फोटो – ट्विटर, आयसीसी

टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केल्याच्या दिवशीच श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) दिल्ली कॅपिटल्समधून (Delhi Capitals) बाहेर पडला आहे. पुढील सिझनपूर्वी होणाऱ्या मेगा ऑक्शनपूर्वी (IPL 2022 Mega Auction) दिल्ली कॅपिटल्सनं रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी (Delhi Capitals Retention List) समोर आली आहे. या यादीत श्रेयस अय्यरचं नाव नाही, अशी माहिती आहे. श्रेयस 2018 साली IPL स्पर्धा सुरू असताना (IPL 2018) गौतम गंभीरच्या जागी टीमचा कॅप्टन बनला होता.

कोणते खेळाडू रिटेन?

दिल्ली कॅपिटल्सनं ऋषभ पंत (Rishabh Pant), पृथ्वी शॉ (Prithvi Shaw), अक्षर पटेल (Axar Patel) आणि नॉर्खिया (Anrich Nortje)  या चार खेळाडूंना रिटेन केले आहे, असे वृत्त ‘ESPN Cricinfo’ ने दिले आहे.  आयपीएल 2021 मध्ये सहभागी झालेल्या सर्व टीमना रिटेन करणाऱ्या खेळाडूंची यादी 30 नोव्हेंबरपर्यत BCCI कडे सादर करायची आहे.

आयपीएलमधील 8 जुन्या टीमना कमाल 3 भारतीय, आणि कमाल 2 विदेशी खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी आहे. मात्र रिटेन करणाऱ्या एकूण खेळाडूंची कमाल मर्यादा ही 4 आहे. या लिलावात या फ्रँचायझींना यापूर्वीच्या ऑक्शनप्रमाणे जुन्या खेळाडूंना कायम ठेवण्यासाठी ‘राईट टू मॅच कार्ड’ (RTM) मिळणार नाही. नव्या नियमानुसार दिल्ली कॅपिटल्सनं 3 भारतीय आणि 1 विदेशी खेळाडूला रिटेन करण्याचा निर्णय (Delhi Capitals Retention List) घेतला आहे.

4 वर्ष एक फोटो दाखवून श्रेयसला दिली वडिलांनी प्रेरणा, अखेर झाली स्वप्नपूर्ती

संकटकाळात कॅप्टन

आयपीएल 2018 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स (तेंव्हाचे नाव) सुरुवात निराशाजनक झाली होती. दिल्लीनं सुरूवातीच्या 6 पैकी 5 मॅच गमावल्या होत्या. या निराशाजनक कामगिरीची जबाबदारी स्विकारत दिल्लीचा तेव्हांचा कॅप्टन गौतम गंभीरनं (Gautam Gambhir)  कॅप्टनपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर गंभीरच्या जागी तेंव्हा 23 वर्षांच्या श्रेयस अय्यरची दिल्लीचा कॅप्टन म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

श्रेयस अय्यरच्या कॅप्टनसीमध्ये दिल्ली कॅपिटल्सनं 2019 साली ‘प्ले ऑफ’ मध्ये प्रवेश केला. 2012 नंतर पहिल्यांदाच दिल्लीनं ही कामगिरी केली होती. त्यानंतर आयपीएल 2020 (IPL 2020) दिल्लीनं फायनलमध्ये प्रवेश केला होता. मुंबई इंडियन्सनं त्यांचा फायनलमध्ये पराभव केला होता.

श्रेयस अय्यर दिल्लीच्या आयपीएल टीममध्ये 2015 ते 2021 या कालावधीमध्ये होता. श्रेयसनं 87 इनिंगमध्ये 31.66 च्या स्ट्राईक रेटनं 2375 रन काढले आहेत. दिल्लीकडून खेळताना त्याचा स्ट्राईक रेट 123.95 इतका होता. तसंच त्यानं 16 हाफ सेंच्युरी झळकावल्या आहेत. दिल्लीकडून सर्वात जास्त रन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत श्रेयस तिसऱ्या क्रमांकावर आहे.  

का सोडली दिल्ली?

श्रेयस अय्यरला यावर्षी भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्या सीरिजमध्ये दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे त्याला आयपीएलचा पहिला हाफ खेळता आला नाही. त्यामुळे ऋषभ पंतला दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन करण्यात आलं. आयपीएलच्या दुसऱ्या हाफमध्ये श्रेयस परतला, पण दिल्लीची कॅप्टनसी पंतकडेच ठेवण्यात आली.

आता पुढील सिझनमध्ये श्रेयस कॅप्टनपदासाठी आग्रही आहे. तर दिल्लीच्या मॅनेजमेंटनं पंतला कॅप्टनपदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे श्रेयसनं दिल्ली कॅपिटल्स सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दिल्लीच्या या यशस्वी बॅटरनं रिटेन झालेल्या खेळाडूंच्या यादीत नाव (Delhi Capitals Retention List) नाही.

टीम इंडियाच्या Next Generation चा सुपरस्टार, भविष्यातील कॅप्टन

कोणत्या टीममध्ये जाणार श्रेयस?

लखनौ आणि अहमदाबाद या दोन नव्या टीम पुढील आयपीएल सिझनमध्ये दाखल होत आहेत. या टीमना ड्राफ्टच्या माध्यमातून खेळाडू निवडण्याची संधी मिळणार आहे. या दोन नव्या टीम श्रेयसशी कॅप्टनपदाची ऑफऱ देऊन संपर्क साधू शकतात. त्याचबरोबर बंगळुरू, कोलकातासह आणखी काही जुन्या आयपीएल टीमनाही कॅप्टनची गरज आहे. या टीम आगामी लिलावात श्रेयसला (Delhi Capitals Retention List) करारबद्ध करू शकतात.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: