
आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात डेव्हिड वॉर्नरचं (David Warner) विशेष स्थान आहे. तो आयपीएलमध्ये सर्वात जास्त रन करणारा विदेशी खेळाडू आहे. त्याचबरोबर सनरायझर्स हैदराबादकडून (Sunrisers Hyderabad) सर्वात जास्त रनही वॉर्नरच्या नावावर आहेत. त्यानंतरही हैदराबादनं एका खराब सिझनमुळे त्याला हैदराबादनं अपमानस्पद पद्धतीनं दूर केलं. वॉर्नरनं सनरायझर्स हैदराबाद विरूद्धच्या मॅचमध्ये त्याला दिलेल्या वागणुकीचा वचपा (Warner vs SRH) काढला आहे.
आऊट झालाच नाही
सनरायझर्स हैदराबादच्या विजयात वॉर्नरच्या बॅटींगचा मोठा वाटा होता. 2014 नंतर वॉर्नर पहिल्यांदाच हैदराबादच्या विरूद्ध मैदानात उतरला. सनरायझर्सला आयपीएल चॅम्पियन बनवणाऱ्या वॉर्नरनं या मॅचमध्ये त्याच्या अपमानाचा बदला घेतला.
ओपनिंगला आलेला वॉर्नर शेवटपर्यंत आऊट झालाच नाही. मनदीप सिंह शून्यावर आऊट झाला. मिचेल मार्शही फार टिकला नाही. कॅप्टन ऋषभ पंतही (Rishabh Pant) वेगानं रन काढण्याच्या नादात परतला. पण, हैदराबादच्या बॉलर्सना त्यांच्या माजी कॅप्टनला आऊट करता आलं नाही.
एक अध्याय संपला! डेव्हिड वॉर्नर आणि SRH नं घेतला एकमेकांचा निरोप
वॉर्नरनं 58 बॉलमध्ये नाबाद 92 रनची खेळी (Warner vs SRH) केली. या खेळीत त्यानं 12 फोर आणि 3 सिक्स लगावले. तसंच त्याचा स्ट्राईक रेट 158.62 इतका होता. वॉर्नरच्या या फटकेबाजीमुळेच दिल्लीनं पहिल्यांदा बॅटींग करत सनरायझर्ससमोर विजयासाठी 208 रनचं लक्ष्य ठेवलं.
गेलला टाकलं मागे
डेव्हिड वॉर्नरनं सनरायझर्स विरूद्धच्या मॅचमध्ये T20 कारकिर्दीमधील 89 वी हाफ सेंच्युरी झळकावली. त्यानं यावेळी ख्रिस गेलच्या 88 हाफ सेंच्युरीचा रेकॉर्ड मागे टाकला. विराट कोहली या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असून त्यानं 77 हाफ सेंच्युरी झळकावल्या आहेत. तर सध्या केकेआरकडून खेळत असलेला ऑस्ट्रेलियन कॅप्टन आरोन फिंचच्या नावावर 70 हाफ सेंच्युरी आहेत.
मोठं मन
डेव्हिड वॉर्नरला शेवटच्या ओव्हरमध्ये स्ट्राईक मिळाली नाही. अन्यथा त्यानं आयपीएल कारकिर्दीमधील पाचवी सेंच्युरी पूर्ण केली असती. 19 वी ओव्हर संपली तेव्हा वॉर्नर 92 रनवर खेळत होता. त्याचा धडका पाहाता त्याला स्ट्राईक मिळाली असती तर त्यानं सहज सेंच्युरी (Warner vs SRH) पूर्ण केली असती.
रोव्हमन पॉवेलनं (Rovmen Powell) सर्व 6 बॉल खेळून काढले. पॉवेलनं वॉर्नरला स्ट्राईक का दिली नाही? हा प्रश्न अनेकांना पडला होता. त्याचं उत्तर ती इनिंग संपल्यानंतर पॉवेलनं दिलं. ‘मी वॉर्नरला एक रन काढून देतो त्यामुळे तुला सेंच्युरी करता येईल असं सांगितलं होतं. त्यावर वॉर्नरनं मला या पद्धतीनं क्रिकेट खेळलं जात नाही. तू तुला शक्य आहे तेवढे जास्तीत जास्त रन कर,’ असा सल्ला दिल्याचं पॉवेलनं सांगितलं.
वॉर्नरच्या हकालपट्टीवर SRH मॅनेजमेंटचे हात वर, कोचनी केला मोठा गौप्यस्फोट
पॉवेलनं वॉर्नरचा सल्ला ऐकला. पॉवेलनं उमरान मलिकच्या शेवटच्या ओव्हरमध्ये एक सिक्स आणि तीन फोरसह 19 रन केले. वॉर्नरनं हैदराबाद विरूद्ध बॅटनं त्याचा बदला पूर्ण केलाच. त्याचबरोबर निर्णायक क्षणी सेंच्युरीचा विचार न करता टीमच्या भल्याचा विचार करणारे मोठे मन दाखवले. सनरायझर्स हैदराबादच्या प्रत्येक फॅनला आपल्या टीम मॅनेजमेंटनं वॉर्नरला सोडून किती मोठी चूक केली, हे (पुन्हा एकदा) या मॅचनंतर (Warner vs SRH) पटले असेल.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.