सौजन्य- ट्विटर

गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) आयपीएल 2022 च्या पहिल्या मॅचमध्ये ऑल राऊंडर मोईन अलीच्या (Moeen Ali) अनुपस्थितीत मैदानात उतरावे लागणार आहे 26 मार्चला आयपीएलचा पंधरावा सिझन सुरू होत आहे. पण, मोईन अद्याप भारतामध्ये आलेला नाही. मोईननं मागच्या महिन्यातच व्हिसासाठी अर्ज केला आहे. त्यानंतरही त्याचा अर्ज अद्याप मंजूर झालेला नाही. त्यामुळे मोईन पहिली मॅच खेळू शकणार नाही, हे आता स्पष्ट झालंय. सीएसके सीईओ काशी विश्वनाथ यांनीही या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला आहे. मोईनला व्हिसा मिळण्यात उशीर होण्याचे कारण त्याचे पाकिस्तानी कनेक्शन (Moeen Ali Pakistan Connection) आहे.

मोईनने (Moeen Ali) आयपीएलमध्ये आत्तापर्यंत रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू (Royal Challengers Bangalore) आणि चेन्नई सुपर किंग्स( CSK) टीमचं प्रतिनिधित्व केलं आहे. मोईन मागच्या सिझनमध्ये पहिल्यांदाच सीएसकेकडून खेळला. त्या सिझनमधील 15 मॅचमध्ये त्याने 260 रन केले आणि 6 विकेट्स घेतल्या. T20 क्रिकेटमधील त्याची क्षमता लक्षात घेऊन यंदाच्या मेगा ऑक्शनपूर्वी सीएसकेने त्याला रिटेन केले आहे.

सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथ यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, ‘मोईन पहिली मॅच खेळू शकणार नाही. सीएसके संघ टीम मॅनेजेंट आणि बीसीसीआय मोईन लवकरात लवकर आयपीएल स्पर्धेसाठी भारतात यावा यासाठी प्रयत्न करत आहे. आणखी एक-दोन दिवसात या समस्येवर तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे. पाकिस्तानी वंशाच्या नागरिकांसाठी विशिष्ठ नियमांचं पूर्तता करणे गरजेचे असते. मोईनचा व्हिसा मान्य होण्यास होत असलेल्या विलंबाचं हेच कारण (Moeen Ali Pakistan Connection) आहे.

काय आहे पाकिस्तान कनेक्शन?

मोईन अलीचा जन्म इंग्लंडमध्ये झाला आहे, पण त्याच्या कुटुंबीयांचे पाकिस्तान कनेक्शन आहे. त्याचे आजोबा पाकव्याप्त काश्मीरमधून नोकरी-धंद्याच्या निमित्ताने इंग्लंडमध्ये स्थायिक झाले. मोईन अली आयपीएल तसेच अन्य क्रिकेट सीरिजच्या निमित्ताने भारतात येत असतो. येणे होत असते. आता त्याला आयपीएलच्या बायो-बबलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी तीन दिवस क्वारंटाईन राहणे आवश्यक आहे. त्यामुळे कितीही लवकर व्हिसा मिळाला तरी तो केकेआर विरूद्ध होणारी पहिली मॅच खेळू शकणार नाही.

चेन्नईला बसणार फटका

मोईन अली हा T20 क्रिकेटमधील उपयुक्त खेळाडू आहे. मागील सिझनपासून सुरेश रैनानं कित्येक वर्ष सांभाळलेला बॅटींगमधील तिसरा क्रमांक सीएसकेनं त्याला दिला. मोईननं त्या नंबरवर त्याची उपयुक्तता सिद्ध केली आहे. तिसऱ्या नंबरवर येऊन त्याने चांगली फटकेबाजी केली. त्याचा चेन्नईला फायदा झाला. तसंच त्याची ऑफ स्पिन बॉलिंगही सीएसकेला मुंबईच्या पिचवर महत्त्वाची आहे.

दीपक चहर जखमी, तुळजापूरच्या मुलासह 3 जणांना मिळू शकते धोनीच्या टीममध्ये मोठी संधी

दीपक चहर (Deepak Chahar) दुखापतीमुळे आयपीएलचा पूर्वार्ध खेळणार नाही. त्यातच मोईन अलीही आणखी भारतामध्ये दाखल झालेला नसल्यानं (Moeen Ali Pakistan Connection) महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) डोकेदुखी वाढली आहे. आता त्याला पहिल्या पसंतीच्या खेळाडूंशिवाय मैदानात उतरावं लागणार आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज व्हॉट्सअप करा.

error: