फोटो – ट्विटर, चेन्नई सुपर किंग्स

चेन्नई सुपर किंग्सची (Chennai Super Kings) आयपीएल 2022 मधील (IPL 2022) सुरूवात खराब झाली आहे. चार वेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या टीमनं पहिल्या दोन मॅच गमावल्या आहेत. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरूद्ध पहिली मॅच गमावल्यानंतर नवोदीत लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) विरूद्धही चेन्नईचा पराभव झाला. लखनौ विरूद्ध तर चेन्नईच्या बॉलर्सना 210 रन देखील वाचवता आले नाहीत. सीएसकेचा (CSK) ऑल राऊंडर शिवम दुबे (Shivam Dube) याने टाकलेली 19 वी ओव्हर प्रचंड महाग ठरली. दुबेनं त्या ओव्हरमध्ये 25 रन दिले. सीएसकेच्या पराभवानंतर दुबेच्या बॉलिंवर टीका होत आहे. त्याचवेळी सीएसकेचा हेड कोच स्टीफन फ्लेमिंगने टीमच्या पराभवाला शिवम दुबे नाही तर मुंबईतील परिस्थिती जबाबदार असल्याचा (Fleming on pitch condition) दावा केला आहे.

का केला दावा?

यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील लीग मॅच मुंबई, नवी मुंबई आणि पुणे या तीन शहरांमध्ये होत आहेत. स्पर्धेच्या पहिल्या आठवड्यात ड्यू फॅक्टर (Dew Factor) महत्त्वाचा ठरत आहे. सुरूवातीच्या सातपैकी सहा मॅच या दुसऱ्यांदा बॅटींग करणाऱ्या टीमनं जिंकल्या आहेत. चेन्नई विरूद्ध लखनौ (CSK vs LSG) यांच्यात मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडिअमवर झालेली मॅच देखील याला अपवाद नव्हती. ब्रेबॉर्नमधील ड्यू फॅक्टर चेन्नईच्या पराभवासाठी निर्णायक ठरले असा दावा फ्लेमिंग यांनी केला आहे. लखनौमधील मॅचमध्ये पडलेल्या दवबिंदूची तुलना फ्लेमिंगनं थेट जगातील सर्वात मोठ्या नायगरा धबधब्याशी केली आहे.

मॅच संपल्यानंतर पत्रकारांशी ऑनलाईन संवाद साधताना फ्लेमिंग म्हणाला, ‘मैदानातील परिस्थितीचा तुम्ही लक्षपूर्वक अभ्यास केल्यास स्पिन बॉलिंगचा पर्याय वापरणं व्यवहार्य नव्हतं कारण मैदानातील ओलाव्याचे प्रमाण नायगरा धबधब्यासारखं होतं. लखनौ सुपरजायंट्सनं चांगली बॅटिंग करून टार्गेट चेस केले. दव अधिक असल्यामुळे स्पिन बॉलर्सना बॉल ग्रीप करण्यात अडचण येत होती. त्यामुळे चांगली कामगिरी करून दाखवणं त्यांच्यासाठी आव्हानात्मक (Fleming on pitch condition) होते. त्यांच्या बॉलिंगचा पूर्ण कोटा देखील वापरता आला नाही.’

IPL 2022 : चेन्नई सुपर किंग्सच्या पराभवाची 5 कारणं

दुबेला पाठिंबा

लखनौला शेवटच्या दोन ओव्हर्समध्ये 34 रनची आवश्यकता होती. सीएसकेचा कॅप्टन रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) 19 वी ओव्हर दुबेला दिली. दुबेच्या त्या ओव्हरमध्ये 25 रन गेले. त्यामुळे शेवटच्या ओव्हरला फक्त 9 रनची गरज होती. लखनौनं 3 बॉल्स राखून ते टार्गेट पूर्ण केले. आक्रमक हाफ सेंच्युरीच्या जोरावर लखनौला मॅच जिंकून देणाऱ्या एव्हिन लुईसला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्कारानं गौरवण्यात आलं.

फ्लेमिंगने यावेळी बोलताना शिवम दुबेची पाठराखण केली. ‘आम्हाला ती एक ओव्हर पूर्ण करण्याचे आव्हान असणार आहे हे ठाऊक होते. शेवटच्या दोन तीन ओव्हर्समध्ये रन शिल्लक असताना आम्ही ती ओव्हर सातव्या बॉलरकडून टाकून देऊ असं आमचे नियोजन होते. जडेजाने 2 ओव्हरमध्ये 21 रन दिल्या होत्या. मोईनने 1 ओव्हरमध्ये 14 रन दिल्या होत्या. दोघांनाही10 पेक्षा जास्त इकॉनॉमी रेटनेने मारल्याने आम्हाला दूबेला बॉलिंग देणं भाग होतं.’ असं त्यांनी सांगितलं. मुकेश चौधरी आणि तुषार देशपांडे या नवोदीत बॉलर्सची देखील फ्लेमिंगने (Fleming on pitch condition) प्रशंसा केली.

लखनौची दमदार बॅटिंग

सीएसकेने लखनौला 211 रनचं टार्गेट दिले होते. केएल राहुल (40) (KL Rahul) आणि क्विंटन डी कॉक(61) यांनी पहिल्या विकेट्ससाठी 99 रनची पार्टनरशिप केली. त्यानंतर सीएसकेच्या बॉलर्सनी काही विकेट्स घेत मॅचमध्ये पुनरागमन केलं होतं. पण लुईस आणि नवोदीत आयुष बदोनी (Ayush Badoni) यांनी 19 बॉलमध्ये 40 रनची पार्टनरशिप करत लखनौच्या पहिल्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading