फोटो – बीसीसीआय, आयपीएल

आयपीएल 2022 मध्ये कोरोना व्हायरस (Covid19) घुसखोरी झाली आहे. कोरोना व्हायरसच्या अडथळ्यामुळे दोन सिझन यूएईमध्ये खेळवण्यात आले होते. यंदा देखील या स्पर्धेच्या 70 मॅच मुंबई-नवी मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये होत आहेत. त्याचवेळी कोरोना व्हायरसच्या ताज्या प्रकरणामुळे बीसीसीआयची चिंता वाढली आहे. दिल्ली कॅपिटल्सचे (Delhi Capitals) फिजियो पॅट्रीक फारहार्ट (Patrick Farhart Corona Positive) यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना क्वारंटाईन करण्यात आले असून दिल्लीची मेडिकल टीम त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहे.

गेल्या आयपीएल सिझनची (IPL 2021) सुरूवात भारतामध्ये झाली होती. त्यावेळी देखील बायो-बबलमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्यानं ही स्पर्धा थांबवावी लागली होती. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात या स्पर्धेचा उर्वरित टप्पा यूएईमध्ये पार पडला होता. आता देशातील परिस्थिती नियंत्रणात आलेली असतानाच आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानं सर्वांच्या काळजीत भर पडली आहे.

दिल्ली कॅपिटल्समधील कोणत्या खेळाडूला कोरोनाची लागण (Patrick Farhart Corona Positive) झाली आहे का? हे अद्याप समजलेलं नाही. मात्र दिल्लीचे खेळाडू प्रॅक्टीस सेशनमध्ये सहभागी होत असल्याने ही शक्यता कमी आहे. दिल्ली कॅपिटल्सची पुढील मॅच शनिवारी (16 एप्रिल 2022) रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरू (DC vs RCB) विरूद्ध मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर होणार आहे. मात्र या प्रकरणात दिल्लीच्याी फ्रँचायझीकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

IPL 2022: कोहिनूर कधी परत देणार? गावसकरांनी ब्रिटीश कॉमेंटेटरला विचारला प्रश्न, VIDEO

दिल्ली कॅपिटल्सची शेवटची मॅच कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरूद्ध झाली होती. त्यामध्ये त्यांनी 44 रननी मोठा विजय मिळवला होता. दिल्लीनं या सिझनमध्ये आत्तापर्यंत 4 मॅच खेळल्या असून यामध्ये 2 विजय आणि 2 पराभवासह टीम पॉईंट टेबलमध्ये सध्या सातव्या क्रमांकावर आहे.

स्पर्धेचे भवितव्य काय?

आयपीएल 2022 स्पर्धेची फायनल मॅच 29 मे रोजी अहमदाबादमध्ये होणार आहे. अद्याप या सिझनच्या 50 मॅच बाकी आहेत. त्यातच पुन्हा एकदा बायो-बबलमध्ये कोरोनाची घुसखोरी झाल्यानं बीसीसीआयच्या काळजीत भर पडली आहे. यापूर्वी काही महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियात झालेल्या बिग बॅश लीगमध्ये खेळाडू तसंच सपोर्ट स्टाफना कोरोनाची मोठ्या प्रमाणात लागण झाली होती. त्यानंतरही ही स्पर्धा नियोजित वेळापत्रकाप्रमाणे पार पडली. बीसीसीआय याबाबत काय निर्णय घेणार? हे दिल्ली कॅपिटल्समधील अन्य सदस्यांचे कोरोना रिपोर्ट्स (Patrick Farhart Corona Positive) समोर आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: