सौजन्य- ट्विटर

टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि चेन्नई सुपर किंग्सला चार वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवून देणारा महेंद्रसिंग धोनीची (MS Dhoni) 7 नंबर जर्सी जगप्रसिद्ध आहे. टीम इंडियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना किंवा सीएसकेकडून (Chennai Super Kings) आयपीएलमध्ये धोनी नेहमी 7 नंबरच्या जर्सीमध्ये दिसला आहे. धोनीनं स्वत: तो ही जर्सी का घालतो? यांचं कारण सांगितलं (Dhoni number 7 jersey reason) आहे.

सीएसकेच्या एका कार्यक्रमात धोनी म्हणाला की, ‘काही जणांची सुरूवातीला 7 हा माझ्यासाठी शूभ अंक (Lucky Number)आहे म्हणून मी तो नंबर निवडला आहे धारणा होती. मी हा नंबर निवडण्याचं सगळ्यात सोपं कारण आहे. माझा वाढदिवस सातव्या महिन्याच्या सात तारखेला येत असल्यानेच मी 7 नंबरची जर्सी (Dhoni number 7 jersey reason) निवडाली. स्मृती मानधनाने 18 जर्सी नंबर तिच्या वाढदिवसाच्या तारखेवरून ठेवला(ठरवला) आहे.

इतर टीमप्रमाणेच चेन्नईनंही सरावाला सुरूवात केली आहे. आयपीएलच्या पंधराव्या सिझनची पहिली मॅच चेन्नई सुपर किंग्स विरूद्ध कोलकत्ता नाईट रायडर्स (Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders) विरुद्ध होणार आहे. ही मॅच 26 मार्च रोजी रात्री साडेसात वाजता मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.

चेन्नई सुपर किंग्स टीममध्ये झाले आहेत बदल

यावर्षी सीएसकेच्या टीममध्ये अनेक बदल झाले आहेत. गेल्यावर्षी विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलणारा फाफ ड्यू प्लेसिस यंदा पहिल्यांदाच चेन्नईच्या यलो जर्सीत दिसणार नाही. त्याच्याऐवजी कॉनवे किंवा उथप्पा ओपनिंगला येऊ शकतात. वेस्ट इंडिज विरूध्द टी20 सिरीज मध्ये जायबंदी झाल्यानं दीपक चहर आयपीएलच्या सुरुवातीच्या मॅचेस खेळणार नाही.

CSK Squad Analysis: कशी आहे IPL 2022 ची चेन्नई सुपर किंग्स? कुठे सरस, कुठे फेल?

चेन्नई सुपर किंग्सची टीम : महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन), रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, ड्वेन ब्राव्हो, अंबाती रायुडू, रॉबिन उथप्पा, दीपक चहर, केएम असिफ, तुषार देशपांडे, शिवम दुबे, महेश तीक्षणा, डेव्हान कॉनवे, अ‍ॅडम मिल्ने, नारायण जगदीशन, सी. हरी निशांत, मिचेल सँटनर, ड्वेन प्रिस्टोरियस, ख्रिस जॉर्डन, शुभ्रांशू सेनापती, राजवर्धन हंगरगेकर, समरजीत सिंह, मुकेश चौधरी, के. भगत वर्मा आणि प्रशांत सोळंकी

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: