सौजन्य- सोशल मीडिया

आयपीएलचा पंधरावा सिझन (IPL 2022) सुरु होण्याआधीच लखनौ सुपरजायंट्सला (Lucknow Super Giants) मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा फास्ट बॉलर मार्क वूड (Mark Wood) कोपराच्या दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून आऊट झाला आहे. . लखनऊने मार्क वुडला सात कोटी पन्नास लाख इतक्या किमतीत विकत घेतले होते. परंतु वूड दुखापतग्रस्त झाल्यानं त्याला पर्याय लखनौच्या मॅनेजमेंटनं शोधला आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार, लखनौ सुपर जायंट्स बांगलादेशचा फास्ट बॉलर तस्किन अहमदला करारबद्ध करण्याच्या (Taskin ahmed replace mark wood) प्रयत्नात आहे. तस्किन अहमद यापूर्वी कधीही आयपीएलमध्ये खेळलेला नाही.

लखनौ टीमचा मेंटॉर गौतम गंभीर (Gautam Gambhir) तस्कीन अहमदच्या बॉलिंगनं प्रभावित झाला आहे. उजव्या हाताने फास्ट बॉलिंग करणारा तस्किन आऊटस्विंग करण्यात एक्स्पर्ट आहे. बांगलादेशी मीडियाच्या रिपोर्टनुसार गौतम गंभीरनं तस्किनला लखनौ टीमकडून खेळण्याचं आमंत्रण दिलं आहे.

IPL 2022 : 26 खेळाडू स्पर्धेतून आऊट, 2 टीमना बसणार सर्वात मोठा फटका!

धोनीसोबतचा वादग्रस्त फोटो…

बांगलादेशी वेबसाईट नुसार गौतम गंभीर म्हणाला की, ‘आम्ही आयपीएल 2022 साठी तस्किनला लखनौ सुपर जायंट्स टीममध्ये समाविष्ट करण्यात उत्सुक आहोत. तस्किननं ही ऑफर स्वीकारली तर (Taskin ahmed replace mark wood) त्याला दक्षिण आफ्रिकेतील टेस्ट सीरिजमध्ये खेळता येणार नाही. सध्या तस्किन दक्षिण आफ्रिकेत वनडे सीरिज खेळत आहे. टी20 क्रिकेटमध्ये तस्किनच्या नावावर 33 मॅचमध्ये 23 विकेट्स आहेत.

सौजन्य- ट्विटर

2016 साली भारत आणि बांग्लादेश यांच्यात झालेल्या आशिया कप स्पर्धेच्या फायनलपूर्वी व्हायरल झालेल्या एका वादग्रस्त फोटोमुळे तस्किन आजही भारतीय फॅन्सच्या लक्षात आहे. या फायनलपूर्वी तस्किनच्या हातात धोनीचे कापलेले डोके फोटोशॉपच्या माध्यमातून बांगलादेशी सोशल मीडियानं दाखवले होते. बांगलादेशच्या क्रिकेट फॅन्सनी तो फोटो व्हायरल केला होता. त्यामुळे भारतामध्ये संतापाची लाट निर्माण झाली होती.

आजही बांगलादेशी टीम आणि त्यांचे फॅन्स अनेकांचे नावडते असल्याचं मुख्य कारण म्हणजे हा त्यांनी केलेला संतापजनक प्रकार होता. तस्किननं त्या सीरिजमध्ये लक्षवेधी बॉलिंग केली होती पण फॅन्सच्या खोडसाळपणामुळे तो नाहक वादात अडकला होता.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: