फोटो – ट्विटर, सीएसके फॅन ऑफिशियल

महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) त्याच्या स्वभावानुसार शांतपणे आणखी निर्णय घेतला आहे. त्याने यापूर्वी टीम इंडियाची कॅप्टनसी सोडण्याचा किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीचा निर्णयही असाच कुणालाही कल्पना नसलेल्या दिवशी शांतपणे जाहीर केला होता. आता चेन्नई सुपर किंग्सच्या कॅप्टनपदाचा राजीनामा दिला आहे. धोनीच्या आयपीएलमधील निवृत्तीची सध्या चर्चा होत आहे. पण, तो निवृत्त होण्यापूर्वी कॅप्टनसी सोडेल, असं फार जणांना वाटलं नव्हतं. धोनीनं हा निर्णय का घेतला? याची इनसाईड स्टोरी (CSK Camp Inside Story) उघड झाली आहे.

काय म्हणाला धोनी?

महेंद्रसिंह धोनी आयपीएल सिझनपूर्वीच कॅप्टनसी सोडेल याची कल्पना चेन्नई सुपर किंग्सच्या (Chennai Super Kings) मॅनेजमेंटलाही नव्हती. सीएकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी याबाबतची माहिती दिली आहे. धोनीच्या राजीनाम्याबाबत बोलताना विश्वनाथन म्हणाले की,

‘महेंद्रसिंह धोनीनं याबाबत विचार केला होता. धोनीनं विचार केला असेल तर तो सर्वोत्तम आणि टीमच्या हिताचाच असतो यात शंका नाही. त्यामुळे आम्हाला काळजीचं काही कारण नाही. रवींद्र जडेजा सध्या त्याच्या कारकिर्दीमधील सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. त्याला कॅप्टनपदाची जबाबदारी देण्याची हीच वेळ असल्याचं (CSK Camp Inside Story)  धोनीला वाटलं.’

IPL 2022: धोनीनं CSK ची कॅप्टनसी सोडली, जडेजा बनला चेन्नईचा किंग!

आधीच ठरलं होतं!

रविंद्र जडेजा धोनीचा उत्तराधिकारी होणार हे यापूर्वीच ठरले होते. याबाबत त्याच्याशी मागच्या वर्षीच चर्चा झाली होती, असेही विश्वनाथन यांनी सांगितलं. ‘त्याच्याशी (जडेजा) याबाबतचे बोलणे झाले होते. मागच्या वर्षीच हा प्रस्ताव होता. धोनीचा उत्तराधिकारी म्हणून तो सर्वोत्तम पर्याय असल्याचं आम्हाला माहिती होते. धोनी योग्य वेळेची वाट पाहात होता. टीम इंडियामध्येही त्यानं विराटला कॅप्टन म्हणून आधी तयार केले होते. त्याचपद्धतीनं इथंही शांतपणे कॅप्टनसीचं हस्तांतरण व्हावं अशी धोनीची इच्छा होती.

रवींद्र जडेजामध्ये चेन्नईचा कॅप्टन म्हणून चांगली कामगिरी करण्याची क्षमता आहे. तो एक ऑल राऊंडर आहे. जडेजा नेहमीच टीमला सोबत घेऊन पुढची वाटचाल करतो. जडेजा सध्या सर्वोत्तम फॉर्मात आहे. त्याचबरोबर धोनी देखील त्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध आहेच, यावर्षी जडेजाचे कॅप्टन म्हणून चांगले प्रशिक्षण होईल’, असे विश्वनाथन यांनी स्पष्ट (CSK Camp Inside Story) केले.

धोनी पुढच्या वर्षी खेळणार?

महेंद्रसिंह धोनीनं मागच्या वर्षी चेन्नईत झालेल्या कार्यक्रमात आणखी एक सिझन आयपीएल नक्की खेळणार असल्याची घोषणा केली होती. एक बॅटर म्हणून त्याचा प्रभाव आता कमी झालेला आहे. स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर असल्याचा परिणाम त्याच्या बॅटींगवर जाणवतोय. त्याचा स्ट्राईक रेटही आता कमी झालाय.

धोनीनं कॅप्टनसी सोडणे हे आयपीएलमधून निवृत्त होण्यासाठी उचलेलं एक मोठं पाऊल आहे. धोनीचं हे शेवटचं आयपीएल (CSK Camp Inside Story) असेल. तो आयपीएल संपल्यानंतर लगेच नाही, पण त्यानंतर कधी तरी अचानक त्याच्या स्वभावानुसार आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा करेल असं मानलं जात आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: