फोटो – बीसीसीआय, आयपीएल

आयपीएल स्पर्धेत पहिल्या सिझनपासून असूनही एकदाही विजेतेपद न मिळवणाऱ्या टीममध्ये दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) समावेश होतो. या टीमनं 2019 पासून मोठी सुधारणा केली आहे. गेल्या तिन्ही सिझनमध्ये ही टीम पहिल्या 3 मध्ये आहे. 11 भारतीय खेळाडू आणि हेड कोच रिकी पॉन्टिंगच्या (Ricky Ponting) मर्जीतील ऑस्ट्रेलियन्स अशी या टीमची रचना आहे. विजेतेपदाची प्रतीक्षा संपवण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स यंदा कुणाची निवड करू शकते (IPL 2022 DC Probable) पाहूया

टॉप ऑर्डरमध्ये कोण असेल?

दिल्ली कॅपिटल्सनं पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याला रिटेन करत त्याच्यावर विश्वास दाखवला आहे. त्याच्यासोबत पुन्हा एकदा शिखर धवनला (Shikhar Dhawan) खरेदी करण्याचा दिल्लीचा प्रयत्न असेल. शिखरनं मागील दोन आयपीएलमध्ये अनुक्रमे 618 आणि 587 रन काढले आहे. अनुभवी धवन आणि तरूण आक्रमक पृथ्वी ही दिल्लीची हिट ओपनिंग जोडी आहे. त्याची यंदाही पुनरावृत्ती करण्याचा दिल्लीचा प्रयत्न असेल.

दिल्ली कॅपिटल्सला शिखर धवनला खरेदी करण्यात अपयशी आले तर मागील सिझनमधील आरसीबीचा ओपनर देवदत्त पडिक्कलचं (Devdutt Padikkal) नाव दिल्ली कॅपिटल्सच्या लिस्टमध्ये आघाडीवर असेल. त्याचबरोबर पॉन्टिंगचा आवडता ऑस्ट्रेलियन विकेट किपर जोश इंग्लिस किंवा बिग बॅश स्टार जोश फिलिपे यांची दिल्ली राखीव ओपनर म्हणून निवड (IPL 2022 DC Probable) करू शकते.

संभाव्य ओपनर्स : शिखर धवन, देवदत्त पडिक्कल, जोश इंग्लिस आणि जोश फिलिपे

IPL 2022 Mega Auction: CSK कुणाची निवड करणार? अशी असेल चेन्नईची संभाव्य टीम

मिडल ऑर्डरमध्ये कोण?

दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन ऋषभ पंत (Rishabh Pant) 3 नंबरवर खेळणार हे स्पष्ट आहे. ऋषभ पंतनंतर अनुभवी मनिष पांडेला प्लेईंग 11 मध्ये खेळवण्यासाठी दिल्लीचे मॅनेजमेंट नक्कीच गांभिर्याने विचार करत असेल. त्यानंतर मिडल ऑर्डरमध्ये दिल्ली हेटमायरवर पुन्हा बोली लावू शकते. त्याचबरोबर स्टीव्ह स्मिथ किंवा मार्नस लाबुशेनपैकी एका ऑस्ट्रेलियनची निवड रिकी पॉन्टिंग नक्की करेल. सनरायझर्स हैदराबादकडून खेळलेला पंजाबचा ऑल राऊंडर अभिषेक शर्माचं दिल्ली कॅपिटल्समध्ये पुनरागमन होण्याची दाट शक्यता आहे.

दिल्लीला चांगला ऑल राऊंडर फिनिशर हवा आहे. मार्कस स्टॉयनिसला लखनऊ सुपर जायंट्सनं करारबद्ध केल्यानं तो आता उपलब्ध नाही. त्याची जागा घेण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स डॅनियल सॅम्स किंवा मिचेल मार्श दिल्लीच्या टीममध्ये येऊ शकतो. स्पिन बॉलिंग करू शकणारा ऑलराऊंडर फिनिशर घेण्याचे दिल्लीच्या टीमनं ठरवले असेल तर ते लियाम लिविंगस्टोन किंवा टीम डेव्हिडवर बोली लावू (IPL 2022 DC Probable) शकतात.

यापैकी डेव्हिडचा खेळ पॉन्टिंगनं बिग बॅशमध्ये जवळून पाहिला असल्यानं त्यावर दिल्लीचं लक्ष असेल. त्याचबरोबर सध्या वादळी बॅटींगनं देशांतर्गत क्रिकेट गाजवणारा तामिळनाडूचा फिनिशर शाहरूख खानही दिल्लीच्या रडावरवर असेल.

संभाव्य मिडल ऑर्डर : मनिष पांडे, हेटमायर, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन, लियाम लिविंगस्टोन, टीम डेव्हिड, अभिषेक शर्मा आणि शाहरूख खान

फास्ट बॉलर्स

दिल्ली कॅपिटल्सनं नॉर्कियाला रिटेन केले आहे. त्याच्या जोडीला पुन्हा एकदा कागिसो रबाडाला (Kagiso Rabada) करारबद्ध करण्यासाठी दिल्ली सर्वाधिक प्रयत्न करेल. रबाडा या ऑक्शनमधील दिल्लीचा सर्वाधिक महागडा खेळाडू ठरण्याची शक्यता आहे. पण, रबाडा दिल्लीच्या बजेटच्या पलिकडं गेल्यास पॅट कमिन्स किंवा ट्रेंट बोल्ट हे पर्याय दिल्लीकडं असतील.

भारतीय फास्ट बॉलर्समध्ये आवेश खानला परत मिळवणे हे दिल्लीचे मुख्य टार्गेट असेल.      शार्दुल ठाकूरला घेण्यासाठीही दिल्ली प्रयत्न करेल. शार्दुलची सुधारलेली बॅटींग हा त्याच्यावर बोली लावण्यासाठी एक मोठं कारण आहे. हर्षल पटेलला बंगळुरूला देऊन केलेली चूक दिल्ली सुधारण्याचा प्रयत्न करते का हे पाहावे (IPL 2022 DC Probable) लागेल. त्याबरोबर प्रसिद्ध कृष्णा, शिवम मावी यांनाही दिल्ली कॅपिटल्स खरेदी करू शकते.

संभाव्य फास्ट बॉलर:  कागिसो रबाडा, ट्रेन्ट बोल्ट, पॅट कमिन्स, आवेश खान, शार्दुल ठाकूर, हर्षल पटेल, प्रसिद्ध कृष्णा आणि शिवम मावी

IPL 2022 Mega Auction: RCB कुणाची निवड करणार? अशी असेल बंगळुरूची संभाव्य टीम

स्पिनर्स

दिल्ली कॅपिटल्सनं मागील आयपीएल सिझनमध्ये युझवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) खरेदी केले होते. पण, आरसीबीने आरटीएम कार्ड वापरत त्याला कायम ठेवले. यंदा अक्षर पटेलच्या मदतीला चहलला खरेदी करण्याची संधी दिल्लीकडे आहे. चहलला खरेदी करण्यात अपयश आले तर राहुल चहर हा आणखी एक ऑप्शन दिल्लीकडे आहे. त्याचबरोबर दिल्ली कॅपिटल्सला नेहमी त्रास देणारा जयंत यादव, अनुभवी अमित मिश्रा आणि राहुल तेवातिया यांना खरेदी करण्यासाठी दिल्ली बोली लावू शकते.

आर. अश्विनवर पुन्हा एकदा दिल्ली बोली लावेल का हे पाहावं लागेल. अश्विनच्या जागेवर वॉशिंग्टन सुंदर हा पर्याय दिल्लीकडे आहे. त्याचबरोबर विदेशी स्पिनर्समध्ये हसरंगा आणि मोहम्मद नबी हे ऑल राऊंडर्स आणि अ‍ॅडम झम्पा हे ऑप्शन देखील दिल्लीला यंदा उपलब्ध (IPL 2022 DC Probable) आहेत.

संभाव्य स्पिनर्स: युजवेंद्र चहल, आर. अश्विन, जयंत यादव, अमित मिश्रा, राहुल तेवातिया, वॉशिंग्टन सुंदर, हसरंगा, मोहम्मद नबी आणि अ‍ॅडम झम्पा  

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

 

error: