
संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलेला आयपीएल स्पर्धेचा 15 वा सिझन (IPL 2022) सुरू झाला आहे. या स्पर्धेत पहिली हाफ सेंच्युरी आणि पहिल्या मॅचमध्ये (Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders) सर्वात जास्त रन महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) केले आहेत. आयपीएल स्पर्धेचा निकाल काहीही लागला तरी हा रेकॉर्ड कायम राहणार आहे. फक्त महेंद्र सिंह धोनीच नाही तर आणखी 2 सिनिअर खेळाडूंनी पहिल्या मॅचमध्ये दमदार खेळ (CSK vs KKR, Old is Gold) करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
35 महिन्यांचा दुष्काळ संपला
महेंद्रसिंह धोनीनं काही दिवसांपूर्वी सीएसकेची कॅप्टनसी अचानक सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तो संपूर्ण आयपीएल स्पर्धेत खेळणार का? हा प्रश्न विचारला जात होता.धोनीनं पहिल्याच मॅचमध्ये हाफ सेंच्युरी झळकावत त्याच्या फॅन्सना खूश केलं आहे. धोनीनं तब्बल 35 महिन्यांनी आयपीएल स्पर्धेत हाफ सेंच्युरी झळकावली आहे.
धोनीनं यापूर्वी आयपीएल 2019 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) हाफ सेंच्युरी झळकावली होती. त्या मॅचमध्ये धोनीचा आयपीएल स्पर्धेतील सर्वोच्च वैयक्तिक स्कोअरही केला. सीएसकेची अवस्था 5 आऊट 61 अशी नाजूक होती, तेव्हा धोनी बॅटींगला आला. त्याने सुरूवातीला सेट होण्यासाठी वेळ घेतला.
धोनीनं पहिले 15 रन 25 बॉलमध्ये काढले. त्यानंतर पुढच्या 13 बॉलमध्ये त्यानं 35 रन बदडले. 40 व्या वर्षीही सेट झाल्यानंतर 200 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटनं धुलाई करण्याची क्षमता असल्याचं धोनीनं दाखवून दिलं. धोनीनं आयपीएल स्पर्धेतील 24 वी हाफ सेंच्युरी झळकावली. यापैकी 20 वेळा तो नॉट आऊट आहे. आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक वेळा नॉट आऊट हाफ सेंच्युरी लगावण्याचा भारतीय रेकॉर्ड आता धोनीच्या नावावर (CSK vs KKR, Old is Gold) आहे. त्याने शिखर धवनला (19) मागं टाकलं आहे.
धोनीनं कॅप्टनसी का सोडली? वाचा CSK कॅम्पमधील Inside Story
सचिननं केली प्रशंसा
कोलकाता नाईट रायडर्सचा अनुभवी विकेट किपर शेल्डन जॅक्सन (Sheldon Jackson) गेल्या काही दिवसांमध्ये वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत होता. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यानं चांगली कामगिरी करणाऱ्या या 35 वर्षांच्या अनुभवी विकेट किपरला केकेआरनं पहिल्या मॅचमध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला.
जॅक्सननं केकेआरला निराश केलं नाही. त्यानं केकेआरसाठी धोकादायक ठरत असलेल्या रॉबिन उथप्पाला स्टम्पिंग करत परत पाठवलं. उथप्पाला आऊट करताना त्यानं दाखवलेल्या चपळाईचं कौतुक साक्षात सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) कौतुक केलं आहे. वरूण चक्रवर्ती आणि सुनील नरीन या केकेआरच्या स्पिनर्सच्या बॉलिंगवरही जॅक्सननं निर्दोष विकेट किपिंग करत या स्पर्धेतील केकेआरचा नंबर 1 विकेट किपर असल्याचं दाखवून दिलं (CSK vs KKR, Old is Gold) आहे.
मलिंगाची बरोबरी
केकेआर विरूद्धच्या मॅचमध्ये सीएसकेला विकेट्सची गरज होती. त्यावेळी कॅप्टन जडेजानं ड्वेन ब्राव्होला (Dwayne Bravo) नेहमीपेक्षा लवकर बॉलिंगला आणले. ब्राव्होनं दुसऱ्याच बॉलवर आक्रमक व्यंकटेश अय्यरला आऊट करत जडेजाचा विश्वास सार्थ ठरवला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला ब्राव्हो आयपीएल ऑक्शनमध्ये अनसोल्ड ठरेल असा अनेकांचा अंदाज होता.
सीएसकेनं ब्राव्होवर विश्वास दाखवत त्याला पुन्हा एकदा खरेदी केले. ब्राव्होनं 4 ओव्हर्समध्ये 20 रनच्या मोबदल्यात 3 विकेट्स घेत पहिल्या मॅचमधील सर्वोत्तम बॉलिंग केली. यावेळी ब्राव्होनं आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या लसिथ मलिंगाच्या (Lasith Malinga) रेकॉर्डचीही बरोबरी केली आहे. सीएसकेच्या पराभवातही ब्राव्होची अचूक बॉलिंग टीमला दिलासा देणारी (CSK vs KKR, Old is Gold) आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.