पहिल्या सिझनसाठी चांगली टीम बांधली आहे. लखनौमध्ये अनेक उपयुक्त खेळाडूंचा समावेश आहे. या टीममधील 5 जणांमुळे लखनौला (Lucknow Supergiants 5 key players) विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे.

1. के एल राहुल

के. एल. राहुलला (KL Rahul) विक्रमी 17 कोटींमध्ये लखनौ सुपरजायंट्सनं खरेदी केलं आहे. लखनौचे नेतृत्व राहुल करणार आहे. पंजाब किंग्जकडून खेळताना राहुलचा परफॉर्मन्स सर्वोत्तम होता. गेल्या चारही सीझनमध्ये पंजाबकडून सर्वाधिक रन्स राहुलच्या नावावर आहेत. आयपीएल 2020 मध्ये राहुल ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला होता. या सीझनमध्ये राहुलसोबत डी कॉक ओपनिंगला येणार आहे. या जोडीने संपूर्ण स्पर्धेत दमदार ओपनिंग केली तर प्रतिस्पर्धी टीमवर दडपण येऊ शकते.

IPL 2022: टीम इंडियाच्या तोंडचं पाणी पळवणारा झाला सर्वात महागड्या टीमचा कोच!

2. क्विंटन डी कॉक

2019 आणि 2021 या सीझनमधील आयपीएलचं विजेतेपद मिळवलेल्या मुंबई इंडियन्स टीमचा क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) भाग होता. आयपीएल कारकिर्दीत डी कॉकने आत्तापर्यंत 77 मॅचमध्ये 31.3 च्या सरासरीनं आणि 132 च्या स्ट्राईक रेटनं 2256 रन केले आहेत. या सिझनमध्ये क्विंटननं नेहमीच्या आक्रमक स्वभावाने बॅटिंग केली तर प्रतिस्पर्धी टीमला त्याला रोखणे अवघड होईल.

2. जेसन होल्डर

सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असलेल्या सर्वोत्तम ऑलराऊंडर्समध्ये जेसन होल्डरचा (Jason Holder) समावेश होतो. लखनौने होल्डरला पावणे नऊ कोटी इतक्या मोठ्या किंमतीत आपल्या संघात घेतले आहे. स्विंग बॉलिंगच्या कौशल्याने रन्स रोखताना विकेट्सही घेऊ शकतो..बॅटिंगमध्ये देखील होल्डर उत्तम फिनिशिर आहे. इंग्लंडविरूद्ध झालेल्या T20 मध्ये होल्डरने चार बॉल्समध्ये लागोपाठ चार विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड त्याने केला होता. संपूर्ण फॉर्मात असलेला होल्डर या स्पर्धेत राहुलचं ट्रम्प कार्ड (Lucknow Supergiant 5 key players) ठरणार आहे.

4. रवी बिश्नोई

2020 झालेल्या अंडर 19 वर्ल्ड कपमधील (U19 World Cup 2022) भारतीय टीममधून मुख्य टीम इंडियात पदार्पण केलेला बिश्नोई (Ravi Bishnoi) पहिला खेळाडू आहे. लखनौ टीमकडून खेळताना स्पिन अटॅकची जवाबदारी बिश्नोईवर असेल. याआधी राहुल प्रमाणेच बिश्नोई (Ravi Bishnoi) पंजाब किंग्जकडून खेळला आहे. आयपीएलमध्ये बिश्नोईने 23 मॅचमध्ये 7 पेक्षा इकॉनॉमी रेटने 24 विकेट्स घेतल्या आहेत. लखनौनं ऑक्शनपूर्वीच बिश्नोईला करारबद्ध करत त्यावर मोठा विश्वास दाखवला आहे.

LSG Squad Analysis: कशी आहे 2022 ची लखनौ? पहिल्याच सिझनमध्ये किती ‘गंभीर’?

5. आवेश खान

आवेश खान (Avesh Khan) आयपीएल ऑक्शनच्या इतिहासात सर्वाधिक बोली लागलेला अनकॅप्ड खेळाडू ठरला आहे. 2016 अंडर 19 वर्ल्डकप खेळलेल्या आवेशला लखनौने 10 कोटी इतक्या मोठ्या किंमतीत खरेदी केले होते. गेल्या सिझनमध्ये दिल्लीकडून खेळताना विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी या दिग्गजांच्या विकेट घेत आवेशनं (Avesh Khan) सर्वांचं लक्ष वेधलं होतं. टीम इंडियाचं भविष्य समजल्य जाणाऱ्या आवेशसाठी हा आयपीएल सिझन खूप महत्त्वाचा (Lucknow Supergiant 5 key players) आहे. त्यामुळे तो या सिझनमध्ये जीव तोडून बॉलिंग करेल यात शंका नाही.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज व्हॉट्सअप करा.

error: