फोटो – ट्विटर

आयपीएल 2022 चा सिझन (IPL 2022) आज (26 मार्चपासून) सुरू होणार आहे. चेन्नई सुपर किंग्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders) या मॅचनं स्पर्धेला सुरूवात होत आहे. चेन्नईचा मुख्य फास्ट बॉलर दीपक चहर (Deepak Chahar) या मॅचमध्ये खेळणार नाही. दीपक चहर (Deepak Chahar) जखमी असून सुरूवातीच्या काळात आजच्या आगामी सिझनमध्ये खेळणार नाही. चहरची दुखापत हा सीएसकेला मोठा धक्का आहे. केकेआर विरूद्धच्या मॅचमध्ये चहरच्या जागी (Deepak Chahar replacement) संधी देण्यासाठी 3 पर्याय सीएसकेचा नवा कॅप्टन रवींद्र जडेजाकडे आहेत.  

राजवर्धन हंगरगेकर

मराठवाडा एक्स्प्रेस म्हणून प्रसिद्ध असलेला तुळजापूरचा राजवर्धन हंगरगेकर (Rajvardhan Hangargekar) हा चहरच्या जागी खेळण्यासाठी मोठा दावेदार आहे. राजवर्धन हा अंडर 19 वर्ल्ड कप विजेत्या टीममधील प्रमुख बॉलर आहे. संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये त्याने पॉवर प्लेमध्ये बॉलिंग केली होती.

राजवर्धनला स्पर्धेत फार विकेट्स मिळाल्या नाहीत. पण, त्याचा इकोनॉमी रेट हा 4 पेक्षा कमी होता. तसेच त्याने त्याचा वेग, स्वींग आणि अचूकतेनं सर्वांना प्रभावित केले आहे. राजवर्धनकडं 140 किमी प्रती तास वेगानं बॉलिंग करण्याची क्षमता आहे. त्याचबरोबर तो उत्तम बॅटींग करू शकतो. अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये त्याने 185.71 च्या स्ट्राईक रेटनं बॅटींग करत हाणामारीचे कौशल्य दाखवून दिलंय. सीएसकेला लोअर ऑर्डरमध्ये राजवर्धनंच हे कौशल्य उपयुक्त आहे. त्यामुळे तो चहरच्या जागेवर खेळण्याचा प्रबळ दावेदार (Deepak Chahar replacement) आहे.

सिमरजीत सिंग

दिल्लीचा सिमरजीत सिंग (Simrajeet Singh) हा टीम इंडिया मागील वर्षी श्रीलंकेत गेली होती, त्यावेळी नेट बॉलर होता. टीममध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर शेवटच्या टप्प्यात त्याचा टीममध्ये समावेश करण्यात आला होता. त्याचबरोबर मागील आयपीएल सिझनमध्ये (IPL 2021) अर्जुन तेंडुलकर अनफिट झाल्यानंतर त्याच्या जागी मुंबई इंडियन्सनं सिमरजीतची निवड केली होती.

गेल्या वर्षभरापासून टीम इंडिया आणि प्रमुख आयपीएल टीमच्या रडावर असलेल्या सिमरजीतला यंदा प्लेईंग 11 मध्ये संधी मिळू शकते. वानखेडे स्टेडियमवरील परिस्थितीचा त्याला फायदा मिळू शकतो. सिमरजीतकडे उत्तम यॉर्कर असून डेथ ओव्हर बॉलर म्हणून धोनी त्याचा आगामी आयपीएलमध्ये वापर (Deepak Chahar replacement) करू शकतो.

U19 World Cup: कोरोनामुळे वडील गेले, पण जिद्द नाही… तुळजापूरच्या पोरगा जगात भारी

मुकेश चौधरी

महाराष्ट्राकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणारा मुकेश चौधरीचा (Mukesh Choudhary) हा पहिलाच आयपीएल सिझन आहे. पण, तो सीएसके टीमसाठी नवा नाही. तो यापूर्वी सीएसकेचा नेट बॉलर होता. चेन्नईच्या टीममधील तो एकमेव डावखुरा फास्ट बॉलर आहे. डावखुऱ्या फास्ट बॉलरची असलेली उपयुक्तता लक्षात घेता आजवर कुणी फारसा न पाहिलेल्या मुकेश चौधरीला खेळवण्याचा प्रयोग सीएसके करू शकते. सीएसकेच्या काही मॅच पुण्यात होणार आहेत. पुणे हे मुकेशचे होम ग्राऊंड आहे. त्याचाही सीएसकेला फायदा होऊ शकतो. मुकेशचे स्विंग बॉलिंग हे मुख्य अस्त्र आहे. तो पॉवर प्लेमध्ये दीपक चहरप्रमाणे 3 ओव्हर बॉलिंग (Deepak Chahar replacement) करण्यासाठी उत्तम पर्याय आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: