फोटो – सोशल मीडिया

चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) प्रमुख खेळाडू अंबाती रायुडू (Ambati Rayudu) नव्या वादात सापडला आहे. सीएसकेचं आयपीएल 2022 मधील आव्हान आता संपुष्टात आलंय. रायुडू आयपीएल वगळता अन्य कोणत्याही क्रिकेटमध्ये सक्रीय नाही. प्रचंड गुणवत्तेला परिस्थितीची साथ न मिळाल्यानं त्याची कारकिर्द बहरली नाही. आता क्रिकेट कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर असलेल्या रायुडूच्या रिटायरमेंटनं नवा वाद (Rayudu Retirement Controversy) निर्माण झाला आहे.  

नेमके काय घडले?

या सर्व प्रकरणाची सुरूवात रायुडूच्या एका ट्विटनं झाली. ‘मला हे सांगताना आनंद होतोय की हे माझं शेवटचं आयपीएल आहे. 13 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये मी दोन महान टीममध्ये चांगला काळ घालवला. या सुंदर प्रवासासाठी मी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही टीमचे मनापासून आभार मानतो.’ असं रायुडूनं जाहीर केलं.

थोड्याच वेळात घुमजाव

रायुडूनं निवृत्ती जाहीर करताच त्याला अनेकांनी शुभेच्छा देण्यास सुरूवात केली. त्यानंतर काही मिनिटांमध्येच त्यानं हे ट्विट डिलिट करत निवृत्ती मागे घेतली. चेन्नई सुपर किंग्सचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी रायुडू निवृत्त होत असल्याची बातमी फेटाळाली तसंच या विषयावर स्पष्टीकरण दिलं.

‘नाही, नाही. तो (अंबाती रायुडू) निवृत्त होणार नाही. तो कदाचित त्याच्या कामगिरीवर समाधानी नसेल त्यामुळे त्याची ही नाराजी बाहेर आली असावी. माझ्या मते ही एक मानसिक अवस्था आहे. तो आमच्याकडून खेळणार आहे.’ रायुडू पुढच्या आयपीएल सिझनमध्येही सीएसकेकडून खेळणार असल्याचं त्यांनी स्पष्ट (Rayudu Retirement Controversy) केलं.

आणखी एक वाद

अंबाती रायुडू आणि वाद हे एक घट्ट समीकरण आहे. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीच्या अगदी सुरूवातीला सुरू झालेली ही गोष्ट दुर्दैवानं आजही सुरूच आहे. तो 2007 साली इंडियन क्रिकेट लीगमध्ये (ICL) सहभागी झाला होता. हैदराबाद क्रिकेटच्या राजकारणाला कंटाळून त्यानं हा निर्णय घेतला. या निर्णयामुळे बीसीसीआयनं त्याच्यावर काही वर्ष बंदी घातली. रायुडूच्या क्रिकेट कारकिर्दीला हा खूप मोठा सेटबॅक होता.

रायुडूचा हैदराबादमध्ये काही ज्येष्ठ नागरिकांशीही वाद झाला होता. त्याच्या कारचा धक्का मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना बसला. त्यामधून त्यांचा वाद झाला. त्यावेळी रायुडूनं त्यांना धक्काबुक्की केली होती.

आयपीएल 2016 साली मुंबई इंडियन्सकडून खेळताना त्याचा भर मैदानात हरभजन सिंगशी त्याचे वाजले. 2019 साली वर्ल्ड कप स्पर्धेत निवड न झाल्यानं त्यानं एक ट्विट करत तत्कालिन निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांना डिवचलं होतं. या ट्विटनंतर बीसीसीआयनं त्याच्या नावावर फुली (Rayudu Retirement Controversy) मारली.

टीम इंडियाचा न झालेला सुपरस्टार!

वादापलिकडचा रायुडू

अंबाती रायुडू त्याच्या कारकिर्दीमधील अनेक वादग्रस्त घटनांमुळे दुर्दैवी ठरलाय. पण, त्याची खेळातील गुणवत्ता, टीमबद्दलची बांधिलकी कोणीही नाकारू शकत नाही. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन सर्वात यशस्वी आयपीएल टीमचा तो सदस्य राहिलाय. रोहित शर्मा (6 विजेतेपद) नंतर त्यानंच 5 आयपीएल विजेतेपद पटकावली आहेत.

त्यानं 187 मॅचमध्ये 22 हाफ सेंच्युरी आणि 1 सेंच्युरीसह 4187 रन केले आहेत. टीमच्या गरजेप्रमाणे नंबर 1 ते 8 पर्यंत कोणत्याही नंबरवर त्यानं बॅटींग केलीय. परिस्थितीप्रमाणे बॅटींग करण्यासाठी तो ओळखला जातो. त्याचबरोबर त्यानं टीम इंडियाकडून खेळताना 55 वन-डेमध्ये 47. 05 च्या सरासरीनं 1694 रन केले आहेत. यामध्ये 3 सेंच्युरी आणि 10 हाफ सेंच्युरींचा समावेश आहे.

रायुडूच्या खेळाचा दर्जा पाहात त्याची 2019 साली झालेल्या वर्ल्ड कप क्रिकेट टीममध्ये त्याची निवड व्हायला हवी होती. पण, निवड समितीनं फक्त एका सीरिजमधील कामगिरीच्या आधारे रायुड़ूकडे दुर्लक्ष केले. निवड समितीचा आणि बीसीसीआयच्या लहरी, पक्षपाती कारभाराचा त्याची कारकिर्द वादग्रस्त बनण्यात मोठा वाटा (Rayudu Retirement Controversy) आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: