फोटो – सोशल मीडिया

आयपीएल 2022 मध्ये चेन्नई सुपर किंग्स टीमला नवा कॅप्टन मिळाला आहे. पहिल्या सीझनपासून कॅप्टन असलेल्या महेंद्रसिंग धोनीने कॅप्टनसीचा राजीनामा दिला आहे. या सिझनमध्ये धोनी फक्त खेळाडू म्हणून खेळताना दिसेल. आयपीएल इतिहासातच नाही तर क्रिकेट विश्वात धोनीची यशस्वी कॅप्टन म्हणून ओळखला जातो. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने सहा वेळा विजेतेपद (4 आयपीएल + 2 चॅम्पियन लीग) पटकावले आहे. आगामी सिझनमध्ये चेन्नईची टीम रवींद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) कॅप्टनसीमध्ये उतरणार आहे. या सिझनमध्ये जडेजा सीएसकेचा कॅप्टन असला तरी सर्वांचं लक्ष प्रामुख्यानं धोनीवरच असेल. करण, एक कॅप्टन म्हणून त्यानं असंख्य आठवणी (Dhoni Captaincy Memories) क्रिकेट फॅन्सना दिल्या आहेत.

IPL ची सुरूवात

2008 ते 2021 यादरम्यान झालेल्या बारा सिझनमध्ये धोनीनं सीएसकेचे नेतृत्व केले आहे. 2016 आणि 2017 ही दोन वर्ष चेन्नईची टीम आयपीएलमधून निलंबित होती. त्या कालावधीमध्ये धोनी रायझिंग पुणे सुपर जायंट्सकडून खेळला होता.

2008 साली झालेल्या आयपीएलच्या पहिल्या सिझनमध्ये चेन्नईला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. शेन वॉर्नच्या राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) चेन्नईला 3 विकेट्सने हरवले होते. त्यानंतर पुढच्या वर्षी 2009 साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या आयपीएलमध्ये चेन्नईला सेमी फायनलपर्यंत मजल मारता आली.

सलग दोन विजेतेपद

विजेतेपदापासून दोन वर्ष हुलकावणी दिलेल्या चेन्नईला 2010 च्या आयपीएल सिझनमध्ये (IPL 2010) पहिल्यांदा ट्रॉफी उंचावण्यात यश आले. त्या पर्वाचा फायनलला सीएसकेने मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) 22 रन्सनी पराभव केला. चेन्नई विरुद्ध मुंबई (CSK vs MI) या मॅचची क्रेझ 2010 मधील फायनल पासून खऱ्या अर्थाने सुरुवात (Dhoni Captaincy Memories) झाली.

2011 हे वर्ष धोनीसाठी स्पेशल ठरलं. 2 एप्रिलला वानखेडेच्या मैदानावर टीम इंडियानं वर्ल्ड कप विजेतेपदाचा 28 वर्षांचा दुष्काळ संपवला होता. त्यानंतर दीड महिन्यांत 2011 आयपीएल फायनलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) पराभव करत जेतेपद राखण्यात यश मिळवले.

धोनीनं कॅप्टनसी का सोडली? वाचा CSK कॅम्पमधील Inside Story

सर्वाधिक विजय

आयपीएल म्हणजे सात टीम एकमेकांविरूद्ध चेन्नई विरूद्ध फायनल खेळण्यासाठी लढतात. हा आयपीएल स्पर्धेशी संबंधित एक जोक चांगलाच व्हायरल आहे. आयपीएल इतिहासात सर्वाधिक वेळा फायनलमध्ये प्रवेश करण्याचा रेकॉर्ड सीएसकेच्या नावावर आहे. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात कॅप्टन म्हणून सर्वाधिक विजय मिळवण्याचा रेकॉर्ड धोनीच्या नावावर आहे. धोनीने आयपीएलमध्ये 204 मॅचमध्ये कॅप्टनसी करताना 121 विजय मिळवले आहेत.

धोनीसारखा धोनीच!

वर्षकामगिरी
2008रनर अप
2009सेमी फायनल
2010चॅम्पियन
2011चॅम्पियन
2012रनर अप
2013रनर अप
2014प्ले ऑफ
2015रनर अप
2018चॅम्पियन
2019रनर अप
2020सातवा क्रमांक
2021चॅम्पियन

वनवास ते विजेतेपद

दोन वर्ष आयपीएलपासून दूर राहिल्यानंतर धोनी ब्रिगेडने झोकात पुनरागमन केले. पहिल्याच सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी मुंबईला हरवत जेतेपदाचा दावेदार आहोत असा सूचक इशारा दिला. पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर राहिलेल्या चेन्नईने हैदराबादचा पराभव करत तिसऱ्यांदा जेतेपद मिळवत ‘डॅड आर्मी’ असं ओरडणाऱ्या टीकाकारांची तोंडं बंद (Dhoni Captaincy Memories) केली.

2019, 20 पर्वात हुलकावणी दिल्यानंतर 2021 मध्ये कोलकत्ता नाईट रायडर्सचा पराभव करत चौथ्यांदा विजेतेपद पटकावले. गेल्या दोन तीन पर्वात धोनीची बॅटींग लौकिकाला साजेशी होत नव्हती. विकेटकिपिंग आणि कॅप्टनसीच्या जोरावर सीएसके व्यवस्थापनाने त्याला रिटेन केले होते. या कालखंडात धोनी खेळाडू कमी आणि मार्गदर्शकाच्या भूमिकेत जास्त दिसला.

गुणी खेळाडूंना सपोर्ट

बारा पर्वात धोनीने अनेकांच्या करियरला आकार दिला. त्यांच्यातील कौशल्य वाढवण्यासाठी मार्गदर्शन केले. एखादा खेळाडू आउट ऑफ फॉर्म असेल तर त्याला सपोर्टही केला. रवींद्र जडेजा, आर. अश्विन, ड्वेन ब्रावो, सुरेश रैना मोईन अली, शार्दुल ठाकूर या प्लेयर्सचा प्रभावीपणे वापर करण्याचं श्रेय धोनीला (Dhoni Captaincy Memories) जातं.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: