फोटो – दिल्ली कॅपिटल्स

आयपीएलच्या पंधराव्या सिझनची (IPL 2022) सुरुवात दिल्ली कॅपिटल्ससाठी (Delhi Capitals) धडाक्यात झाली आहे. ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या मॅचमध्ये दिल्लीने पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावलेल्या मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) 4 विकेट्सने पराभव केला. मुंबईने दिलेले 178 रन्सचं आव्हान दिल्लीच्या टीमने 9 बॉल्स शिल्लक ठेवत पूर्ण केले. अक्षर पटेल (Axar Patel) आणि ललित यादव (Lalit Yadav) या जोडीने हा विजय अक्षरशः खेचून आणला. दिल्लीचा हा आनंद दुर्दैवाने फार काळ टिकू शकला नाही. कारण, दिल्लीचा ऑलराऊंडर मिचेल मार्श जखमी (Mitchell Marsh hip injury) झाला आहे.

मार्श दुखापतीमुळे 29 मार्चपासून सुरू होणाऱ्या पाकिस्तान विरूद्धच्या लिमिटेड ओव्हर्सच्या (Australia vs Pakistan) मालिकेत खेळू शकणार नाही. तीन मॅचच्या टेस्ट सीरिजनंतर आता दोन देशांमध्ये 3 वन-डे आणि एकमेव T20 मॅचच सीरिज होणार आहे. या सीरिजमध्ये मार्श खेळू शकणार नसल्याचं ऑस्ट्रेलियाचा या फॉर्मेटमधील कॅप्टन आरोन फिंच याने जाहीर केलं आहे.

काय म्हणाला फिंच?

फिंच म्हणाला, ‘मिचेल मार्शला झालेली दुखापत दुर्दैवी आहे. दुखापतीमुळे होणाऱ्या वेदना पाहून मार्श पाकिस्तान विरुद्ध वनडे आणि टी ट्वेंटी सिरीजमध्ये सहभागी होईल असं वाटत नाही.’ मार्शच्या दुखापतीमूळे ऑस्ट्रेलियन टीमचंच नुकसान होणार नाही तर दिल्ली कॅपिटल्सलाही मार्शच्या अनुपस्थितीचा फटका बसणार आहे. दिल्लीच्या टीममधील विदेशी खेळाडूंचा विचार केला तर मार्श दिल्ली टीमसाठी खऱ्या अर्थाने ‘Asset’ होता.

IPL 2022, MI vs DC : रोहित शर्माच्या चुकीचा फटका, दिल्लीनं पळवला मुंबईचा विजय!

दुखापतींचा इतिहास

मिचेल मार्शला दिल्लीनं 6 कोटी 50 लाख रुपयांमध्ये खरेदी केले होते. गेल्या एक दीड वर्षातील मार्शचा ऑलराऊंड कामगिरीमुळे दिल्लीने त्याला टीममध्ये घेण्याची जोखीम उचलली. ही जोखीम दिल्ली टीमचं टेन्शन वाढवणार आहे.मार्श फिट होण्यास किती वेळ लागणार हे अद्याप स्पष्ट नाही. मार्श ज्यापद्धतीनं दुखापतग्रस्त झालाय (Mitchell Marsh hip injury) त्याचा विचार केल्यास त्याला फिट होण्यासाठी कमीत कमी 2 ते 3 आठवडे लागू शकतील. त्यामुळे मिचेल मार्श आयपीएलमधील अर्ध्याहून अधिक मॅचमधून आऊट होण्याची शक्यता आहे. मार्शच्या दुखापतीचं स्वरूप समजल्यानंतर त्याची रिप्लेसमेंट शोधण्याचं आव्हान कॅप्टन पंत आणि कोच पॉन्टिंगपुढे असणार आहे.

मार्श आणि आयपीएल दरम्यान दुखापत याचं नातं फार जुनं आहे. 2017 आयपीएल सीझनमध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून खेळणाऱ्या मार्शला कंबरेच्या दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली होती. त्यानंतरच्या चार वर्षांमध्ये मार्शच्या खांद्यावर आणि घोट्यावर शस्त्रक्रियादेखील करण्यात आली होती. 2020 आयपीएल सीझनच्या हैदराबादच्या पहिल्याच मॅचमध्ये जायबंदी झाल्यानं मार्श संपूर्ण स्पर्धेतून आऊट झाला होता.

बेस्ट फॉर्मातील मार्श

वेस्ट इंडिज विरुद्ध मागील वर्षी T20 सीरिजमध्ये मार्शला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियाचा टीम मॅनेजमेंटनं घेतला. त्याने या सीरिजमध्ये तो निर्णय योग्य असल्याचं सिद्ध केलं. ऑस्ट्रेलियाचा सीरिजमध्ये 1-4 असा पराभव झाला, पण मार्शनं त्याचं नाणं खणखणीत सिद्ध केलं.

मार्शने ऑस्ट्रेलियाला गेल्या 14 वर्षांपासून हुलकावणी देणारं T20 वर्ल्ड कप विजेतेपद मिळवून दिले. T20 वर्ल्ड कप फायनलमध्ये ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार देखील पटकवला. 2021 या कॅलेंडर वर्षात T20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत मार्श चौथ्या क्रमांकावर होता. यंदाच्या बिग बॅश स्पर्धेत मार्शने (Mitchell Marsh hip injury) 85 च्या सरासरीनं 255 रन केले आहेत.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: