फोटो – बीसीसीआय, आयपीएल

2022 सुरू होताच कोरोना व्हायरसची (Coronavirus) तिसरी लाट देशात धडकली आहे. कोरोना पेशंट्समध्ये रोज वाढ होत आहे. त्यामुळे मागच्या दोन सिझनप्रमाणे आयपीएल स्पर्धेच्या आयोजनाची (IPL 2022) चिंता बीसीसीआयला सतावत आहे. मागील दोन पैकी दीड आयपीएल सिझन यूएईमध्ये झाला आहे. यंदा संपूर्ण स्पर्धा भारतामध्ये होणार असल्याची घोषणा बीसीसीआयनं केली आहे. पण कोरोनाच्या धोक्यामुळे आयपीएलच्या 15 व्या सिझनची नव्यानं तयारी बीसीसीआयनं सुरू केली आहे. यामध्ये संपूर्ण स्पर्धा मुंबईमध्ये (IPL 2022 In Mumbai) खेळवण्यासह अनेक महत्त्वांच्या उपयांचा समावेश आहे.  

मुंबईतच का होणार IPL?

‘क्रिकबझ’ नं दिलेल्या रिपोर्टनुसार बीसीसीआयकडे आयपीएल आयोजनाबाबत 2 पर्याय आहेत. पहिला पर्याय 10 टीमच्या होम आणि अवे (Home and Away) मॅचचा आहे. यामध्ये सर्व 10 टीम त्यांच्या होम ग्राऊंडवर आणि इतर ग्राऊंडवर समान मॅच खेळतील.

तर, बीसीसीआयकडे दुसरा पर्याय हा संपूर्ण स्पर्धा मुंबईमध्ये खेळवण्याचा आहे. मुंबईमध्ये तीन सुसज्ज स्टेडियम (वानखेडे, सीसीआय आणि डीवाय पाटील) आहेत. यूएईमध्ये देखील दुबई, अबूधाबी आणि शारजाह या तीन स्टेडियमवर आयपीएल स्पर्धा पार पडली आहे. त्याच धर्तीचा प्रयोग मुंबईमध्ये राबवला (IPL 2022 In Mumbai) जाऊ शकतो.

IPL 2022: मुंबई इंडियन्सची हुशारी, इतर टीमपेक्षा ठरली भारी!

मुंबईमध्ये आयपीएलच्या सर्व टीमना राहता येतील अशी हॉटेल देखील आहेत. तसेच त्यांचा प्रवास हा कमीत कमी होणार असल्याने सर्व खेळाडूंना बायो-बबलमध्ये ठेवणे अधिक सोयीचे आहे. विमान प्रवासातून होणारा व्हायरसचा धोका टाळण्यात यामुळे मदत होऊ शकते. मागच्या वर्षी भारतामधील आयपीएलमध्ये एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये टीम शिफ्ट झाल्यानंतरच कोरोनाने शिरकाव केला होता. सध्या सुरू असलेल्या बिग बॅश लीग (Big Bash League) स्पर्धेला देखील याच कारणामुळे कोरोनाने विळखा घातला आहे.

वेळापत्रकामध्ये बदल?

कोरोना संकटामुळे आयपीएल स्पर्धेच्या वेळापत्रकामध्येही बदल होऊ शकतो. या स्पर्धेतील डबल हेडर (एकाच दिवशी 2 मॅच) संख्या कमी करण्याचा विचार बीसीसीआय करत आहे. सध्याच्या वेळापत्रकानुसार IPL 2022 ची सुरूवात 2 एप्रिल रोजी होणार आहे. पण, ही स्पर्धा एक आठवडा आधी म्हणजेच 25 मार्च रोजी देखील सुरू होऊ शकते. अर्थात याबाबत सध्या प्राथमिक पातळीवरच विचार सुरू (IPL 2022 In Mumbai) आहे.

Mega Auction ची जागा बदलणार?

आयपीएल स्पर्धेच्या मेगा ऑक्शनबाबत (IPL 2022 Mega Auction) देखील अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाही. मेगा ऑक्शन फेब्रुवारीमध्ये होणार आहे. मात्र कोरोनामुळे राज्य सरकारची नियमावली सतत बदलत आहे. त्यामुळे या परिस्थितीमध्ये या लिलावाचे शहर अद्याप निश्चित झालेले नाही. बीसीसीआय याबाबत वेगवेगळे पर्याय तपासून पाहात आहे.

UAE शेवटचा पर्याय

आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे व्यस्त वेळापत्रक लक्षात घेता आयपीएल स्पर्धा यावर्षी नियोजित वेळापत्रकानुसार होणे आवश्यक आहे. देशात आगामी काही महिन्यात परिस्थिती गंभीर झाली तर ही स्पर्धा यूएईमध्ये खेळवणे हा शेवटचा पर्याय बीसीसीआयकडे आहे. यूएईमध्ये यापूर्वी आयपीएल आणि T20 वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन करण्याचा अनुभव बीसीसीआयकडे आहे. पण, अद्याप या पर्यायावर कोणतीही चर्चा झालेली नाही, अशी माहिती (IPL 2022 In Mumbai) आहे.

IPL 2022 Retention: बड्या नावांसह तरुण खेळाडूंनाही संधी

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

    

error: